मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
टेक्नोवन
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी निचरा प्रणाली अन् मत्स्यसंवर्धन
मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने क्षारपड जमिनीमध्ये मत्स्यसंवर्धन व मत्स्यबीज उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये पृष्ठभागाखालील निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून क्षारपड जमिनीची सुधारणा होते. हे निचरा झालेले पाणी संबंधित क्षेत्रातील तलावात सोडून मत्स्यसंवर्धनही करता येते.
मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने क्षारपड जमिनीमध्ये मत्स्यसंवर्धन व मत्स्यबीज उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये पृष्ठभागाखालील निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून क्षारपड जमिनीची सुधारणा होते. हे निचरा झालेले पाणी संबंधित क्षेत्रातील तलावात सोडून मत्स्यसंवर्धनही करता येते.
गेल्या काही वर्षांपासून लागवडीखालील क्षेत्र अति पाणी आणि रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरामुळे क्षारपड होत आहेत. त्यामुळे या जमिनीत पीक लागवडीस मर्यादा आलेल्या आहेत. अशा जमिनीत मत्स्यसंवर्धन उपयुक्त ठरू शकते. या दृष्टीने राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी योजना (घटक -२) अंतर्गत केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने एक प्रकल्प राबविला. या प्रकल्पांतर्गत क्षारपड जमिनीमध्ये मत्स्यसंवर्धन व मत्स्यबीज उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. क्षारपड जमिनीमध्ये मत्स्यसंवर्धन व मत्स्यबीज उत्पादनाचे तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. पावसाची अनियमितता आणि पाणी कमतरतेमुळे क्षारपड शेतजमिनीचा मत्स्यसंवर्धन व मत्स्यबीज उत्पादनासाठी वापर करण्यावर मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी पृष्ठभागाखालील निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर आणि मत्स्यसंवर्धनाचे तंत्र विकसित करण्यात आले. या तंत्रज्ञानाचा प्रकल्पही राबविण्यात येत आहे.
असे आहे तंत्रज्ञान ः
- जमिनीच्या पृष्ठभागाखालील प्लॅस्टिक नलिकांचे जाळे तयार करून जमिनीतील न झिरपणारे पाणी व क्षार यांचा निचरा करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. पृष्ठभागाखालील निचरा प्रणालीचा वापर हरियाणा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतजमिनीतील क्षार व पाण्याचा निचरा करून शेतजमीन पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. पृष्ठभागाखालील निचरा प्रणालीचा वापर आणि मत्स्यसंवर्धनाचे एकत्रीकरण फायदेशीर ठरते.
- पृष्ठभागाखालील निचरा प्रणालीमध्ये क्षारपड जमिनीतील क्षार आणि पाणी शेतजमिनीबाहेर काढण्यासाठी लांब कालवे (५ ते १० किमी) तयार करावे लागतात, परंतु याकरिता मोठी आर्थिक गुंतवणूक आणि जमिनीचा वापर होतो. तसेच क्षारपड जमीन सुधारण्यासाठी लागणारा वेळही (३ ते४ वर्षे) खूप असतो. हे लक्षात घेऊन पृष्ठभागाखालील निचरा प्रणालीचे एकत्रीकरण आणि मत्स्यसंवर्धन केल्याने क्षारपड जमिनीतील क्षार आणि पाणी शेतजमिनी बाहेर टाकण्यासाठी लागणार खर्च व जमिनीचा अपव्यय टाळता येतो. तसेच क्षारपड जमीन एक वर्षात सुधारण्यास सुरवात होते.
- जी जमीन क्षार तसेच न झिरपणाऱ्या पाण्यापासून मुक्त करावयाची आहे, अशा जमिनीत ठरावीक खोलीमध्ये प्लॅस्टिकच्या नळ्या एकमेकींस समांतर जोडून एका मोठ्या नळीस जोडल्या जातात. समांतर जोडलेल्या नळ्यांतून जमिनीतील क्षार व पाणी यांचा निचरा मोठ्या नळीद्वारे जमिनीच्या बाहेर काढता येते. क्षारपड जमिनीतून निचरा झालेले पाणी मोठ्या नळीच्या माध्यमातून संबंधीत जमिनीच्या क्षेत्राजवळच केलेल्या मत्स्यतलावात सोडले जाते. या तलावात मत्स्यउत्पादन घेता येते. साधारणपणे दहा एकर क्षारपड क्षेत्र असेल तर त्यामध्ये २० गुंठे क्षेत्रावर मत्स्यसंवर्धन तलाव करावा.
पृष्ठभागाखालील निचरा प्रणाली आणि मत्स्यसंवर्धनाचे फायदे :
- तंत्रज्ञानाचा वापर करून क्षारपड जमीन सुधारण्यास मदत होते. अशा जमिनीत पीक लागवड करता येते.
- क्षारपड जमिनीतून निचरा झालेले पाणी मत्स्यसंवर्धनासाठी वापरता येते. त्यामुळे मत्स्यसंवर्धनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटतो.
- पिकांसाठी वापरलेल्या खतांचा निचरा या पाण्यातून होतो. हे पाणी मत्स्यसंवर्धनासाठी अत्यंत उत्पादनक्षम असते. त्यामुळे माशांच्या नैसर्गिक खाद्यनिर्मितीसाठी अतिरिक्त खतांची आवश्यकता भासत नाही.
डॉ. गौरी शेलार, ७६६६०९६७८९
डॉ. ए. के. रेड्डी ः९३२४७२५२२९
(केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, वर्सोवा, मुंबई)
फोटो गॅलरी
- 1 of 21
- ››