Agriculture story in marathi processing of aonla | Agrowon

आवळ्याचे गुणकारी पदार्थ

प्रा. माधुरी रेवणवार
सोमवार, 20 जानेवारी 2020

आवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही, म्हणूनच त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रक्रिया करून त्यापासून मुरंबा, लोणचे, जॅम, आवळा चूर्ण, च्यवनप्राश, कँडी असे अनेक पदार्थ तयार करता येतात.
 
मुरंबा

आवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही, म्हणूनच त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रक्रिया करून त्यापासून मुरंबा, लोणचे, जॅम, आवळा चूर्ण, च्यवनप्राश, कँडी असे अनेक पदार्थ तयार करता येतात.
 
मुरंबा
एक किलो ताजे व बिना डागांचे आवळे निवडून घ्यावेत. ते स्वच्छ धुवून त्याला काटा चमचा अथवा चाकूने सर्व बाजूने टोचून घ्यावे. या आवळ्याला १० ते १२ मिनिट वाफवून घ्यावे. वाफलेले आवळे १.२५ किलो साखर आणि साखर भिजेल एवढेच पाणी टाकून त्यात मिसळून घ्यावे व मध्यम आचेवर उकळण्यास ठेवावे. आवळ्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत उकळावे. आवळा व पाक दोन्ही हलके गुलाबी होऊन त्याला चकाकी येते तेव्हा गॅस बंद करावा. निर्जंतुक काचेच्या बाटलीत हा मुरंबा भरून ठेवावा. स्वादासाठी यात वेलची देखील घालता येते.

चूर्ण
ताजे बिन डागांचे आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्या आवळ्यांना ५ मिनिटे वाफवून घ्यावे. वाफवलेल्या आवळ्याच्या चकत्या करून त्या सोलार ड्रायरमध्ये वाळवून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

जॅम
१ किलो स्वच्छ बिनडागाचे आवळे धुवून १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. बिया काढून आवळ्याचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा. आवळ्याचा लगदा व ७५० ग्राम साखर एकत्र मिसळून जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात शिजवण्यास ठेवावे. जॅमची शीट टेस्ट येईपर्यंत शिजवावे. निर्जंतुक काचेच्या बाटलीत भरून जॅम सेट करावा.
 
संपर्क ः प्रा. माधुरी रेवणवार
(विषय विशेषज्ज्ञ, गृह विज्ञान, संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड) 

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
ड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया,...
कवठाची जॅम, जेलीकवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध...
पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बारबाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर...
फळे,भाजीपाला साठवणीसाठी उच्च तापमानाचा...फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
फळांची जेली करताना...चमकदार, पारदर्शक, मऊ आणि उत्कृष्ट जेली...
आवळ्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आपणा सर्वांना आहारात आणि आयुर्वेदात आवळ्याचे...
फळे,भाजीपाला प्रक्रियेची तत्त्वेफळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
चिकूपासून टॉफी, जॅमनिर्मितीचिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प),...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...
दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय...खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध...