agriculture story in marathi, Pratik Sabe a young farmer is doing successfully goat ^ poultry farming successfully. | Page 2 ||| Agrowon

शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची दमदार वाटचाल

गोपाल हागे
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021

बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी प्रतीक एकनाथ साबे (वय वर्षे २१) याने कुटुंबाच्या मदतीने अर्धबंदिस्त गावरान शेळीपालनातून आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल केली आहे. जोडीला गावरान कुकुटपालनाची जोड देत आर्थिक सक्षमताही मिळविण्यास सुरवात केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी प्रतीक एकनाथ साबे (वय वर्षे २१) याने कुटुंबाच्या मदतीने अर्धबंदिस्त गावरान शेळीपालनातून आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल केली आहे. जोडीला गावरान कुकुटपालनाची जोड देत आर्थिक सक्षमताही मिळविण्यास सुरवात केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील आडविहिर येथील साबे कुटुंबाची साडेचार एकर शेती आहे. पावसाच्या पाण्यावर आधारित पीक पद्धती असल्याने उत्पादन निश्चित नाही. किडी- रोगांच्या समस्या वाढल्या आहेत. कुटुंबात नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा प्रतीक एकनाथ साबे सध्या पशुवैद्यकीय विषयातील पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला आहे. शिक्षण सुरू असताना शेतीला आधार म्हणून तीन वर्षांपूर्वी तो अर्धबंदिस्त शेळीपालनाकडे वळाला. घरच्यांचीही चांगली साथ मिळाली. स्थानिक बाजारातून पाच गाभण गावरान शेळ्यांची एकूण मिळून ४० हजारांत खरेदी झाली. शेडसाठी अनावश्यक खर्च न करता गायीच्या गोठ्यातच बाजूला निवारा केला. प्रत्येकी दोन व काही प्रसंगी तीन पिल्ले मिळू लागली. पाटींचा सांभाळ व बोकडांचा विक्री या पद्धतीने व्यवसाय वाढवत नेला. मिळू लागलेल्या उत्पन्नातून स्वतंत्र शेडची बांधणी केली. व्यवसायाला आता सुमारे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. घरीच शेळ्या तयार होत असल्याने बाजारातून आणण्याची आवश्यकता पडली नाही. आज लहान-मोठया धरून संख्या ६५ ते ७० पर्यंत पोचली आहे.

शेड व्यवस्थापन

 • शेड व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा भाग. त्याची बांधणी रात्री व दिवसांसाठी अशी दोन भागांत.
 • हवा खेळती राहावी यासाठी दोन ते तीन फूट उंच सिमेंटच्या भिंती व त्यावर लोखंडी जाळी.
 • दिवसभर शेळ्या शेडबाहेर.. जाळीचे कुंपण लावून मोठे पटांगण तयार केले आहे.
 • शेडमध्ये मिथेन वायूचे प्रमाण कमी राहील यासाठी विशेष दक्षता.
 • दिवसातून दोन वेळा शेडची पूर्ण स्वच्छता. त्यामुळे दुर्गंधी अथवा जंतू शेडमध्ये राहत नाहीत. आतील वातावरण चांगले राहते.

चारा व्यवस्थापन

 • चारा व्यवस्थापनाचे तीन टप्पे पाडले. त्यात हिरवा, सुका चारा व झाडपाल्याचा समावेश.
 • हिरव्या चाऱ्यासाठी दीड एकर क्षेत्र. त्यात बीएचएन १०, सुपर नेपियर, हत्तीगवत लागवड. हिरवा मका व बाजरीचाही वापर.
 • सुक्या चाऱ्यात तूर, हरभरा व सोयाबीनचे कुटार, मक्याची कुट्टी, भुईमुगाचे काड. झाडपाल्यामध्ये सुबाभूळ (अर्धा एकर), शेवरी, शेवगा, बोर, बेहडा, अंजन आणि पिंपळ आदींचा पाला अधून-मधून दिला जाते.

आरोग्य व्यवस्थापन
शेळी वा करडू जर आजारी पडले तर वजनवाढीवर परिणाम होतो. व्यवसायात आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता असते. पीपीआर सारख्या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्यास ७० ते ८० टक्के शेळ्या दगावल्या जाऊ शकतात. प्रतीक स्वतः पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी असल्याने आजार, निदान व उपचारांचे ते योग्य ज्ञान घेत आहेत. आजारी जनावरांवर उपचार, लसीकरण आदी कामांमध्ये ते कुशल होऊ लागले आहेत.

