ख्रिसमस झाडांपासून मिळू शकेल रंग, स्विटनर

उत्साही वातावरणानंतर कचऱ्यामध्ये जाणाऱ्या ख्रिसमस झाडांपासून रंग, स्विटनर मिळवणे शक्य होणार आहे.
उत्साही वातावरणानंतर कचऱ्यामध्ये जाणाऱ्या ख्रिसमस झाडांपासून रंग, स्विटनर मिळवणे शक्य होणार आहे.

नाताळानंतर कचऱ्यामध्ये जाणाऱ्या ख्रिसमस झाडांपासून रंग, गोडी आणणारे पदार्थ असे अनेक औद्योगिक पदार्थ तयार करण्याचे तंत्र इंग्लंड येथील शेफिल्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्याचा अर्थकारणाबरोबरच पर्यावरणालाही फायदा होणार आहे. सध्या नाताळ व नववर्षाचे वातावरण असून, या काळात ख्रिसमस ट्री अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, नाताळ संपताच अशी अनेक रोपे किंवा छोटी मोठी झाडे कचऱ्यामध्ये जातात. अन्य झाडांच्या तुलनेमध्ये या झाडांची खोडे, सुचिच्या आकाराची पाने कुजण्यासाठी दीर्घकाळ लागतो. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतो. हे टाळण्यासाठी अशा हजारो ख्रिसमस झाडांवर प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त घटक मिळवण्याचे तंत्र शेफिल्ड विद्यापीठातील रसायन आणि जैविक अभियांत्रिकी विभागातील संशोधिका सिंथिया कार्टे यांनी विकसित केले आहे. त्यांनी टाकाऊ ख्रिसमस झाडांपासून रंग आणि अन्नपदार्थांना गोडवा आणणारे घटक तयार केले आहेत. ही प्रक्रिया शाश्वत आणि पर्यावरणपूरक असून, यातून ख्रिसमसनंतरचा कचरा कमी होऊ शकेल.

  • ख्रिसमस ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाईन झाडांच्या पानांमध्ये सुमारे ८५ टक्के भाग हा गुंतागुतींच्या लिग्रोसेल्यूलोज पॉलीमर्सने बनलेला असतो. त्यामुळे ते लवकर कुजत नाहीत. पर्यायाने या झाडांचा औद्योगिक किंवा जैवइंधनाच्या निर्मितीसाठी फारसा वापर केला जात नाही. त्याविषयी सिंथिया म्हणाल्या, की माझ्या संशोधनामध्ये गुंतागुंतीच्या संरचनेचे विघटन साध्या आणि उच्च किमतीच्या औद्योगिक रसायनामध्ये करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यातून घरगुती स्वच्छता, माऊथवॉश निर्मितीसाठी साखर आणि फिनोलिक घटक मिळवण्याचा प्रयत्न होता. त्याचप्रमाणे कुजण्यासाठी सोपे झालेले घटक जैवइंधनाच्या निर्मितीसाठीही वापरता येतील.
  • पाईनच्या झाडापासून ग्लिसरॉल सारखे स्वस्त आणि पर्यावरणपूरक रासायनिक संरचना मिळवण्यात आली. त्यापासून द्रवरूप इंधन आणि कोळश्यासारखे (बायोचार) उपपदार्थही मिळवता येतील.
  • कोणत्याही जैवतेलामध्ये ग्लुकोज, अॅसेटिक अॅसिड आणि फिनॉल असतात. या रसायनांचा विविध औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापर केला जातो. उदा. ग्लुकोज हे अन्नपदार्थांमध्ये गोडी आणण्यासाठी स्विटनर म्हणून, तर अॅसेटीक अॅसिड रंग, चिकटद्रव्ये आणि अगदी व्हिनेगार यांच्या निर्मितीसाठी वापरता येते.
  • इंग्लंडमध्ये प्रतिवर्ष नाताळ सणांच्या काळात सुमारे ८० लाख नैसर्गिक ख्रिसमस झाडे वापरली. त्यातील सुमारे ७० लाख झाडे कचऱ्यामध्ये फेकली जातात. हा सर्व कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया झाल्यास उद्योगाबरोबरच पर्यावरणालाही फायदा होणार असल्याची माहिती डॉ. जेम्स मॅग्रेगोर यांनी दिली. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com