निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी- कोंबडीपालन व्यवसाय

हिरोजीराव व मनिषा हे शेळके दांपत्य मिळून शेळीपालन व्यवसाय करते.
हिरोजीराव व मनिषा हे शेळके दांपत्य मिळून शेळीपालन व्यवसाय करते.

सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना सैन्यदलात कार्यरत असताना अपंगत्व आल्याने स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. त्यानंतर पूर्णपणे झोकून देत शेळी- कोंबडीपालन सुरू केले. शास्त्रीयदृष्ट्या संगोपन, नेटक्या व्यवस्थापनातून आर्थिक सक्षमता मिळवली. प्रगतिशील, प्रयोगशील पूरक व्यावसायिक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्यात वैराग-माढा रस्त्यावर वैरागपासून १० किलोमीटवर सुर्डी गाव आहे. गावात हिरोजीराव शेळके यांची २६ एकर शेती आहे. त्यांचे वडील सोपान हे माजी सैनिक. बारावी झाल्यानंतर हिरोजीराव देखील वडिलांचा वारसा चालवत सैन्यदलात रुजू झाले. अपंगत्वामुळे स्वेच्छानिवृत्ती सन १००८ मध्ये सैन्यदलात रुजू झाल्यानंतर जवळपास २० वर्षे (२०१८) जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि आसाम अशा विविध राज्यांत हिरोजीरावांनी सेवा केली. सन २००४ मध्ये जम्मू काश्‍मीरमध्ये सेवेत असताना पूंछ भागात एका मोहिमेत त्यांच्या मणक्याला मार लागला. त्यातून ते बरे झाले. पण ते सेवा बजावत राहिले. पुढे २०१० नंतर दुखणे वाढत गेले. त्रास असह्य होत गेल्याने अखेर २०१८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. शेतीत दिले झोकून सैन्यदलात कार्यरत असले तरी शेतीची आवड जपली होती. सुटीला गावाकडे आल्यानंतर देखील शेळके शेतीत काही ना काही करीत राहायचे. विहीर होती. मात्र पाण्याच्या जेमतेम स्रोतामुळे केवळ हंगामी पिके घेता यायची. मग शेतीला भक्कम आधार हवा म्हणून ते पूर्णवेळ शेळी व कोंबडीपालनाकडे वळले. वास्तविक स्वेच्छानिवृत्ती आधी म्हणजे २०१६ पासूनच चार शेळ्यांचे पालन सुरू केले होते. दरम्यान नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रातून वडिलांसह त्यांनी शेळीपालनातील तांत्रिक प्रशिक्षण घेतले. तेथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. आर. तांबडे आणि डॉ. प्रकाश कदम यांनी मार्गदर्शन केले. आजचा व्यवसाय

  • आज उत्कृष्ट व्यवस्थापन व नेटके संगोपन या जोरावर व्यवसाय वाढवला.
  • उस्मानाबादी, तोतापुरी, कोटा, आफ्रिकन बोअर, हैदराबादी अशा विविध जातींसह
  • १४० शेळ्या
  • सुमारे ५५० देशी कोंबड्या
  • वडील सोपान, आई सुमन, पत्नी मनिषा हे सर्वजण व्यवसायात राबतात. त्यातून एकमेकांचा भार हलका झाला आहे.
  • बंदिस्त आणि मुक्तसंचार पध्दत- दोन्ही पद्धतीचे एकमेकांना लागून शेडस.
  • बंदिस्त शेडमध्ये चारा-पाण्याची व्यवस्था.
  • दररोज सकाळी सात वाजता शेळ्यांना माळरानावर फिरवून आणणे.
  • त्यानंतर शेवरीचा चारा.
  • दुपारी बारा वाजता मुक्त गोठ्यात सोडणे.
  • दुपारी दोन वाजता पुन्हा शेवरीचा व पाच वाजता कडब्याचा चारा, गरजेनुसार मेथीचाही चारा.
  • पाण्याची व्यवस्था शेडमध्येच.
  • प्रतिदिन प्रतिशेळीस चार किलो चारा
  • शेवरी व त्यातच कोंबडीपालन शेळ्यांना पुरेसे खाद्य व्हावे यासाठी पावणेतीन एकरांत शेवरी लावली आहे. रोपे तयार करून ठिबकवर ती घेतली आहेत. त्यातून वर्षभर चाऱ्याची सोय झाली आहे. संपूर्ण क्षेत्र हे दहा ते बारा फूट उंच जाळी मारून बंदिस्त केले आहे. याच शेवरीत कोंबडीपालन केले आहे. त्यामुळे शेवरीचे संरक्षण झालेच. शिवाय कोंबड्यांना आत मुक्तपणे संचार करणे शक्य झाले. आतमध्येच पाणी व खाद्याची व्यवस्था आहे. मार्केट व अर्थकारण चार वर्षांचा व्यवसायाचा अनुभव तयार झाल्याने विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज भासत नाही. व्यापारी थेट बांधावर येतात. गावातील मटण व्यावसायिकही मंगळवार व शुक्रवार या विक्रीच्या दिवसांसाठी आगाऊ नोंदणी करून शेळ्या-कोंबड्या खरेदी करतात. शेळी विक्री

  • महिन्याला सुमारे दोन शेळ्या व चार बोकडांची विक्री (वजनावर)
  • बोकड ४०० रुपये तर शेळी ३०० रुपये प्रति किलो दर
  • शेळीचे सरासरी ३० किलो तर बोकडाचे २० किलोपर्यंत वजन
  • साधारण सात हजारापर्यंत शेळी तर ८ हजारापर्यंत बोकडाची विक्री
  • लाकडी फांद्या कुंभार व्यावसायिकांना इंधनासाठी लागतात. त्यातूनही महिन्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते.
  • कोंबडी विक्री

  • ६०० रुपये कोंबडा व ४०० रुपये दराने कोंबडी
  • महिन्याला सुमारे ३० कोंबड्यांची विक्री
  • प्रति अंडे सात रुपये दराने दररोज ४० अंड्यांची विक्री
  • दोन्ही व्यवसायातून महिन्याला ५० हजार रुपयांचे उत्पन्न
  • २६ एकरांत १२ एकरांत ज्वारी, मका, गहू, भुईमूग अशी पिके आहेत. मात्र, शेतीपेक्षाही
  • पूरक हाच आर्थिक सक्षमता देणारा व्यवसाय ठरला आहे.
  • दररोज आसामला जाणारा ॲग्रोवन हिरोजीराव ॲग्रोवनचे जुने वाचक आहेत. आसामला २०१५ मध्ये पोस्टिंग झाल्यानंतर तेथे देखील दररोज पोस्टाने अंक मागवण्यास सुरुवात केली. पाचव्या ते सहाव्या दिवशी अंक पोचायचा. पण, त्याचे वाचन त्यांनी कधीच बंद केले नाही. ॲग्रोवनचा असा त्यांना छंद जडला आहे. संपर्क- हिरोजीराव शेळके-९२८४०९५५१३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com