सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची तंत्रज्ञानावर आधारित शेती

पाॅलीहाऊसमध्ये दिगंबर गाडेकर
पाॅलीहाऊसमध्ये दिगंबर गाडेकर

औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर कृष्णपूरवाडी येथील दिगंबर सर्जेराव गाडेकर यांची सुमारे १० एकर शेती आहे. सखोल अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती, उच्च तंत्रज्ञानाचा वापर व कष्ट उपसण्याची तयारी या गुणांच्या आधारे त्यांनी पॉलिहाउस, शेडनेट व फळबागांची हायटेक शेती विकसित केली आहे. पोलिस उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या गाडेकर यांनी शेतीत घेतलेली ही भरारी उल्लेखनीय आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील मोहरा गावचे रहिवासी असलेले दिगंबर सर्जेराव गाडेकर यांची औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर कृष्णपूरवाडी येथे शेती आहे. सन १९९५ मध्ये डोंगराला लागून असलेले जवळपास २५ एकरांचे क्षेत्र त्यांनी खरेदी केले आहे. प्रदीर्घ सेवेतून २०१३ मध्ये गाडेकर पोलिस उपअधीक्षक या पदावरून निवृत्त झाले. पोलिस खात्यातील खडतर नोकरी, जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी शेतीची आवडही जपली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीत काम करायचे ठरवले. तंत्रज्ञानयुक्त शेतीचा घेतलेला ध्यास नोकरीत असताना त्या व्यापातून शेतीला वेळ देणे शक्‍य न झाल्याने अनेक वर्षे ही जमीन पडीक राहिली होती. आता शेतीचा विकास सुरू झाला. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या जमापुंजीतून आर्थिक नियोजन करून शेतीत गुंतवणूक करणे सुरू केले. सुरुवातीला जमिनीची मोजणी करून घेतली. अतिशय उतार असलेल्या या जमिनीचे लेव्हलिंग केले. पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांध घातले. काही अंतरावर असलेल्या हर्सूलच्या तलावातून जवळपास दीडशे खेपांद्वारे गाळ आणून टाकला. मराठवाड्यासारख्या भागात पाण्याशिवाय शेती कसणे शक्‍य नाही हे ओळखले. शेतापासून जवळपास तीन किलोमीटरवर असलेल्या सावंगी तलावाशेजारी दोन गुंठे जमीन घेतली. तेथे विहीर घेत तेथून पाइपलाइनद्वारे पाणी शेतापर्यंत आणले. स्वखर्चातून शेततळे पाण्याचा स्रोत उपलब्ध केल्यानंतर २०१४ मध्ये व पुढे २०१५ मध्ये स्वखर्चातून दोन शेततळी विशाल शेततळी निर्माण केली. त्यातील एक दोन कोटी लिटर तर दुसरे एक कोटी लिटर क्षमतेचे आहे. अशा रितीने तीन कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता तयार केली. तलावानजीक खोदलेल्या विहिरीतून पाणी येथे साठवण्यात येते. रेन वॉटर हार्वेस्टिंग गाडेकर सांगतात की आमच्या भागात सुमारे पाचशे मिमी. पाऊस पडतो. पाऊस चांगला झाला तर ६० ते ७० लाख लिटर पाण्याचा संचय शेततळ्यात होतो. पावसाचा एक थेंबही वाया जाऊ देत नाही. आजची शेती पद्धती

  • पाण्याची सोय केल्यानंतर शासनाच्या फळबाग योजनेतून २०१६ मध्ये फळबाग शेती विकसित केली.
  • आज पाच एकरांत डाळिंब, तीन एकरांत पेरू व दोन एकरांत सीताफळ आहे.
  • तंत्रज्ञान वापर

