Agriculture story in marathi processing of sugarcane bagasse for fodder purpose | Agrowon

वाढवा ऊस चोथ्याची पोषकता

डॉ. पंढरीनाथ राठोड, डॉ. मंजूषा ढगे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

उसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचे जर खाद्यात रूपांतर केले तर जनावरांसाठी खाद्याचा नवीन स्त्रोत उपलब्ध होईल. उसाच्या चोथ्यामध्ये शर्करेचे प्रमाण इतर चाऱ्याच्या तुलनेत अधिक असते. यामुळे खाद्याला एक वेगळीच चव प्राप्त होते.

उसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचे जर खाद्यात रूपांतर केले तर जनावरांसाठी खाद्याचा नवीन स्त्रोत उपलब्ध होईल. उसाच्या चोथ्यामध्ये शर्करेचे प्रमाण इतर चाऱ्याच्या तुलनेत अधिक असते. यामुळे खाद्याला एक वेगळीच चव प्राप्त होते.

साखर कारखान्यात उसापासून साखर तयार केल्यानंतर मळी आणि चोथा ही दोन प्रकारची दुय्यम उत्पादने मिळतात. मळी विविध प्रक्रियांमधे वापरली जाते. परंतु उसाचा चोथा हा जास्त प्रमाणात वापरला जात नाही. चोथा पेपर, बोर्ड, ज्वलनभट्टीमध्ये जाळण्यासाठी वापरला जातो किंवा फेकून दिला जातो. उसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचे जर खाद्यात रूपांतर केले तर जनावरांसाठी खाद्याचा नवीन स्त्रोत उपलब्ध होईल.

उसाच्या चोथ्यामध्ये शर्करेचे प्रमाण इतर चाऱ्याच्या तुलनेत अधिक असते. यामुळे खाद्याला एक वेगळीच चव प्राप्त होते. जनावरे हा प्रक्रिया केलेला चारा आवडीने खातात. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्याचा तुटवडा जाणवतो. ऊस चोथ्यावर प्रक्रिया करून उन्हाळ्यातील चारा टंचाई कमी करता येईल. जनावरांना संतुलित आहाराचा पुरवठा केल्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन, शारीरिक वाढ तसेच प्रजोत्पादन सुरळीत राखले जाते. परिणामी दूध उत्पादनात ही वाढ होते. कारण आहाराचा दूध व प्रजोत्पादनाशी थेट संबंध आहे.

चौथ्यावर प्रक्रिया कशी करावी

 • प्रक्रिया करण्यापूर्वी ऊस चोथ्याची कुट्टी करून घ्यावी.
 • कुट्टी केलेला चोथा सपाट जमिनीवर एका ताडपत्रीवर पसरावा.
 • पसरलेल्या चोथ्याच्या १५-२० सेंमीचा थर बनवावा. त्यावर युरिया आणि मळीचे द्रावण हे ऊस चोथ्याच्या थरावर शिंपडावे.

१०० किलो ऊस चोथ्यावर प्रक्रिया करण्याकरिता लागणारे घटक

 • मळी ः १० किलो
 • युरिया ः १ किलो
 • खनिज मिश्रण ः १किलो
 • मीठ ः १ किलो
 • वरिल सर्व घटक ३५-४५ लिटर स्वच्छ व ताज्या पाण्यात मिसळावे. मुख्यत: युरिया चांगल्या प्रकारे पाण्यात ढवळून विरघळून घ्यावा.
 • युरिया चांगल्याप्रकारे विरघळला नाही, तर द्रावणातील युरियाचे प्रमाण कमी जास्त होईल ते समप्रमाणात राहणार नाही, यामुळे युरियाची विषबाधा होण्याचा धोका राहतो. यासाठी द्रावण पूर्णपणे विरळेपर्यंत ढवळणे खूप गरजेचे आहे.
 • तयार केलेले द्रावण पसरलेल्या चोथ्यावर समप्रमाणात झारीने किवा सडा टाकल्याप्रमाणे शिंपडावे.
 • द्रावण शिंपडताना चोथा वरखाली करावा जेणेकरून द्रावण सर्व चोथ्यामध्ये पूर्णपणे मिसळेल. याप्रमाणे चोथ्याचे थरावर थर टाकत व त्यासहित द्रावण शिंपडत रहावे.
 • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चोथा काही काळ २-४ तास किंवा सुकेपर्यंत झाकून ठेवावा. त्यानंतरच हा प्रक्रियायुक्त चारा जनावरांना गरजेनुसार खाऊ घालावा.

फायदे

 • ऊस चोथ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण काहीच नसते. परंतु प्रक्रिया केल्यामुळे नवीन प्रथिनांचा स्त्रोत जनावरांसाठी उपलब्ध होतो.
 • युरिया-मळी प्रक्रिया ही अत्यंत सोपी व कमी खर्चाची पद्धत असून, यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज नसते.
 • उसाचा चोथा हा सामान्यत: पेपर, बोर्ड, भट्टीमध्ये जाळण्यासाठी वापरला जातो, जर यावर प्रक्रिया केली गेली तर तो सहजरीत्या जनावरांच्या खाद्यात येऊ शकतो.
 • आहाराचा व जनावरांच्या वाढीचा, दूध उत्पादनाचा व प्रजोत्पादनाचा थेट संबंध आहे. जर जनावरांच्या आहारात संतुलित खाद्य देण्यात आले तर त्यांची वाढ व उत्पादन योग्य राखले जाईल. परिणामी दूध उत्पादन ही वाढण्यास मदत होते.
 • संतुलित आहार मिळाल्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगल्या प्रकारे राखले जाते. जनावरे निरोगी राहतात. कोणत्याही आजाराला बळी पडत नाही.

संपर्क ः डॉ. मंजूषा ढगे, ९०६७०३७२०३
डॉ. पंढरीनाथ राठोड, ८८०६३२८२६६
(पशुपोषण शास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

 


इतर कृषिपूरक
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...
कोंबडी खत : सेंद्रिय खताचा उत्तम...कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती...
शेळ्यांमध्ये रोग निदानात्मक चाचणी,...रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे  ...
‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहापक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग...
पोल्ट्रीशेडमध्ये जैवसुरक्षा आवश्यकजैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक,...
लेयर कोंबड्यांसाठी संतुलित आहारकोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि...
शेळ्यांमधील पैदास तंत्रशेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न...
शेळीपालनाचे नियोजनमाझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे....
जनावरांमधील हिवाळी अतिसारहिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा...
शेवाळ उत्पादन प्रक्रियाशेवाळाचे उत्पादन हे पोषक अन्न, औषधे, जैवइंधनासाठी...
अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये...
शेळ्या, मेंढ्यांमधील देवी आजारदेवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप...
जनावरांच्या कातडी आजारांवरील उपचारजनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात....
जनावरांमधील क्षयरोगजनावरांमधील क्षयरोग हा एक दीर्घकालीन आजार असून,...
कॅल्शिअम कमतरतेमुळे होतो दुग्धज्वरदुग्धज्वर हा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने...