जनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपाय

जनावरांच्या चाऱ्यामध्ये विषारी घटक येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
जनावरांच्या चाऱ्यामध्ये विषारी घटक येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

विषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात किंवा मृत्यूदेखील ओढवू शकतो. विषबाधेमध्ये प्रामुख्याने सायनानाईटची विषबाधा, ऑक्झॅालिकची विषबाधा आणि सरकीतून होणारी विषबाधा यांचेे प्रमाण जास्त आढळते. विषबाधा टाळण्यासाठी पशुपालकाकडे पर्याप्त माहिती असणे गरजेचे आहे ही माहिती पशुपालकाकडे असल्यास विषबाधा कोणत्या कारणाने होते हे समजेल व ते विषबाधा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील.

विषबाधा होण्याचे कारणे, लक्षणे व त्यावरील उपाय १. सायनाईटची विषबाधा कारणे संकरित ज्वारीचे नवीन ठोंब किंवा ज्वारी कापल्यानंतर येणारे फुटवे यामध्ये हायड्रो सायनिक आम्ल या विषारी द्रव्याचे प्रमाण अधिक असते. लक्षणे

  • हे आम्ल जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे अस्वस्थ होतात व त्यांना श्वासोच्छवासांत अडथळा निर्माण होतो.
  • डोळे विस्फारून व फेफरे येऊन जनावरे मरण पावतात. डोळे लाल होणे हे या विषबाधेचे लक्षण आहे.
  • उपाय

  • ज्वारीचे फुटवे असलेल्या शेतात जनावरांना चरण्यास सोडू नये.
  • विषबाधा झालेल्या जनावरांस तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मदत घेऊन उपचार करावे.
  • २. ऑक्झॅालिकची विषबाधा कारणे

  • काळा बुरशीयुक्त कडबा जनावरांच्या खाण्यात आल्यास
  • रब्बी गहू- हरभरा पिकांत वाढणारे “ढोरकाकडा” नावाचे तण जनावरांनी खाल्ल्यास
  • लक्षणे

  • या विषबाधेमुळे रक्तात कॅल्‍शियमची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अडखळत चालणे, कुंथणे, पोटफुगी, लघवी, थेंबाथेंबाने होणे किंवा अजिबात न होणे.
  • गुदद्वारापासून ते मागील दोन पायांतून अंडकोषापर्यंत सूज आलेली आढळून येते.
  • बुरशीयुक्त कडबा अथवा गहू- हरभऱ्यांतील उपटून टाकलेले तण जनावरांना खाण्यास देऊ नये.
  • विषबाधेचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅल्‍शियमचे इंजेक्शन पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने द्यावे.
  • ३. सरकीतून होणारी विषबाधा कारणे

  • दुधाळ जनावरांना अथवा बैलांना सरकी देण्यात येते. कीटक प्रतिबंधक व अधिक उत्पादन देणाऱ्या कपाशीच्या सरकीमध्ये गॉसीपॅाल या विषारी द्रव्याचे प्रमाण अधिक असते.
  • गॉसीपॅालयुक्त सरकी जनावरांच्या सतत खाण्यात आल्यास दीर्घकालीन विषबाधा होण्याची शक्यता असते. उपाय
  • सरकी जनावरांना सतत खाण्यात देऊ नये.
  • चार आठवडे सतत खाद्य दिल्यानंतर एखादा आठवडा खाद्य देऊ नये.
  • (टीप ः जनावरांना विषबाधा झाल्यावर पशुतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच उपचार करून घ्यावेत.)

    संपर्क ः प्रणिता सहाणे, ८६००३०१३२९ (ए. बी. एम. कॉलेज, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com