आवळ्याचे गुणकारी पदार्थ

आवळा प्रक्रिया
आवळा प्रक्रिया

आवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही, म्हणूनच त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रक्रिया करून त्यापासून मुरंबा, लोणचे, जॅम, आवळा चूर्ण, च्यवनप्राश, कँडी असे अनेक पदार्थ तयार करता येतात.   मुरंबा एक किलो ताजे व बिना डागांचे आवळे निवडून घ्यावेत. ते स्वच्छ धुवून त्याला काटा चमचा अथवा चाकूने सर्व बाजूने टोचून घ्यावे. या आवळ्याला १० ते १२ मिनिट वाफवून घ्यावे. वाफलेले आवळे १.२५ किलो साखर आणि साखर भिजेल एवढेच पाणी टाकून त्यात मिसळून घ्यावे व मध्यम आचेवर उकळण्यास ठेवावे. आवळ्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत उकळावे. आवळा व पाक दोन्ही हलके गुलाबी होऊन त्याला चकाकी येते तेव्हा गॅस बंद करावा. निर्जंतुक काचेच्या बाटलीत हा मुरंबा भरून ठेवावा. स्वादासाठी यात वेलची देखील घालता येते. चूर्ण ताजे बिन डागांचे आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्या आवळ्यांना ५ मिनिटे वाफवून घ्यावे. वाफवलेल्या आवळ्याच्या चकत्या करून त्या सोलार ड्रायरमध्ये वाळवून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. जॅम १ किलो स्वच्छ बिनडागाचे आवळे धुवून १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. बिया काढून आवळ्याचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा. आवळ्याचा लगदा व ७५० ग्राम साखर एकत्र मिसळून जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात शिजवण्यास ठेवावे. जॅमची शीट टेस्ट येईपर्यंत शिजवावे. निर्जंतुक काचेच्या बाटलीत भरून जॅम सेट करावा.   संपर्क ः प्रा. माधुरी रेवणवार (विषय विशेषज्ज्ञ, गृह विज्ञान, संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com