पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला फायदेशीर

ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पुणे जिल्ह्यात देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील रमेश कोल्हे यांनी त्यादृष्टीने उसशेतीत यांत्रिकीकरण केले आहे. विशेषतः पाचटाची कुट्टी करण्यासाठी तसेच खोडवा उसाची खोडकी काढण्यासाठी त्यांचा आधुनिक यंत्राचा वापर फायदेशीर ठरू लागला आहे.
ऊस पाचटाची कुट्टी करणाऱ्या यंत्रासमवेत कोल्हे दांपत्य.
ऊस पाचटाची कुट्टी करणाऱ्या यंत्रासमवेत कोल्हे दांपत्य.

ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पुणे जिल्ह्यात देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील रमेश कोल्हे यांनी त्यादृष्टीने उसशेतीत यांत्रिकीकरण केले आहे. विशेषतः पाचटाची कुट्टी करण्यासाठी तसेच खोडवा उसाची खोडकी काढण्यासाठी त्यांचा आधुनिक यंत्राचा वापर फायदेशीर ठरू लागला आहे.   पुणे जिल्ह्यात दौड तालुक्यातील देऊळगाव राजे या गावाची लोकसंख्या साधारणपणे सात हजारांच्या आसपास आहे. गावात प्रामुख्याने ऊसाचे मुख्य पीक घेण्यात येते. उत्तम व्यवस्थापनातून काही शेतकऱ्यांनी एकरी ७५ टन ते १०० टन उत्पादनापर्यंत मजल गाठली आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांत अधिक उत्पादन घेण्याची निरोगी स्पर्धा दिसू लागली आहे ही समाधानाची बाब आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना नवनवीन पद्धतीही शेतकरी अवलंबित आहे. कोल्हे यांच्या ऊसशेतीतील यांत्रिकीकरण गावातील प्रगतशील शेतकरी अशी ओळख असलेले रमेश दादासाहेब कोल्हे यांची एकूण चार एकर बागायती शेती आहे. पैकी तीन ते साडेतीन एकर क्षेत्रावर ते ऊस गेतात. एकरी शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवूनच ते व्यवस्थापन पद्धती अंगीकारतात. त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन बदल करण्याचा प्रयत्न असतो. ऊसशेतीत कोल्हे यांनी जवळपास १४ ते १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यातून ट्रॅक्टर, पाचटाची कुट्टी करणारे यंत्र, रोटावेटर, नांगर, डबल पल्टी गर, कल्टिवेटर, सरी पाडणारे अशा यंत्रांची खरेदी केली आहे. त्याद्वारे शेतीतील मजूरबळ, खर्च व वेळ कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पाचटाची कुट्टी करणारे यंत्र

  • सुमारे दीड लाख रुपये खर्चून हे यंत्र दोन वर्षांपूर्वी घेतले आहे. त्याचे साधारणपणे ४८० किलो एवढे वजन आहे. यामध्ये वाय आकाराच्या पातीचा (ब्लेड) वापर केला आहे. यात एकूण वीस ब्लेड्‌स आहेत. हे यंत्र सहा फुटाच्या लांबीमध्ये काम करते. त्याचा वेग २००० आरपीएम एवढा आहे.साहजिकच छोटे दगड वेगाने उडून त्याचा ट्रॅक्टरचालकाला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून
  • यंत्राला संरक्षणात्मक पत्र्यासारखे आच्छादन दिले आहे. सुमारे ५५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी यंत्राचा वापर करता येतो. यंत्र खरेदी केल्यानंतर नंतरच्या देखभालीचा खर्च फारसा नाही.
  • यंत्राचे होणारे फायदे
  • हे यंत्र उसाच्या पाचटाची कुट्टी करून त्याचे एक इंच आकाराचे बारीक तुकडे करते. युरिया, जिवाणू कल्चर आदींचा वापर करून हे पाचट दोन महिन्यांच्या कालावधीत कुजते. त्याचा खत म्हणून चांगल्या प्रकारे वापर होतो.
  • खोडकी कापून त्याचा भुगा करते. खोडवा उसात फुटव्याजवळ असलेले पाचट बाजूला सरीत दाबते. तसेच उसाच्या बगलेत असलेली माती पाचटावर टाकते. त्यामुळे फुटवा सशक्तपणे येऊन पीक जोमात येते.
  • ताग, धैचा आदी हिरवळीच्या पिकांची तसेच गव्हाच्या काडाची कुट्टी करण्यासाठी फायदा होतो.
  • यंत्राची रचना वजनदार व मजबूत असल्याने चालवताना ते हादरत नाही. अपेक्षित कुट्टी करण्यास मदत होते.
  •  पाती आयात केलेली असून कार्यक्षमता चांगली मिळते.
  • एकरी अडीच तासांत कुट्टी करण्याचे काम होते. कुट्टी व खोडकी ‘कट’ करणे यामुळे जमिनीला
  • एकरी सुमारे तीन टनांपर्यंत सेंद्रिय खत उपलब्ध होते.
  • जमीन सुपीकतेवर भर याशिवाय उसाची सरी काढण्यासाठी यंत्राचा वापर होतो. दिवसभरात सुमारे आठ एकरांवरील काम त्यामुळे होते. सध्या पाच फुटी सरी ठेवली जाते. डबल फाळ नांगर हा खोल मशागत करण्याचे काम करतो. एकूणच यंत्रांच्या वापरातून जमिनीच्या सुपीकतेत वाढ करण्याचा प्रयत्न आहे. पाचटामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. ठिबक सिंचन आहेच. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य प्रकारे होतो. सेंद्रिय कर्बवाढीस चालना मिळाली आहे. जमीन जैविक पद्धतीने क्रियाशील बनल्याने पिकांची रोग- कीड प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशक व मजुरी खर्चही मोठा असतो. पाचटामुळे तणांच्या वाढीसही प्रतिबंध होऊन तणनाशकांचा वापर तुलनेने कमी झाला आहे. एकरी एकूण उत्पादन खर्च किमान ८० हजार रुपये असतो. सेंद्रिय मल्चिंग केल्याने या खर्चात १० टक्के तरी निश्‍चित बचत झाली आहे. भाडेतत्त्वावर यंत्रे सर्वच शेतकऱ्यांना यंत्रे खरेदी करणे शक्य नसते. अशा शेतकऱ्यांसाठी कोल्हे भाडेतत्त्वावर यंत्रे चालवण्यासाठी देत आहेत. यात यंत्राच्या प्रकारानुसार व वापरानुसार एकरी १००० ते २०० रुपये दर आकारले जातात. त्यातून आर्थिक उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार झाला आहे. ऊस उत्पादनात वाढ कोल्हे फुले २६५ वाणाची लागवड असते. शक्यतो आडसाली हंगामच ते घेतात. पूर्वी त्यांचे ऊसाचे उत्पादन एकरी ५० ते ६० टनांपर्यंत असायचे. अलीकडील वर्षांत योग्य व्यवस्थापानातून वाढ घेणे त्यांना शक्य झाले आहे. मागील वर्षी एकरी ९० टन उत्पादन घेतले आहे. दौंड येथील सहकारी साखर कारखान्याला ते ऊस देतात. मागील वर्षी त्यांना प्रति टन २३०० रुपये दर मिळाला होता. संपर्क- रमेश कोल्हे, ९२२६२५६३५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com