दर्जेदार आंब्याला मिळवले बांधावरच ग्राहक

पुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड माळरानाच्या व मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून सुरू असतात. मात्र वांग रेठरे (जि. सांगली) येथील आपल्या अशाच दोन एकरांतील क्षेत्रात प्रयत्नपूर्वक आमराई फुलविण्याची किमया धरणग्रस्त हणमंत रेठरेकर यांनी केली आहे.
रेठरेकर यांच्याकडील उत्पादित आंबे
रेठरेकर यांच्याकडील उत्पादित आंबे

पुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड माळरानाच्या व मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून सुरू असतात. मात्र वांग रेठरे (जि. सांगली) येथील आपल्या अशाच दोन एकरांतील क्षेत्रात प्रयत्नपूर्वक आमराई फुलविण्याची किमया धरणग्रस्त हणमंत रेठरेकर यांनी केली आहे. ग्राहकांचा विश्‍वास मिळवून बांधावरच बाजारपेठ मिळवली आहे.  . सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील रेठरेकरवाडी हे हणमंत रेठरेकर यांचे मूळ गाव. सन १९९८ मध्ये वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प सुरू झाला. या धरणात ग्रामस्थांची शेती आणि राहते घर गेले. हणमंत रेठरेकर याच धरणग्रस्तांपैकी एक होत. माध्यमिक शिक्षक म्हणून ते निवृत्त झाले. पत्नी सौ. कमल, मुलगा मंगेश, कन्या जीविता आणि ज्योती असे त्यांचे एकूण कुटुंब. मुलगा मंगेश याने बीसीएसची पदवी घेतली आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यातील शाळगाव या गावाशेजारी वांग रेठरे या नावाने रेठरेकरवाडी हे व पुनर्वसित झाले. कडेगाव तालुका पूर्वी दुष्काळाशी दोन हात करायचा. टेंभूचं पाणी आल्यानं तालुक्यातील शेती हिरवीगार झाली. रेठरेकर यांची शेती पुनर्वसित जमिनी ओसाड माळरानाच्या आणि मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून होत असतात. रेठरेकर यांच्या वाट्याला दोन एकर माळरान जमीन आली. त्यावर कुसळ देखील उगवणार नाही अशी स्थिती होती. मंगेश सांगतात की वडील नोकरी करत असल्याने पूर्णवेळ शेतीला देणे शक्य नव्हते. वसाहतीत आमचे गावकरी होते. त्यांना शेती कराराने कसण्यास दिली. केवळ पावसावर अवलंबून असलेली पिके घेतली जायची. गावातील जुने घर मोडताना व त्याजवळची जुनाट झाडे कापून ट्रकमध्ये भरताना वडील व चुलत्यांचे डोळे डबडबले. ‘माळावर झुडपाखाली किती दिवस बसायचं? पोरा, सावलीसाठी एखादं दुसरं झाडं लाव’ हे शब्द डोक्यात बसले.. मंगेश त्या वेळी पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. सन २००७ च्या दरम्यान हिवरेबाजार, राळेगणसिद्धी परिसरात पाणलोटाच्या कामांची पाहणी व अभ्यास केला. आपल्या शेतीसाठी याप्रकारे नियोजन करता येईल या दृष्टीने आखणी सुरू केली. अंतिम परूक्षा झाल्यानंतर आंब्याची बाग लावण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. पण परीक्षेत यश आले नाही. मात्र मंगेश खचले नाहीत. वडिलांनी आधार दिला. इथल्या शेतीची जबाबदारी सांभाळताना अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. मित्र व परिचितांकडून आंबा लागवडीचा सल्ला मिळाला. आमराई फुलवली सन २०१० च्या दरम्यान केसर आंब्याची ७५ रोपे लावली. शेजारील ओढ्यातून सिंचनाची सोय केली होती. टेंभू उपसा सिंचन योजनेचा कालवा शेजारून गेला होता. मात्र त्या वेळी आवर्तन सुरू नव्हते. त्यामुळे काही वर्षे टॅंकरद्वारे पाणी विकत घेतले. उन्हाळ्यात तेही पुरत नसल्याने प्लॅस्टिक कॅनला छिद्रे पाडून रोपांच्या बुंध्याजवळ त्यांचा वापर केला. योग्य नियोजनातून हळूहळू आमराई बहरत गेली. बागेचे व्यवस्थापन काटेकोर केले जाते. दरवर्षी छाटणी केली जाते. झाडाचा आकार गोलाकर ठेवला जातो.गुणवत्ता वाढीसाठी फळांची संख्या मर्यादित ठेवली जाते. गेल्या दोन वर्षांत मंगेश सातारा येथे एके ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक म्हणून नोकरी करतात. सांगली सुट्टीच्या दिवशी ते घरी जातात. रेठरेकर यांची शेती दृष्टिक्षेपात

  • क्षेत्र- २ एकर
  • मुख्य पीक आंबा- केसर (१६०) तर अन्य हापूस, रायवळ अशी एकूण २०० झाडे
  • -उत्पादन प्रति झाड- २५ किलो तर एकरी सरासरी चार ते पाच टन
  • अन्य पिके- चिकू, सीडलेस लिंबू, साग, सीताफळ, रामफळ, करवंद, नारळ, गुलाब-
  • बांधाकडेला सागवान २००, शेताच्या चारही बाजूस सीताफळ १५० झाडे
  • विक्री व्यवस्था

  • सुरुवातीला मित्रमंडळी, पाहुणे यांना बागेत बोलावून आंबे देण्यास सुरुवात केली.
  • हळूहळू विक्री व्यवस्था उभारली. सन २०१५ पासून जी गुणवत्ता जोपासली ती कायम ठेवली.
  • सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागांतून बांधापर्यंत ग्राहक येतात.
  • कच्चा मध्यम आंबा २५० रुपये, तर मोठा आकार ३०० रुपये प्रति डझन असा दर मिळतो.
  • ग्राहकांना प्रत्यक्ष आमराईत नेऊन पाडाचे आंबे झाडावरून काढून देतात.
  • संपर्क- मंगेश हणमंत रेठरेकर, ९११२८८०५६१ हणमंत बाळकू रेठरेकर, ९७६३२८००२३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com