agriculture story in marathi, Pradeep Prabhu has done coconut farming successful. | Page 2 ||| Agrowon

उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ बाग

एकनाथ पवार
गुरुवार, 2 सप्टेंबर 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला) येथील प्रदीप प्रभू यांनी रोपनिर्मिती, अभ्यासपूर्ण लागवड, व्यवस्थापनाला सेंद्रिय पद्धतीची जोड आणि यशस्वी विक्री व्यवस्था याद्वारे नारळ शेती यशस्वी केली आहे. शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही ते सक्रिय असून, सामूहिक विक्रीसाठी त्यांचाही हातभार महत्त्वाचा ठरला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला) येथील प्रदीप प्रभू यांनी रोपनिर्मिती, अभ्यासपूर्ण लागवड, व्यवस्थापनाला सेंद्रिय पद्धतीची जोड आणि यशस्वी विक्री व्यवस्था याद्वारे नारळ शेती यशस्वी केली आहे. शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही ते सक्रिय असून, सामूहिक विक्रीसाठी त्यांचाही हातभार महत्त्वाचा ठरला आहे.
 
नारळ, पोफळी, करवंद, लाल बोंडूच्या जांभा
नावारूपात आलाय जगात देवगड हापूस आंबा

भजनसम्राट कै. परशुराम पांचाळ यांनी कोकण दर्शन या गजरात कोकणातील फळांचे केलेले हे वर्णन अत्यंत बोलके आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व भागांत नारळ उत्पादन घेतले जाते. परंतु व्यावसायिक लागवड किनारपट्टीच्या तालुक्यांत आहे. मालवण-कुडाळ मार्गावर वेंगुर्ला तालुक्यात परुळे गाव आहे. येथून अवघ्या अर्धा एक किलोमीटरवर लवकरच सुरू होणारे चिपी विमानतळ आहे. गावाची भौगोलिक रचना इतकी सुंदर आहे, की कोकणाची प्रत्यक्ष अनुभूती त्यातून मिळते. आंबा, सुपारी, कोकम, भाताचे उत्पादन येथे होते. गावात १५० हून अधिक एकर क्षेत्र नारळाखाली आहे.

प्रभू यांची नारळ शेती
परुळे गावातील प्रदीप प्रभू यांची वडिलोपार्जित नारळ शेती होती. त्यांनी टप्पाटप्प्याने सुधारणा सुरू केली. मातृवृक्षापासून रोपनिर्मितीचे तंत्र शिकून घेतले. उत्कृष्ट रोपांमुळे शेतकरीही त्यांच्याकडून रोपे खरेदी करू लागले. रोपनिर्मितीची त्यांची एक शैली आहे. नारळाच्या पेंडी काढल्यानंतर पहिले तीन ते चार नारळ निवडले जातात. दोन महिने सावलीत सुकवितात. त्यातील पाणी कमी झाल्याची खात्री झाल्यानंतर दोन ते तीन दिवस कोंबांसाठी पाण्यात भिजविले जातात. त्यानंतर मातीने भरलेल्या पिशवीत किंवा थेट जमिनीतही लागवड होते. अशा पद्धतीने रोपनिर्मिती केल्यास झाड चांगले उत्पादन देते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ही प्रकिया करावी असे प्रभू सांगतात.
 
प्रभू यांचे शेती व्यवस्थापन

 • सुमारे २० एकर शेती. सहा एकरांत नारळाची ३०० झाडे.
 • पैकी २०० उत्पादनक्षम. १०० झाडांपासून दोन वर्षांपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात.
 • २५ बाय २५ फूट अंतरावर लागवड
 • दीड एकरांत सुपारीची ३५० झाडे. सुपारीची रोपनिर्मितीही करतात.
 • नारळ लागवड करताना खड्ड्यात नदीतील गाळ आणि सोडणाचा वापर.
 • सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन. गांडूळ खत, लेंडीखत, शेणखत, जिवामृत यांचा वापर.
 • नारळ सोडणे, नारळाच्या फांद्या,पालापाचोळा आदींचा वापर.
 • संपूर्ण बागेला ठिबकचा वापर.
 • वर्षभरात पाच वेळा (पाडणी) काढणी.
 • बागेत हळद, जायफळ आदी आंतरपिके.
 • नारळ लागवड करण्याचे एक तंत्र आहे. झाडांची उंची वाढल्यानंतर त्यांच्या (ढावळे) फांद्या एकमेकांना चिकटता कामा नये. तसे झाल्यास झाड चांगले उत्पादन देत नाही. या तंत्राला “न लागे ते लागे” असे म्हणतात. प्रभू यांनी याच तंत्रानुसार टप्प्याटप्पाने लागवड केली.
 • शेतीत पत्नी प्रियांका यांची भक्कम साथ मिळते. चिन्मय डॉक्टर असून, तोही सवडीनुसार शेतीत काम करतो.
 • उत्पादन, उत्पन्न
 • प्रति झाड वर्षाला किमान शंभर नारळ, तर वार्षिक २० हजार नारळ उत्पादन.
 • नारळापासून वार्षिक उलाढाल चार लाख रुपये. सुपारीपासून ५० हजारांचे उत्पन्न.
 • सुपारी रोप विक्रीतून ३० हजार रुपयांची उलाढाल. नारळ सोडण, फांद्यांचीही काही प्रमाणात विक्री.  

