ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली प्रयोगशाळा

राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्यामध्ये ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचे ताजे व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते. त्यामुळे परिणाम प्रभावी मिळतो. यामुळे बाहेरून ट्रायकोडर्मा खरेदी करण्याची गरज संपली असून त्यावरील खर्चातही बचत झाली आहे.
पहिल्या छायाचित्रात ट्रायकोडर्माचे मदर कल्चर. दुसऱ्या छायाचित्रात  राहुल रसाळ प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन घेतात.
पहिल्या छायाचित्रात ट्रायकोडर्माचे मदर कल्चर. दुसऱ्या छायाचित्रात राहुल रसाळ प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन घेतात.

राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्यामध्ये ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचे ताजे व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते. त्यामुळे परिणाम प्रभावी मिळतो. यामुळे बाहेरून ट्रायकोडर्मा खरेदी करण्याची गरज संपली असून त्यावरील खर्चातही बचत झाली आहे. असे होते ट्रायकोडर्माचे उत्पादन बांधावरील प्रयोगशाळा ही पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांची संकल्पना आहे. राहुल यांनी त्यांच्याकडून ट्रायकोडर्मा निर्मितीचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले. सुमारे सहा महिने अभ्यास केला. प्रयोगशाळेत गॅस शेगडी, पेट्री प्लेट्स, टेस्ट ट्यूब्ज, बन्सेन बर्नर, इनॉक्यूलेटिंग नीडल, ऑटोक्लेव्ह (स्वयंपाकासाठीचा किंवा इडलीचा प्रेशर कुकरही चालतो.), कोनिकल फ्लास्कस, मिश्रण ढवळण्यासाठी रोटरी शेकर या उपकरणांची गरज असते. एका शेकरमध्ये १६ फ्लास्क बसतात. प्रति फ्लास्कमध्ये एका एकरासाठी पुरेशा २०० मिलि ट्रायकोडर्माचे उत्पादन होते. म्हणजेच ४८ तासांच्या बॅचमध्ये १६ फ्लास्कद्वारे १६ एकरांसाठी लागणारी ट्रायकोडर्मा बुरशी उत्पादित होते. पण ही एकरी २०० मिलि बुरशी शुद्ध स्वरूपातील असते. त्यावर फॉर्म्यूलेशन व फंगल मेडिया (खाद्य) प्रक्रिया करून प्रति लिटरसाठी द्रावण तयार केले जाते. डॉ. चव्हाण यांच्यासोबत समन्वय साधून त्याची गुणवत्ता तपासून मगच वापर केला जातो. ट्रायकोडर्माचे ‘मदर कल्चर’ पेट्री प्लेटमध्ये ठेवले जाते. ते ४ ते १० अंश सेल्सिअस तापमानाला (फ्रीजमध्ये) सहा महिन्यांपर्यंत साठवता येते. प्रयोगशाळेचे महत्त्व, फायदे राहुल सांगतात, की जमिनीतील फ्युजारियम, कॉलर रॉट आदी विविध रोगांचे नियंत्रण ट्रायकोडर्माद्वारे आम्ही करतो. रासायनिक अवशेषांचे विघटन करण्यासाठीही ही बुरशी उपयोगी ठरते. पुढील काळात प्रयोगशाळेचा मोठ्या स्तरावर विस्तार करणार असून डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून मेटारायझियम, स्युडोमोनास आदी मित्रबुरशीही बनविण्याचा मानस आहे. राहुल सांगतात, की पूर्वी आम्ही विकतचा ट्रायकोडर्मा वापरायचो. स्लरीसाठी तो २०० लिटरच्या बॅरेलमध्ये ओतायचो. दोन किलो गूळ, एक लिटर ट्रायको घेऊन बांबू काठीच्या साह्याने मिश्रण आठ दिवस ढवळत राहायचो. बाजारातील ट्रायको हा काही दिवसांपूर्वी बनविलेली असू शकतो. आता आमच्याच प्रयोगशाळेत ४८ तासांत बनवितो आणि ५० व्या तासाला तो शेतात जाऊ शकतो. ट्रायकोडर्माचे ‘काउंट’ देखील योग्य मिळतात. ठिबक किंवा फवारणीद्वारे आठवड्यातून एकदा त्याचा वापर होतो साठ एकरांसाठी ट्रायकोडर्मा विकत आणण्याचा वार्षिक खर्च ६० एकरांसाठी सुमारे एक लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी नसायचा. आता प्रयोगशाळा उभारण्यासाठी गुंतवणुकीचाच काय तो सुरुवातीचा ५५ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च आहे. आठवड्यातून दोन तास जरी निर्मिती केली तरी संपूर्ण शेतासाठीची गरज पूर्ण होऊ शकते. त्याचे परिणाम उत्पादन व गुणवत्तेच्या रूपाने दिसून आले आहेत. प्रतिक्रिया शेतकरी स्वतः प्रयोगशाळा उभारून जैविक घटक तयार करू शकतात. आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून राज्यात सहा प्रयोगशाळा उभारल्या आहेत. -डॉ. संतोष चव्हाण   फवारणीसाठी डेल्टा टी चार्टचा उपयोग कीडनाशक फवारणीचा ‘रिझल्ट’ अचूक मिळावा असा राहुल रसाळ यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील ‘डेल्टा टी चार्ट’चा संदर्भही ते वापरतात. हा चार्ट म्हणजे सापेक्ष आर्द्रता व तापमान यांचा परस्परसंबंध दाखवणारा आलेख व व त्यावरून फवारणीसाठीची अनुकूल स्थिती दर्शविणारा असतो. आपल्या हवामान केंद्रातील हवामान घटकांच्या नोंदींशी त्यांचा मेळ घालून फवारणीची वेळ निश्‍चित करता येते. उदा. १) तापमान २५ अंश, आर्द्रता ५० टक्के असेल, तर चार्टमधील पिवळ्या रंगानुसार ही फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे. २) तापमान २५ अंश व आर्द्रता ४० टक्के असेल, तर ती चार्टमधील राखाडी रंगाला ती ‘मॅच’ होते. (मार्जिनल कंडिशन). ३) तापमान तेच मात्र आर्द्रता ३० टक्क्यांवर गेली, तर ‘डेल्टा टी कंडिशन फवारणीसाठी अनुकूल नाही. राहुल सांगतात, की फवारणी यंत्राच्या नोझल्समधून बाहेर पडणारे थेंब अत्यंत सूक्ष्म असतात. तापमान अधिक व आर्द्रता कमी असल्यास फवारलेल्या द्रावणाचे बाष्पीभवन होऊन ते वाया जाते. कीडनाशकांवरील पैसेही वाया जातात. कीडनाशकाचे ‘कव्हरेज’ पिकाला योग्य मिळाले पाहिजे. आंतरप्रवाही रसायन वनस्पतीच्या अंतर्भागात गेले पाहिजे. अशावेळी ‘डेल्टा टी’चा आधार घेतो. कीटकनाशके संध्याकाळनंतर, बुरशीनाशके सकाळी व ‘पीजीआर’ वर्गातील उत्पादनांची संध्याकाळी चार वाजता फवारणी करतो. संध्याकाळनंतर कीटकनाशक फवारण्याचा फायदा म्हणजे कीटक आपली जागा सोडू शकत नाहीत. रात्री बल्बच्या प्रकाशात ते बाहेर पडले तरी नियंत्रण होते. दिवसा फवारणी केल्यास रसायनाच्या गंधाने ते अन्यत्र स्थलांतर करू शकतात. काही वेळा अपेक्षित आर्द्रता (५० टक्के) रात्री ८ ते ९ वाजता मिळते. मग रात्री उशिरापर्यंतही फवारणी सुरू ठेवली. कीडनाशक योग्यवेळी व योग्य प्रकारे फवारल्यास त्याची संख्या आटोक्यात राहते. योग्य डोसमध्ये परिणाम मिळतो. मालात ‘रेसिड्यू’ राहत नाहीत. ‘कॉम्बिनेशन’ नाही राहुल सांगतात, की आम्ही कीडनाशके एकमेकांत मिसळून वापरत नाही. प्रत्येकाची स्वतंत्र फवारणीच घेतो. भले दिवसाला दोन- तीन स्प्रे झाले तरी चालतील. कीडनाशक वापरताना मजुरी, डिझेल आदी खर्च, मेहनतही वाढेल. पण योग्य ‘रिझल्ट’साठी ते गरजेचे आहे.

संपर्क- राहुल रसाळ- ९७६६५५०६२४ उद्याच्या भागात- आरओ प्लांट व सेंद्रिय स्लरीची निर्मिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com