agriculture story in marathi, the rainfed area farmers of Sangli District are shifted to floriculture to raise the income & livelyhood. | Agrowon

फूलशेतीतून मिळाली नवी दिशा

अभिजित डाके
बुधवार, 1 जुलै 2020

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष, डाळिंब या पिकांबरोबरच फुलांचा गंध दरवळू लागला आहे. त्यातून आर्थिक बदल घडू लागला आहे. मोगरा, निशिगंध, झेंडू आदींच्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष, डाळिंब या पिकांबरोबरच फुलांचा गंध दरवळू लागला आहे. त्यातून आर्थिक बदल घडू लागला आहे. मोगरा, निशिगंध, झेंडू आदींच्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे.
 
सांगली जिल्हा ऊस, डाळिंब, द्राक्ष, भात आणि हळदीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात ५५० हेक्टर क्षेत्रांवर आता फूलशेतीही होऊ लागली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे अवर्षण तालुके. योजनांचं पाणी आलं त्यामुळे डाळिंब, द्राक्ष शेती वाढली. आज याच तालुक्यात लालचुटूक डाळिंबे व रसाळ द्राक्षे पिकू लागली. येळवी (ता. जत) येथील रविकिरण पवार यांनी ताजे किंवा अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने काही पर्यायी पिकांचा अभ्यास सुरू केला. त्यातून मोगऱ्याचे पीक पुढे आले.
मुंबईची बाजारपेठ त्यासाठी उपलब्ध आहे. सरासरी २०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो दराने विक्री होते.

शेतकरी गटाची स्थापना
गावातील शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडून प्रेरणा घेत श्रीराज भाजीपाला व मोगरा उत्पादक गटाची स्थापना केली. गटात २२ शेतकरी. कोरडवाहू, माळरान शेती. शाश्वत उत्पन्नासाठी त्यांनीही मोगरा लागवडीचा पर्याय निवडला. आज गटाच्या माध्यमातून सुमारे १० एकरांवर मोगऱ्याची शेती फुलली आहे. गावासह पंचक्रोशीतील सुमारे ५० हून अधिक महिलांच्या हाताला काम मिळाले. बळीराजा आणि मजूर अशी दोन्ही घरं चालू लागली. फुलांची विक्री, मुंबई, पुणे यासह मिरज येथील फूल मार्केटमध्ये विक्री होते. एकरी ५० हजारांवर ते काहीवेळा लाख रुपयांची उलाढाल होते. मोगरा काढणीनंतर दर्जा टिकावा यासाठी प्रिकुलिंग युनिटमध्ये ठेऊन पॅकिंग करून ‘मार्केटिंग’ केले जाते. बहुतांश शेतकरी एकमेकांच्या साह्याने बदल स्वीकारत असल्याचे दिसते आहे.

भाजीपाला शेतीची जोड
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद असल्याने फुलांची विक्री करता आली नाही. मग भाजीपाल्याची जोड दिली. थेट विक्रीचा नवा अनुभव त्यातून मिळाला. हाच अनुभव भविष्यात मोठा दुवा ठरणार आहे. विक्रीबरोबर गावातील आर्थिक दृष्ट्य़ा गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना मोफत भाजीपाला देण्याचे कामही या शेतकऱ्यांनी केले.

फूलशेतीचा ध्यास
कवेठमहांकाळ तालुक्यात फुलशेतीखाली २९ हेक्टर क्षेत्र आहे. विजय इंगवले आणि त्यांचा मित्रपरिवार फूलशेतीसाठी पुढे आले आहेत. गुलाब, निशिगंध, गलांडा यासारख्या फुलांची शेती ते करू लागले आहे. फुलांना बारमाही मागणी असते. मिरज तालुक्याचा पश्चिम भाग अनेक वर्षांपासून भाजीपाला आणि फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तुंग, कसबेडिग्रज, सावळवाडी, कवठेपिरान या परिसरात झेंडू सह निशिगंधाचा सुगंध मोठ्या प्रमाणात दरवळतो. कवठेपिरान मधील शेतकरी अकबर मुजावर सांगतात की आमच्या भागात ऊस प्रामुख्याने घेतात. परिसरात आणि मित्राकडील फूलशेती पाहून ती करण्याचा निर्धार केला. लग्नमंडपाची सजावट, जयंती सह विविध कार्यक्रमांची सजावट करण्यास सुरुवात केली. यातून उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ झाली. बाजारपेठेतील मागणी ओळखून झेंडू, ॲस्टर, गलांडा फुलांची लागवड केली. काहीवेळा बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून २० ते ८० रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जाते. जिल्ह्यात अशा बदलत्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे.


इतर यशोगाथा
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...