‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा ठोंबरे ब्रॅंड 

'क्‍युआर कोड'द्वारे रेसिड्यू फ्री प्रमाणपत्र ग्राहकाला हे सीताफळ ‘रेसिड्यू फ्री’ आहे याची खात्री पटावी यासाठी ठोंबरे यांनीबॉक्‍सवर 'क्‍युआर कोड' दिला आहे. त्याद्वारे ‘फार्म’ला मिळालेले ‘रेसिड्यू फ्री’ प्रमाणपत्र पाहण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सीताफळाची मार्केटमध्ये विश्‍वासार्हता वाढली आहे.
राजेंद्र ठोंबरे यांनी पिकविलेली दर्जेदार सीताफळे
राजेंद्र ठोंबरे यांनी पिकविलेली दर्जेदार सीताफळे

अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि. सोलापूर) येथील राजेंद्र ठोंबरे यांनी द्राक्षपिकात घेतला. शेती कमी जोखमीची व्हावी, पाण्याची गरज कमी असावी व उत्पन्नही मिळावे या हेतूने त्यांनी सीताफळाची निवड केली. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन घेण्याबरोबर आकर्षक पॅकिंग केले. ग्राहकाला खात्री पटावी यासाठी त्यावर 'क्‍युआर कोड' व रेसिड्यू फ्री’ प्रमाणपत्र पाहण्याची संधीही उपलब्ध केली. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसह ग्राहकांची पहिली पसंती त्यांच्या सीताफळाला मिळते आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शीपासून अवघ्या १३ किलोमीटरवर खामगाव आहे. बार्शी शहराचे मार्केट जवळ असल्याने कांदा, भाजीपाला पिकात गावाची पहिल्यापासूनच आघाडी आहे. उसाचेही जेमतेम क्षेत्र आहे. 'खामगाव सिलेक्‍शन' नावाच्या कांद्याच्या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी या गावाने मोठे नाव कमावले होते. याच गावातील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र आणि उद्योजक संतोष या ठोंबरे बंधूंनी कष्टातून सीताफळाची शेती फुलवली आहे.  ठोंबरे यांची शेती  राजेंद्र स्वतः पूर्णवेळ शेती पाहतात तर संतोष व्यवसायात मग्न असतात. दोन्ही बंधूंना पहिल्यापासूनच शेतीत सर्वाधिक रस असल्याने सातत्याने नवे प्रयोग ते करीत असतात. आधुनिक पद्धती आणि नवतंत्रज्ञानाचा वापर हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्ये राहिले आहे. ठोंबरे यांची २० एकर शेती आहे. त्यात सर्वाधिक १० एकरांवर सीताफळ आणि अन्य क्षेत्रांवर अन्य हंगामी पिके घेतली जातात. पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. सन २००५ मध्ये कलिंगडाचे एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन घेतले होते.  संकटातून सावरण्यासाठी सीताफळाची शेती  पूर्वी ठोंबरे यांची द्राक्षबाग होती. द्राक्षशेतीत मजूर खर्च अधिक होता. एकरी उत्पादन व दर यांचा मेळ बसत नव्हता. त्यातच दोन वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपीट यांमुळे हातातोंडाशी आलेले उत्पादन पूर्ण नुकसानीत गेले. मोठा फटका बसला. यातून सावरणे गरजेचे होते. प्रतिकूल परिस्थितीतून कायमचा तोडगा काढणे गरजेचे होते. त्यादृष्टीने मग सीताफळाचा विचार त्यांनी केला. परिसरात काही शेतकरी हे पीक घेत होते. त्यातूनच या पिकाचा पयार्य पुढे आला.  सीताफळ का निवडले? 

