agriculture story in marathi, pomogranate processing | Agrowon

डाळिंबापासून अनारदाना, अनाररब
के. के. गिराम, एस. एस. मोहळकर
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

डाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास उत्तर भारतात मागणी आहे, तो पदार्थ आंबट जातीच्या (५ - ७ टक्के आम्लता) असलेल्या डाळिंबापासून करतात व अन्नपदार्थात आंबटपणा आणण्यासाठी यांचा उपयोग करतात. टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे बरेच दिवस टिकणारा अनाररब हा नावीन्‍यपूर्ण पदार्थही तयार करता येतो.
 
१. अनारदाना

डाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास उत्तर भारतात मागणी आहे, तो पदार्थ आंबट जातीच्या (५ - ७ टक्के आम्लता) असलेल्या डाळिंबापासून करतात व अन्नपदार्थात आंबटपणा आणण्यासाठी यांचा उपयोग करतात. टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे बरेच दिवस टिकणारा अनाररब हा नावीन्‍यपूर्ण पदार्थही तयार करता येतो.
 
१. अनारदाना

 • पिकलेल्या डाळिंबाचे दाणे सूर्याच्या उष्णतेने वाळवून त्यापासून अनारदाना बनवितात.
 • त्यामध्ये ५.४ ते १४.७ टक्के पाणी, ७.८ ते १५.४ टक्के आम्लता, २.०४ ते ४.४ टक्के खनिजे, आणि ४.७४ ते ६.२५ टक्के प्रथिने असतात.
 • हा पदार्थ अन्न शिजवताना चिंच, आमसूल ऐवजी अनेक अन्नपदार्थांत वापरता येतो. त्यामुळे अन्नाची चव सुधारते व अन्न स्वादिष्ट, रुचकर व पौष्टीक बनते.
 • रशियन जातीच्या आंबट डाळिंबापासून हा पदार्थ बनवितात.

२. अनाररब

 • डाळिंबाच्या रसापासून अनाररब नावाचा पदार्थ तयार करता येतो.
 • यामध्ये डाळिंबाच्या रसात साखर घालून मंदग्नीवर बराच वेळ हे मिश्रण आटवले जाते व घट्ट केले जाते.
 • अशाप्रकारे तयार होणाऱ्या‍ या पदार्थामध्ये ७० ते ७५ टक्के एकूण विद्राव्य घन पदार्थ असतात.
 • हा पदार्थ टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस याप्रमाणे बरेच दिवस टिकतो.

३. स्क्वॅश

 • डाळिंबाचा रस काढून तो पातळ मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. हा रस स्क्वॅश तयार करण्यासाठी वापरावा.
 • डाळिंब रसात १३ टक्के ब्रिक्स व ०.८ टक्के आम्लता गृहीत घरून स्क्वॅश तयार करण्यासाठी २५ टक्के डाळिंबाचा रस, ४५ टक्के साखर व १ टक्के सायट्रिक अॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाणे खालीलप्रमाणे ः
 • घटक पदार्थ ः प्रमाण
 • डाळिंबाचा रस ः १ किलो
 • साखर ः १.६७० किलो
 • पाणी ः १.२९८ किलो
 • सायट्रिक अॅसिड ः ३२ ग्रॅम
 • तांबडा खाद्य रंग ः आवश्यकतेप्रमाणे
 • सोडियम बेन्झाईट ः २.६ ग्रॅम
 • मोठ्या पातेल्यात दिलेल्या प्रमाणात साखर आणि पाणी घेऊन पाक बनवून घ्यावा.
 • तयार पाक पातळ मलमलच्या कपड्यातून दुसऱ्या‍ पातेल्यात गाळून घ्यावा व त्यात डाळिंबाचा रस टाकून चमच्याने एकजीव करावा.
 • हे द्रावण मंदाग्नी शेगडीवर गरम करून घ्यावे व थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवावे.
 • दोन ग्लासमध्ये थोडाथोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झाईट व दुसऱ्या ग्लासमध्ये आवडीप्रमाणे तांबडा खाद्य रंग टाकून ते चमच्याने पूर्ण विरघळून घ्यावे.
 • दोन्ही विरघळलेले पदार्थ स्क्वॅशमध्ये मिसळून ते चमच्याने एकजीव करावेत.
 • निर्जंतुकीकरण करून घेतलेल्या स्क्वॅशच्या बाटल्यामध्ये हा स्क्वॅश भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून हवा बंद कराव्यात.
 • स्क्वॅशच्या बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
 • स्क्वॅश वापरताना एकास तीन भाग पाणी घेऊन चांगले हलवून एकजीव करावे व नंतर प्यावे.

४. सिरप
डाळिंबाच्या रसात १३ टक्के ब्रिक्स व ०.८ टक्के आम्लता गृहीत घरून डाळिंब रस सिरप तयार करण्यासाठी २५ टक्के डाळिंब रस, ६५ टक्के साखर व १.५ टक्के सायट्रिक अॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण खालीलप्रमाणे
घटक पदार्थ ः प्रमाण
डाळिंबाचा रस ः १ किलो
साखर ः २.४७० किलो
पाणी ः ४.७८० किलो
सायट्रिक अॅसिड ः ५२ ग्रॅम
सोडियम बेन्झाईट ः २.६ ग्रॅम

 • पाणी पातेल्यात वजन करून घ्यावे. त्यामध्ये सायट्रिक अॅसिड घालून पूर्ण विरघळून घ्यावे.
 • त्यामध्ये डाळिंब रस मिसळावा व साखर टाकून चमच्याने हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यावी.
 • पातेले मंदाग्नीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत गरम करून घ्यावे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप स्टीलच्या मोठ्या चमच्याने किंवा पळीने सतत हलवत राहावे.
 • दोन ग्लासमध्ये थोडा - थोडा सिरप घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झाईट व दुसऱ्यामध्ये आवश्यकतेनुसार तांबडा खाद्य रंग विरघळून सिरपमध्ये मिसळून एकजीव करावे.
 • निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये सिरप भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून त्या हवा बंद कराव्यात.
 • सिरपची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

संपर्क ः के. के. गिराम, ८५७५७५११११
(अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड) 

इतर कृषी प्रक्रिया
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...