agriculture story in marathi, a retired army person doing successful goat farming. | Agrowon

काटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा शेळीपालन व्यवसाय

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 17 मार्च 2020

निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी शेटे यांनी सुमारे २५० शेळ्यांचा
फार्म विकसित केला आहे. पूर्णवेळ व्यवसायाकडे काटेकोर लक्ष देत शेळ्यांचे व्यवस्थापन दर्जेदार ठेवले आहे. वेबसाईटद्वारे व्यवसायाचे `प्रमोशन’ करून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे.

 
निघोज (ता. पारनेर, जि. नगर) येथील नवनाथ भिमाजी शेटे यांनी लष्करात ‘टेलिकम्युनेशन अभियंता’

निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी शेटे यांनी सुमारे २५० शेळ्यांचा
फार्म विकसित केला आहे. पूर्णवेळ व्यवसायाकडे काटेकोर लक्ष देत शेळ्यांचे व्यवस्थापन दर्जेदार ठेवले आहे. वेबसाईटद्वारे व्यवसायाचे `प्रमोशन’ करून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे.

 
निघोज (ता. पारनेर, जि. नगर) येथील नवनाथ भिमाजी शेटे यांनी लष्करात ‘टेलिकम्युनेशन अभियंता’
म्हणून विविध ठिकाणी सतरा वर्षे सेवा बजावली. मथुरा येथून ते २०१३ मध्ये निवृत्त झाले. त्यांचे संपूर्ण कुटूंब उच्चशिक्षित आहे. वडील भिमाजी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तर बंधू अविनाश अमेरिकेत अभियंता तर सुहास मुंबईत अभियंता आहेत. नवनाथ यांच्या पत्नी वंदना खासगी शाळेत शिक्षिका आहेत.

शेळीपालनाचा पर्याय
शेटे कुटूंबाची पंधरा एकर शेती आहे. सेवानिवृत्तीनंतर नोकरी न शोधता नवनाथ यांनी शेळीपालनाचा पर्याय निवडला. त्याआधी नारायणगाव येथील संस्थेच सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सन २०१६ मध्ये
निघोज- पिंप्री जलसेन रस्त्यावरील माळरान जागेत १३० बाय ५६ फूट रुंदीचे शेड उभारून शेळी संगोपन सुरू केले. परिसरातील स्थानिक भागातील शेळीची जात निवडली. सुरुवातीला ३० व पुढील वर्षी ४० करडांची खरेदी केली.

आजचा व्यवसाय दृष्टीक्षेपात

संगोपन

 • चार वर्षांत चारा, खाद्य, आरोग्य, पाणी असे व्यवस्थापन करीत आजमितीला शेळ्यांची एकूण संख्या
 • २५० पर्यंत नेली आहे.
 • बोकडाची नसबंदी केली जाते. वजनवाढीला त्याचा फायदा होतो.
 • संगोपन-सन २०१७ मध्ये पंजाबातील लुधियाना येथून बीटल जातीचा नर आणून त्याचा संकर केला आहे. सध्या २० किलोपासून ते ४०, ५० व कमाल साठ किलो वजनापर्यंत बोकड उपलब्ध आहेत. सुमारे ४० शेळ्यांचे वजनही ३० किलोंपर्यंत आहे.
 • शेडमध्ये वजनानुसार वर्गीकरण केले आहे. शेडच्या मध्यभागी गव्हाण, पाणी व्यवस्था केली आहे.
 • शेळी चौदा महिन्यांत दोन वेळा वेतात येते.
 • करडांना थेट आईचे दूध पिण्यास न देता बॉटलद्वारे दिले जाते. या दुधात कोंबडीच्या अंड्याचाही समावेश असतो. बोकडालाही दर दिवसाला एक अंडे खुराकात दिले जाते.
 • सकाळी सात वाजता मका भरडा, क्षार मिश्रणाचा खुराक, त्यानंतर दुपारी बारा, चार वाजता, सायंकाळी सात वाजता मिश्रण व रात्री नऊ वाजता सुका चारा दिला जातो.
 • वर्षभरात वेळापत्रकानुसार लसीकरण होते. पावसाळ्यातही हिरव्या चाऱ्याची विषबाधा होऊ नये याची दक्षता घेण्यात येते. डॉ. सुभाष झावरे, डॉ. मकरंद भालेराव, डॉ. समीर शेख आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात.
 • संपूर्ण शेळीपालन सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली.
 • शेळीपालनाला जोड देत ५०० देशी कोंबड्यापालनासाठी कमी खर्चात शेडची उभारणी करण्याचे पुढील प्रयत्न.

मार्केटिंग व विक्री

 • नगर, सुपे व पारनेर या तालुक्यांत सध्या विक्री सुरू आहे. त्यासाठी वेबसाईट तयार करून आपल्या व्यवसायाचे प्रमोशन केले.
 • दर - शेळी प्रति किलो ३०० रुपये, नर ३५० रुपये
 • बकरी ईद सणाला बोकड विक्रीचे उद्दीष्ट ठेवत त्यानुसार त्यांचे पालन करण्यात येते.
 • शेळ्याना अनेक भागांतून मागणी आहे.
 • शंभर शेळ्यांची वाढ आणि दर इद सणाला सुमारे शंभर बोकड उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट. याशिवाय मुंबईत मागणी असलेल्या सिरोही, सोजल, कोटा आदी शेळीपालनाचेही नियोजन

सहा एकरांत चारा
१५ एकरांपैकी सहा एकरांत चारा उत्पादन घेतले आहे. त्यात अडीच एकरांवर मेथी, प्रत्येकी वीस गुंठ्यांत शेवरी, गोपी किसन गवत तसेच दोन एकरांत कडवळ, मका आहे. सत्तर टक्के सुका व तीस टक्के हिरवा चारा देण्याचे नियोजन असते. विविध भागातून कडबा, हरभरा भुसा व अन्य चारा संकलित करतात. वर्षभराचा चारा एका वेळी संकलित करता असल्याने दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळावर मात करता आली.

घरच्यांचा आधार
नोकरी सांभाळून पत्नी वंदना देखील व्यवसायात मदत करतात. बंधू अविनाश यांनी आर्थिक पाठबळ दिल्याने व्यवसाय उभारता आल्याचे नवनाथ सांगतात.

हार मानली नाही

नवनाथ यांनी २०१४ साली साडेतीन एकरांत डाळिंबाची लागवड केली. या भागाला कुकडी प्रकल्पाचे कालव्यातून पाणी मिळते. मात्र पाऊसच नसल्याने फळबाग जोपासणे अवघड झाले. टॅंकरचे पाणी व वाढता खर्च यामुळे फळबाग फार काळ तग धरू शकणार नसल्याची बाब लक्षात आली. मग अडीच वर्षे जिवापाड जोपालेली फळबाग नाईलाजाने काढून टाकावी लागली. मात्र हार न मानता शेळीपालन मात्र जिद्दीने सुरूच ठेवले. सेवानिवृत्त सैनिकाने साधलेला हे शेळीपालन सध्या या भागात चांगलेच चर्चेत आले आहे. असंख्य शेतकऱ्यांनी शेडला भेट दिली आहे. अनेकांना नवनाथ मार्गदर्शन करतात.

संपर्क - नवनाथ शेटे : ८६२३९४०३८५, ८८३०८७३००२
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
शेतकरी नियोजन- कपाशीच्या पिकाला खत...सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...