  • अवकाळी पावसात हे पीक द्राक्षाएवढे नुकसान देत नाही. 
  • पाण्याची गरज कमी असते. 
  • उत्पादन खर्च कमी, निविष्ठांचा वापर कमी. 
  • बाजारपेठ व दरही चांगले. 
  • सीताफळ बाग नियोजन 

  • सद्यःस्थितीत साडेनऊ ते दहा एकरांवर बाग 
  • सोळा बाय ८ फूट अंतरावर लागवड 
  • एकरी ३४० ते ३५० झाडे 
  • सुपर गोल्डन वाणाची निवड 
  • बक सिंचनाद्वारे पाणी 
  • अंतरानुसार एकरी ३४० रोपे एकरात बसली. 
  • गेल्यावर्षी जूनमध्ये पहिल्यांदाच बहर धरला. यंदा दुसरा बहर आहे. 
  • पाण्याचा नियंत्रित वापर. मे महिन्यात सुरवातीलाच शेणखताचा वापर. त्यानंतर कोणत्या प्रकारचे खत किमान दोन महिन्यांपर्यंत नाही. 
  • मिलीबग, फळमाशी आदी समस्या. वेळीच उपाय केल्यास वेळेत अटकाव आणता येतो. त्यासाठी दर आठ-दहा दिवसांतून एकदा फवारणी घेतली. फळमाश्‍यांसाठी गंध सापळे लावले. 
  • बागेला दर आठ-दहा दिवसांनी जीवामृताचा वापर. 
  • चार देशी गायी. त्यांचे शेण, गोमूत्र साठविण्यासाठी हौद तयार केला आहे. कंपोस्ट खतासाठीही स्वतंत्र हौद. सेंद्रिय घटकाच्या वापरामुळे सीताफळाची गुणवत्ता वाढल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. 
  • सोयाबीन, हरभऱ्याचे आंतरपीक  गेल्यावर्षी आंतरपीक म्हणून घेतलेल्या सोयाबीनचे एकरी तीन क्विंटल तर हरभऱ्याचे चार क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून पहिल्यावर्षी मुख्य बागेचा वरखर्च किमान भागला. एकूणच खते आणि कीडनाशके यांच्या अनुषंगाने बागेचा खर्च कमी राहिला.  खर्च, उत्पादन 

  • पहिल्या वर्षी रोपे व ठिबक असा ७० हजार रूपये खर्च, बाकी अन्य निविष्ठांचा खर्च कमी 
  • त्यावेळी प्रतिझाड उत्पादन- ८ ते ९ किलो 
  • यंदाचे उत्पादन- सुमारे १० एकरांत- १९ टन (मालाची विक्री) 
  • अजून सुमारे १५ टन उत्पादनाची आशा 
  • विक्री व दर 

  • सध्या सीताफळाचा बहर संपत आल्याने दर चांगले असल्याचे ठोंबरे म्हणाले. 
  • किलोला १२५ ते कमाल १६० रुपये दर मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. 
  • पॅकिंग, ब्रॅण्डिंग  सीताफळाच्या पॅकिंग आणि ब्रॅण्डिंगकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी 'ठोंबरे फार्म अँड नर्सरी' नावाने खास ब्रॅंड तयार केला आहे. दोन, चार, सहा नगांचे छोटे आणि आवश्‍यकतेनुसार २० किलो वजनाचे बॉक्‍स पॅकिंगसाठी उपलब्ध केले आहेत. बॉक्‍स हाताळताना कोठेही खराब होऊ नयेत याची काळजी घेतली आहे. त्यामुळे ताजी फळे बाजारात पोचतात.  दिल्ली, हैदराबाद मार्केट  सीताफळाला दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, पुणे, मुंबई बाजारपेठा चांगल्या आहेत. गुणवत्तेच्या सीताफळाला या बाजारात चांगला उठाव मिळतो. शिवाय पॅकिंग, ब्रॅण्डिंगद्वारे अधिक मागणी मिळवण्याची संधी राहते. गेल्यावर्षी जागेवरच सीताफळ दिले. मात्र यंदा स्वतः विक्री करण्याच्या उद्देशाने बॉक्‍स पॅकिंग करून विक्री सुरू केली. मुंबई, पुण्यापेक्षा दिल्ली आणि हैदराबादला सर्वाधिक उठाव मिळाला. आकर्षक पॅकिंगमुळे दरामध्ये साहजिकच प्रतिकिलो ५० ते ७० रुपयांपर्यंत फरक पडू शकतो असे ठोंबरे सांगतात.  संपर्क- राजेंद्र ठोंबरे-९१४६१०५९५९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com