कंपनीद्वारे सामूहिक विक्री
परुळे गावात नारळ उत्पादकांची संख्या भरपूर आहे. शेतकरी प्रचंड मेहनत करून उत्पादन घेतात. परंतु विक्रीसाठी मात्र व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत होते. व्यापाऱ्यांकडून खरेदीची पद्धतही पारंपरिक व विचित्र होती. व्यापारी नगावर असलेल्या बाजारभावानुसार नारळ खरेदी करायचे.

शिवाय लाभाचे नारळ या गोंडस नावाखाली शेकडा दहा नारळ शेतकऱ्यांकडून अधिक घ्यायचे. व्यापारी गावात आला, तर तो निश्‍चित दराप्रमाणे खरेदी करायचा. परंतु शेतकरी व्यापाऱ्याकडे गेल्यास दर पाडून खरेदी व्हायची. त्यात अनेकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान व्हायचे. प्रभू यांनी यावर उपाय काढण्यासाठी अनेकांशी चर्चा केली. संघटित झाल्याशिवाय बळ वाढणार नाही हे त्यातून स्पष्ट झाले. त्यातून ‘आत्मा’ अंतर्गत सन २०१७ च्या सुमारास आदिनारायण शेतकरी उत्पादक ॲग्रो कंपनी स्थापन झाली. आता कंपनीमार्फत गावातील उत्पादकांकडून नारळ खरेदी होते. फोंडा घाट, कोल्हापूर येथे कंपनीच्या वाहनातून माल पाठवून विक्री होते. त्याद्वारे खरेदीच्या पारंपरिक पद्धतीला तिलांजली देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडे जाण्याची फरफट थांबली आहे. दरही पूर्वीपेक्षा चांगला मिळतो. सध्या किलोला ३० ते ३५ रुपये, तर नगाला साधारण २० ते २१ रुपये दर मिळतो.

सामाजिक कार्यात अग्रेसर
प्रभू यांनी २००७ ते २०१२ या कालावधीत परुळे ग्रामपंचायतीचे सदस्यपद, तर २०१२ ते २०१७ या कालावधीत सरपंचपद भूषविले. त्यांच्या या काळात राष्ट्रीय व राज्य स्तरावर ग्रामपंचायतीस पुरस्कार मिळाला आहे. आदिनारायण विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. गावात येणाऱ्या समुद्राचे खारे पाणी रोखण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत बंधारे घालण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून गोड्या पाण्याचा साठा वाढण्यास मदत झाली. सरपंच, उपसरपंच, अधिकारी व ग्रामसेवकांसाठी ते प्रशिक्षक म्हणूनही कार्य करतात.  

नारळ दिनादिवशी काथ्या उद्योगाचा प्रारंभ
प्रभू व गावातील सहकाऱ्यांनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत गावात काथ्या उद्योग सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यास यश येत आहे. चिपी विमानतळापासून काही अंतरावर उद्योगासाठी इमारत बांधण्यात आली असून, आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविली आहे. त्यातून पायपुसणी, अन्य उत्पादने निर्मितीला चालना मिळणार असून, महिला बचत गटांना रोजगार मिळणार आहे. उद्योगाचा शुभारंभ आज नारळ दिनाच्या दिवशी होणार आहे.

संपर्क- 
प्रदीप प्रभू, ९४२०२१००८९, ९४०५२६२८४५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...