agriculture story in marathi, pune market comitee is a potential market for sweet orange | Agrowon

मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी उलाढाल

गणेश कोरे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. त्यासाठी पुणे-गुलटेकडीची बाजारपेठ मोठी व महत्त्वाची आहे. येथून राज्याच्या विविध भागांना व राज्यांना मोसंबी पाठवण्यात येते. काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजार समितीत २०१८-१९ मध्ये २४ कोटी ४९ लाख १२ हजार रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली आहे.
 

मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. त्यासाठी पुणे-गुलटेकडीची बाजारपेठ मोठी व महत्त्वाची आहे. येथून राज्याच्या विविध भागांना व राज्यांना मोसंबी पाठवण्यात येते. काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजार समितीत २०१८-१९ मध्ये २४ कोटी ४९ लाख १२ हजार रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली आहे.
 
सध्याच्या थंडीत विविध फळांच्या हंगामात बाजारपेठेत संत्रा, मोसंबी यांची अधिक रेलचेल दिसून येत आहे. नागपुरी संत्र्याच्या तुलनेत किनो संत्रा अधिक प्रमाणात दिसतो आहे. मोसंबीही त्यात उठून दिसते आहे. मोसंबी शेतीसाठी मराठवाडा, नगर आदी भाग विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र पुणे- गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मोसंबीची मोठी बाजारपेठ आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसह नगर जिल्ह्यातून येथे मोठ्या प्रमाणावर मोसंबीची आवक होते. आंबिया आणि मृग अशा दोन बहारांमध्ये मोसंबीचे उत्पादन होत असल्याने वर्षभर बाजारात हे फळ उपलब्ध असते. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी अंबिया बहाराचे उत्पादन कमी करून मृग बहारावर भर देत असल्याचे चित्र आहे.

ऑगस्टपासून हंगामास सुरुवात
पुणे बाजार समितीमधील प्रमुख अडतदार सोनू ढमढेरे म्हणाले, की मोसंबीचा प्रमुख हंगाम अंबिया बहाराचा असतो. या ळी औरंगाबाद आणि जालना परिसरासह नगर जिल्ह्यातून मोसंबीची आवक सुरू होते. ऑगस्ट ते जानेवारी असा हा कालावधी असतो. ऑगस्टच्या मध्यावधीत मोसंबीच्या आवकेला प्रारंभ होतो. सप्टेंबरपर्यंत दररोज बाजारात सुमारे ४० टनांपर्यंत आवक होते. यावेळी प्रतितीन डझनाला १२० ते २८० रुपये; तर चार डझनांना ४० ते १२० रुपये दर मिळतो. पहिल्या टप्प्यातील आवक हिरव्या फळांची, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये परिपक्व पिवळ्या रसदार फळांची आवक सुरू होते. त्यावेळी प्रतितीन व चार डझनांना अनुक्रमे १८० ते ३५० रूपये व ६० ते १६० रुपये दर मिळतो. यावेळी आवकही वाढलेली असते. हंगामाच्या तिसऱ्या टप्प्यात आवक कमी होऊन हेच दर प्रतितीन डझनांना २२० ते ४००; तर चार डझनांना १०० ते २२० पर्यंत येऊन ठेपतात.

फेब्रुवारी ते मे हंगाम
अंबिया बहार संपल्यानंतर साधारण फेब्रुवारीत मृग बहारातील फळांची आवक सुरू होते. मार्चपर्यंत ती दररोज ३० ते ४० टनांपर्यंत राहते. एप्रिल-मे मध्ये तापमान वाढायला सुरुवात झाल्यानंतर मागणी व दर वाढतात. त्यावेळी प्रतितीन आणि चार डझनांना अनुक्रमे १८० ते ४०० आणि ८० ते १८० रुपये दर असतात.

जून-जुलै हंगाम
जून-जुलैमध्ये बिगरहंगाम असतो. या हंगामात आंध्र प्रदेशातून आवक दररोज २० टनांपर्यंत आवक असते. आकाराने मोठी आणि चवीला गोड असणाऱ्या या मोसंबीला प्रतितीन डझन व चार डझनांमागे अनुक्रमे १८० ते ३५० आणि ८० ते १६० रुपये दर मिळतो.

प्रतवारी
मोठ्या व लहान आकारात प्रतवारी होते. मोठ्या आकाराच्या मोसंबीची तीन डझनाने; तर लहान आकाराच्या मोसंबीची चार डझनांने विक्री केली होते. तीन डझन मोसंबीचे वजन चार ते साडेसात किलोपर्यंत; तर चार डझनाच्या संत्र्यांचे वजन ३ ते साडेचार किलो एवढे असते.

अशी होते विक्री
पुणे बाजार समितीमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड उपनगरांसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगावपर्यंत मोसंबी पाठविण्यात येते. परराज्यांमध्ये गोवा आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर खरेदी होते.

प्रतिक्रिया
माझी मोसंबीची २५० झाडे आहेत. गेल्या वर्षी दुष्काळामुळे अंबिया बहारात चांगले उत्पादन मिळाले नाही. अवकाळी पावसानेही फटका दिला. दिवाळीनंतर झालेल्या पावसाचा फायदा मृगबहाराला मिळाला. विहिरी-तळी भरल्याने बागांना पाणी मिळाले. त्यामुळे अंबिया बहारातील नुकसान मृग बहारात भरून निघेल.
-अंकुश सराटे
सोमनाथ जळगाव, ता. जि. जालना

उलाढाल
अलीकडील काळातील अभ्यास करता पुणे बाजार समितीतील २०१४-१५ मधील
मोसंबीची उलाढाल १५ कोटी ४ लाख २५ हजार रुपये होती. सन २०१७-१८
मध्ये ती १८ कोटी ८२ लाख ८६ हजार; तर २०१८-१९ मध्ये ती २४ कोटी ४९ लाख १२ हजार रुपयांवर पोचली.

संपर्क- पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती-
०२० - २४२६०२०३, २४२६५६६८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट...पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
दुष्काळात शेतीला साथ पोल्ट्री,...औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील चव्हाण कुटुंब...
शेतीपेक्षा दुग्धव्यवसायातून उभारीभाडेतत्त्वावर रोपवाटिका व्यवसाय सुरू असताना...
काटेकोर पाणी व्यवस्थापनातून...''पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका कायम दुष्काळी...
ऑयस्टर मशरूम निर्मितीसह तयार केले...अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अभियंता...
प्री कुलिंग, रिफर व्हॅनद्वारे...महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
आंबा, काजूसह भाज्यांची प्रयोगशील शेतीशिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील माधव...
एक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेतीखानापूर (जि. पुणे) येथील कागदी बंधूंनी पिरॅमिड...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
दुर्दम्य इच्छाशक्ती, अविरत परिश्रमांतून...अलकुड (एम) (जि. सांगली) येथील महेश पाटील यांनी...
काटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा...निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
शेतमाल विक्रीसाठी सर्वसमावेशक धोरणजर्मनीमधील शेतमाल विक्री ही फिव्होजी मार्केटिंग...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...
सेंद्रिय शेतीला दिली प्रक्रिया...तेलगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील बालासाहेब...
ज्वारीची बिस्किटे अमेरिकेत पाठविणारा...बारामती येथील महेश साळुंके यांनी बेकरी, केक व...
नागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...
वयाच्या ६१ व्या वर्षीही प्रयोगशील...पुणे जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण व दुष्काळी शिरूर...