काटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा शेळीपालन व्यवसाय

शेळीपालन करणारे नवनाथ शेटे पत्नी वंदना आणि मुलांसह
शेळीपालन करणारे नवनाथ शेटे पत्नी वंदना आणि मुलांसह

निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी शेटे यांनी सुमारे २५० शेळ्यांचा फार्म विकसित केला आहे. पूर्णवेळ व्यवसायाकडे काटेकोर लक्ष देत शेळ्यांचे व्यवस्थापन दर्जेदार ठेवले आहे. वेबसाईटद्वारे व्यवसायाचे `प्रमोशन’ करून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे.   निघोज (ता. पारनेर, जि. नगर) येथील नवनाथ भिमाजी शेटे यांनी लष्करात ‘टेलिकम्युनेशन अभियंता’ म्हणून विविध ठिकाणी सतरा वर्षे सेवा बजावली. मथुरा येथून ते २०१३ मध्ये निवृत्त झाले. त्यांचे संपूर्ण कुटूंब उच्चशिक्षित आहे. वडील भिमाजी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तर बंधू अविनाश अमेरिकेत अभियंता तर सुहास मुंबईत अभियंता आहेत. नवनाथ यांच्या पत्नी वंदना खासगी शाळेत शिक्षिका आहेत. शेळीपालनाचा पर्याय शेटे कुटूंबाची पंधरा एकर शेती आहे. सेवानिवृत्तीनंतर नोकरी न शोधता नवनाथ यांनी शेळीपालनाचा पर्याय निवडला. त्याआधी नारायणगाव येथील संस्थेच सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सन २०१६ मध्ये निघोज- पिंप्री जलसेन रस्त्यावरील माळरान जागेत १३० बाय ५६ फूट रुंदीचे शेड उभारून शेळी संगोपन सुरू केले. परिसरातील स्थानिक भागातील शेळीची जात निवडली. सुरुवातीला ३० व पुढील वर्षी ४० करडांची खरेदी केली. आजचा व्यवसाय दृष्टीक्षेपात संगोपन

  • चार वर्षांत चारा, खाद्य, आरोग्य, पाणी असे व्यवस्थापन करीत आजमितीला शेळ्यांची एकूण संख्या
  • २५० पर्यंत नेली आहे.
  • बोकडाची नसबंदी केली जाते. वजनवाढीला त्याचा फायदा होतो.
  • संगोपन-सन २०१७ मध्ये पंजाबातील लुधियाना येथून बीटल जातीचा नर आणून त्याचा संकर केला आहे. सध्या २० किलोपासून ते ४०, ५० व कमाल साठ किलो वजनापर्यंत बोकड उपलब्ध आहेत. सुमारे ४० शेळ्यांचे वजनही ३० किलोंपर्यंत आहे.
  • शेडमध्ये वजनानुसार वर्गीकरण केले आहे. शेडच्या मध्यभागी गव्हाण, पाणी व्यवस्था केली आहे.
  • शेळी चौदा महिन्यांत दोन वेळा वेतात येते.
  • करडांना थेट आईचे दूध पिण्यास न देता बॉटलद्वारे दिले जाते. या दुधात कोंबडीच्या अंड्याचाही समावेश असतो. बोकडालाही दर दिवसाला एक अंडे खुराकात दिले जाते.
  • सकाळी सात वाजता मका भरडा, क्षार मिश्रणाचा खुराक, त्यानंतर दुपारी बारा, चार वाजता, सायंकाळी सात वाजता मिश्रण व रात्री नऊ वाजता सुका चारा दिला जातो.
  • वर्षभरात वेळापत्रकानुसार लसीकरण होते. पावसाळ्यातही हिरव्या चाऱ्याची विषबाधा होऊ नये याची दक्षता घेण्यात येते. डॉ. सुभाष झावरे, डॉ. मकरंद भालेराव, डॉ. समीर शेख आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात.
  • संपूर्ण शेळीपालन सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली.
  • शेळीपालनाला जोड देत ५०० देशी कोंबड्यापालनासाठी कमी खर्चात शेडची उभारणी करण्याचे पुढील प्रयत्न.
  • मार्केटिंग व विक्री

  • नगर, सुपे व पारनेर या तालुक्यांत सध्या विक्री सुरू आहे. त्यासाठी वेबसाईट तयार करून आपल्या व्यवसायाचे प्रमोशन केले.
  • दर - शेळी प्रति किलो ३०० रुपये, नर ३५० रुपये
  • बकरी ईद सणाला बोकड विक्रीचे उद्दीष्ट ठेवत त्यानुसार त्यांचे पालन करण्यात येते.
  • शेळ्याना अनेक भागांतून मागणी आहे.
  • शंभर शेळ्यांची वाढ आणि दर इद सणाला सुमारे शंभर बोकड उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट. याशिवाय मुंबईत मागणी असलेल्या सिरोही, सोजल, कोटा आदी शेळीपालनाचेही नियोजन
  • सहा एकरांत चारा १५ एकरांपैकी सहा एकरांत चारा उत्पादन घेतले आहे. त्यात अडीच एकरांवर मेथी, प्रत्येकी वीस गुंठ्यांत शेवरी, गोपी किसन गवत तसेच दोन एकरांत कडवळ, मका आहे. सत्तर टक्के सुका व तीस टक्के हिरवा चारा देण्याचे नियोजन असते. विविध भागातून कडबा, हरभरा भुसा व अन्य चारा संकलित करतात. वर्षभराचा चारा एका वेळी संकलित करता असल्याने दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळावर मात करता आली. घरच्यांचा आधार नोकरी सांभाळून पत्नी वंदना देखील व्यवसायात मदत करतात. बंधू अविनाश यांनी आर्थिक पाठबळ दिल्याने व्यवसाय उभारता आल्याचे नवनाथ सांगतात. हार मानली नाही नवनाथ यांनी २०१४ साली साडेतीन एकरांत डाळिंबाची लागवड केली. या भागाला कुकडी प्रकल्पाचे कालव्यातून पाणी मिळते. मात्र पाऊसच नसल्याने फळबाग जोपासणे अवघड झाले. टॅंकरचे पाणी व वाढता खर्च यामुळे फळबाग फार काळ तग धरू शकणार नसल्याची बाब लक्षात आली. मग अडीच वर्षे जिवापाड जोपालेली फळबाग नाईलाजाने काढून टाकावी लागली. मात्र हार न मानता शेळीपालन मात्र जिद्दीने सुरूच ठेवले. सेवानिवृत्त सैनिकाने साधलेला हे शेळीपालन सध्या या भागात चांगलेच चर्चेत आले आहे. असंख्य शेतकऱ्यांनी शेडला भेट दिली आहे. अनेकांना नवनाथ मार्गदर्शन करतात. संपर्क - नवनाथ शेटे : ८६२३९४०३८५, ८८३०८७३००२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com