जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत
यशोगाथा
रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा कृषी तंत्रनिकेतनचा आदर्श प्रकल्प
नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाने रासायनिक अवशेषमुक्त अन्ननिर्मिती प्रकल्प सरू केला आहे. सुमारे साडेपाच ते सात एकरांत विविध वेलवर्गीय, फळवर्गीय भाज्या, फळांचे उत्पादन त्याअंतर्गत घेण्यात येत आहे. या आरोग्यदायी मालाची सक्षम विक्री व्यवस्थाही संस्थेने उभी केली असून, ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर जोडला जात आहे.
नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाने रासायनिक अवशेषमुक्त अन्ननिर्मिती प्रकल्प सरू केला आहे. सुमारे साडेपाच ते सात एकरांत विविध वेलवर्गीय, फळवर्गीय भाज्या, फळांचे उत्पादन त्याअंतर्गत घेण्यात येत आहे. या आरोग्यदायी मालाची सक्षम विक्री व्यवस्थाही संस्थेने उभी केली असून, ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर जोडला जात आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे एक जुलै २०१७ रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने ‘एकच ध्यास, विषमुक्त शेतीचा करूया विकास’ या संकल्पनेची घोषणा संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी केली. संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कमलेश भोये यांनी रासायनिक अवशेषमुक्त शेती प्रयोगाचे काम तातडीने हाती घेतले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
प्रकल्पाची अंमलबजावणी
- कृषी तंत्रनिकेतनच्या साडेपाच ते सात एकरांत प्रकल्प अंमलबजावणी
- प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी. प्राचार्य भोये कामकाजाचा आढावा घेऊन समन्वय साधतात. प्रा. वाय. ए. झिरवाळ पीक संरक्षण, प्रा. सचिन भामरे प्रक्षेत्र व्यवस्थापन, प्रा. राजेंद्र चव्हाण पशुपालन व दुग्ध विभाग पाहतात. दोन सहायक प्रक्षेत्रावर मदतीला देण्यात आले आहेत.
- दर आठवड्याला प्रक्षेत्र आढावा बैठक घेण्यात येते. झालेली व आगामी कामे याबाबत नियोजन होते.
लागवड नियोजन :
- ग्राहकांच्या मागणीनुसार आवश्यक भाजीपाला निवड.
- प्रत्येकी २० दिवसांच्या अंतराने लागवड. त्यामुळे ग्राहकांसाठी बारमाही उपलब्धता ठेवण्याचे प्रयत्न.
- पालेवर्गीय भाजीपाला : शेपू, मेथी, पलाज, कोथिंबीर, करडई, मेथी
- भाज्यांचे प्रकार
- फळवर्गीय- वांगी, भेंडी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शेवगा
- वेलवर्गीय- वालपापडी, कारली, गिलके, भोपळा, तोंडली, डांगर
- मूळवर्गीय- मुळा, गाजर, बीट, रताळी, कांदा, लसूण, सुरण
- अन्य- आळू, कढीपत्ता, गवती चहा, सब्जा
- फळे : केळी, पपई, आंबा, आवळा
व्यवस्थापनातील बाबी
जैविक निविष्ठांचा निर्मिती
- रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर टाळून जैविक निविष्ठांचा वापर
- दरवर्षी एकरी चार ट्रेलर शेणखताचा वापर. संस्थेच्या परिसरात गायी असल्याने शेणखत उपलब्ध
- फळपिकांच्या वाढीसाठी कोंबडी खताचा गरजेनुसार वापर
- कडुनिंब, निरगुडी, एरंड, धोतरा, बेशरम, घाणेरी आदींचा वापर करून दशपर्णी अर्क निर्मिती
- जीवामृत, अमृतपाणी, स्लरी, गांडूळ खत, व्हर्मी व्हॉश, कंपोष्ट खत, निंबोळी अर्क, पुदिना, तुळस, सब्जा अर्क तयार करून त्यांचा वापर
सिंचन
- प्रक्षेत्रावर विहीर खोदण्यात आल्याने पाणीसाठा उपलब्ध. जलवाहिनीद्वारे पाणी आणले आहे.
- भाजीपाला पिकांसाठी तुषार तर फळबागांसाठी ठिबकचा वापर.
- पाण्यातील क्षार नियंत्रित करण्यासाठी सॅन्ड फिल्टर.
- गरजेनुसार ठराविक पिकांसाठी प्रवाही सिंचन.