विक्री व्यवस्था
प्रतीक सांगतात की आपल्याकडे किती शेळ्या आहेत यापेक्षा विक्री किती व कशी करतो याला खूप महत्त्व आहे. आठवडी बाजार घरापासून तीन किलोमीटरवर आहे. त्यामुळे शेळीपालक व व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात.

गावरान कुक्कुटपालन
प्रतीकने अवघ्या तीन गावरान कोंबड्यांपासून कुक्कुटपालन सुरू केले. आज सुमारे दीडशे लहान-मोठ्या कोंबड्या तयार केल्या आहेत. शेळ्यांच्याच शेडमध्ये संगोपन होत असल्याने स्वतंत्र शेडचा खर्च वाचला. शेळ्यांचे उवा, पिसवा, गोचीड यासारख्या बाह्यपरजीवींपासून संरक्षण होण्यास मदत होत आहे. कोंबड्यांच्या खाद्यांवरचा खर्चही काही प्रमाणात कमी होत आहे. अंडी व कोंबड्यांची विक्रीही जागेवरूनच केली जाते. यात व्यावसायिक संधी चांगली असल्याचे प्रतीक सांगतो. गावरान जातीचेच संगोपन करून त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे त्याचे ध्येय आहे.

इतरांना मार्गदर्शन
गाव, तालुका व त्याबाहेरील शेतकऱ्यांना प्रतीक मार्गदर्शन देतो. आजारांबाबत माहिती देतो. लसीकरणाचे महत्त्व कळवून ते करून देण्यामध्येही पुढाकार घेतो. या कामांसाठी तो कोणते शुल्क घेत नाही. आजी श्रीमती पार्वतीबाई वसंत साबे, वडील एकनाथ, आई सौ. अर्चना व बहीण गायत्री असे कुटुंबातील सदस्य असून सर्वजण शेतीत राबतात.

व्यवस्थापनातील ठळक बाबी व अर्थकारण

 • दिवसातून दोन वेळा शेडची स्वच्छता. त्यामुळे शेळ्या तणावमुक्त व निरोगी राहतात.
 • दिवसभरातून तीन वेळा चारा, संध्याकाळी खुराक.
 • शेळ्या व करडांना दिवसभर मुक्त सोडल्याने त्यांचा चांगला व्यायाम होतो.
 • व्यवसायातील सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवल्या जातात.
 • पाच महिन्यांच्या करडांची विक्री पाच ते सात हजारांपर्यंत. एका वर्षावरील बोकडाची विक्री
 • शारीरिक ठेवण व वजनानुसार. प्रति १२ ते २० हजार रुपयांपर्यंत.
 • पहिल्या वर्षी पाचच शेळ्या असल्याने ६० हजार रुपये उत्पन्न. पुढील वर्षी घरच्या शेळ्या तयार झाल्यामुळे उत्पादनासह उत्पन्न ९० हजारांपर्यंत पोचले.
 • तिसऱ्या वर्षी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न पोचले.
 • पाटी न विकता केवळ बोकडांचीच विक्री.
 • कुक्कुटपालनात नरांची प्रति ६०० रुपये दराने तर दररोज १५ ते २० अंड्यांची प्रतिनग १५ रुपयाने विक्री.
 • सध्या २५० शेळ्यांच्या क्षमतेचे शेड तयार झाले आहे. १५०० कोंबड्यांचे नियोजन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रति महिना एक लाख रुपये उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

संपर्क- प्रतीक साबे- ७३५०४७७२४२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...
`चॉकी सेंटर’ सुरू करून गुणवत्तापूर्ण...परिसरातील रेशीम शेतकऱ्यांची गरज ओळखून वाकी...
संघर्षमय आयुष्यात मोगऱ्याच्या सुगंधाचा...नाशिक जिल्ह्यात पेठ या आदिवासी तालुक्यातील आड...
संघर्षमय वाटचालीतून शेतीत उभारले वैभवपरभणी जिल्ह्यातील मरसुळ येथील देवराव शिंदे यांनी...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
पर्यावरणपूरक तंत्रे देणारे वर्ध्याचे...दत्तपूर (वर्धा) येथे ग्रामोपयोगी विज्ञान...
कापडणीसांचे एक्स्पोर्ट क्वालिटी’चे भारी...नाशिक जिल्ह्यातील आसखेडा येथील अमृत कापडणीस यांनी...
बायोगॅसपासून वीज अन्‌ प्रॉम खतनिर्मितीबारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये...
बचत गटाने उभारली भाजीपाला रोपवाटिकाशिक्रापूर-राऊतवाडी (ता. शिरूर,जि.पुणे) येथील...