जैविक पद्धतीने कीड नियंत्रण :
- लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मासारख्या बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया
- जीवाणू संवर्धकांचा वापर
- प्रत्येकी २० गुंठे क्षेत्रावर किडीनिहाय विविध सापळ्यांचा वापर
- झेंडू, सूर्यफूल, मोहरी यांसारख्या सापळा पिकांची लागवड
- झाडांसाठी संजीवक म्हणून ह्युमिक असिडचा वापर
काढणी नियोजन :
रंग, चव या गोष्टींवरून तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार माल टप्प्याटप्प्याने काढण्यात येतो. माल काढणीवेळी स्वच्छता, गुणवत्ता, हाताळणी, प्रतवारी या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
विक्री व्यवस्था
- हा माल आकर्षक व रासायनिक अवशेषमुक्त असतो. याच कारणाने ग्राहकांची त्यास पसंती मिळू लागली आहे. प्रक्षेत्र परिसरात उच्चभ्रू सोसायट्या आहेत. तेथील ग्राहक थेट प्रक्षेत्रावर येऊन शेतमाल खरेदी करतात. थेट विक्री व प्रिपेड ग्राहक सेवा असे पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. शहरातील अनेक ग्राहक खरेदीपूर्व थेट संपर्क साधून तो आरक्षित करतात.
- महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या होस्टेल कॅंटिनलादेखील या मालाचा पुरवठा होतो.
- महाविद्यालयीन स्टाफ हा सध्या मोठा ग्राहक आहे. प्रिपेड कार्ड सेवेत किमान ५०० रुपये भरून सभासदत्व घेता येते. सध्या स्टाफपैकी ४० जण त्याची सेवा घेत आहेत.
- दैनंदिन विक्री, भाजीपाला उपलब्धता यांच्या नोंदी रजिस्टरमध्ये ठेवण्यात येतात.
- उत्पन्नाचा ताळेबंद ठेवण्यात येऊन दैनंदिन प्राप्त झालेली रक्कम खात्यात भरण्यात येते.
- मागील वर्षी शेतमाल विक्रीतून सुमारे साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. खर्च जाऊन संस्थेला तीन लाख ७५ हजारांचा नफा मिळाला. चालू वर्षी आत्तापर्यंत दीड लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली आहे. वांगे पिकात रीकट घेऊन सहा गुंठे क्षेत्रावर ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले, असे सचिन भामरे यांनी सांगितले.
मिळविलेल्या नफ्यातून आधुनिकीकरण :
संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या परवानगीने प्रक्षेत्र आधुनिकीकरण, यंत्रे खरेदी तसेच परिसर विकास करण्यासाठी नफ्यातील रकमेचा उपयोग होत आहे. यामुळे कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयास नवी ओळख या कामाने मिळवून दिली आहे.
प्रकल्पातील ठळक बाबी
- आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर
- कमी खर्चात किफायतशीर उत्पादन
- संपूर्ण प्रक्षेत्र सीसीटीव्ही निगराणीखाली
- -पाण्याचा अधिक कार्यक्षमरीत्या वापर
- सुधारित स्वमालकीचे यांत्रिकीकरण उपलब्ध
- प्रक्षेत्रास संपूर्ण बाजूने कुंपण
- दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाची जोड
- उत्पादन ते विक्री या साखळीत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
ऑनलाइन पद्धतीने विक्रीसाठी प्रयत्न :
शहरी भागात भाजीपाला खरेदीचा ऑनलाइन ट्रेंड सुरू झाला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी निलीमाताई पवार यांच्या सूचनेनुसार एमपीव्ही (MVP) कृषी बास्केट’ या नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून ग्राहकांना आगामी काळात आपली मागणी नोंदविणे शक्य होणार आहे. यासाठी ‘होम डिलिव्हरी’ सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या आधाराने विक्री व्यवस्था अजून भक्कम होणार आहे.
प्रतिक्रिया
संस्थात्मक पातळीवर कार्यरत असताना अनेक आव्हाने समोर असतात. विषमुक्त शेतीचे असेच आव्हान आम्ही पेलले. संपूर्ण सेंद्रिय वा जैविक पद्धतीने उभ्या केलेल्या या कामाचा विस्तार
करण्याचा मानस आहे.
प्रा. कमलेश भोये
प्राचार्य
संपर्क : ९९६०८२६६१७
संपर्क- सचिन भामरे - ९४२११५९७७४
फोटो गॅलरी
- 1 of 64
- ››