  • साधारण २०१७ मध्ये गाडेकर ‘हायटेक’ शेतीकडे वळले. धाडसाने त्यांनी एक एकरावर पॉलिहाउस तर एक एकरांत शेडनेट उभारले आहे. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागले.
  • पॉलिहाउस व शेडनेटमध्ये फॉगर्सची सोय
  • ड्रीप ॲटोमेशन पाणी व खत व्यवस्थापनासाठी संगणकचलीत प्रणालीचा वापर असलेल्या ड्रीप ॲटोमेशनच तंत्राचा वापर बारा एकरांवर केला आहे. या यंत्रणेत फिल्टर, फर्टिगेशन टॅंक, ॲसिड टॅंक, व्हेंच्युरी आदींचा अंतर्भाव आहे. संगणकावर प्रोग्रॅम करता येतो. त्यानुसार पाणी व खते किती प्रमाणात व कधी द्यायची याचा कार्यक्रम निश्‍चित करता येतो. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठी बचत होतो. त्याचा वापर काटेकोर होतो. आपल्या पिकांच्या उत्पादनवाढीत या तंत्राचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचे गाडेकर सांगतात. छोट्या यंत्राचा परिणामकारक वापर

  • गाडेकर यांनी ऑनलाइनद्वारे उपकरण घेतले आहे. ते मातीत रोवायचे. त्याद्वारे ओलावा कळतो. प्रत्येक पिकाची पाण्याची गरज हे उपकरण सांगते. त्यावरून पाणी किती द्यायचे ते ठरवता येते.
  • मातीचा पीएचदेखील त्यातून कळतो.
  • पिकाला किती सूर्यप्रकाश लागतो ते त्यावरून समजते.
  • या तीनही घटकांचा आपल्याला दररोज उपयोग होत असल्याचे गाडेकर सांगतात.
  • यंत्रे छोटा ट्रॅक्‍टर, रोटावेटर, मोगडा, बेड तयार करण्याचे यंत्र, ब्लोअर पिकांचे उत्पादन रंगीत ढोबळी मिरची

  • गाडेकर यांनी सुरुवातीला नाशिक येथील सल्लागाराची मदत घेऊन त्यानुसार शेती व्‍यवस्थापन केले.
  • शेडनेटमध्ये त्यांनी रंगीत ढोबळी मिरची घेतली. एकरी ३० टन उत्पादन घेतले. त्या वेळी व्यापाऱ्यांमार्फत
  • आखाती देशात निर्यात केली. त्या वेळी १८ लाखांचे एकूण उत्पन्न मिळवण्याचे ते सांगतात. पुढील वर्षी त्यात हिरवी ढोबळी घेतली. त्याचे एकरी ४० टन उत्पादन घेतले.
  • शेवंतीचा प्रयोग पॉलिहाउसमध्ये पहिले पीक स्टंम्पवाली शेवंती (लांब दांड्याची )घेतली. तापमान, आर्द्रता, पीएच आदी घटक नियंत्रित करीत ‘हायटेक’ तंत्राच्या साहाय्याने त्याचा प्रयोग केला. पुणे, हैदराबाद, मुंबई, इंदूर आदी ठिकाणी विक्री केली. मात्र, मराठवाड्यात उन्हाळ्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात असल्याने शेवंतीचे पीक घेण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे यंदा त्यात हिरवी ढोबळी घेतली आहे. शेतीतील ठळक नोंदी

  • प्रत्येक दिवशी डायरीमध्ये शेतीचा हिशेब
  • दररोज आठ तास शेतीत कष्ट करतात
  • गावातील सहा व्यक्‍तींना कायमस्वरूपी रोजगार
  • पोलिस खात्यातील शिस्तीचा शेतीत पुरेपूर फायदा झाला
  • शेतीला कृषी पर्यटनाचीही जोड देण्याचा मानस. आकर्षक फूलझाडांबरोबरच फार्मकडे जाणाऱ्या
  • रस्त्याच्या दुतर्फा केशर आंब्याची शंभरांवर झाडे. सोबत कडुनिंबाची झाडे
  • तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक ॲटोमेशन यंत्रणेसाठी सुमारे १८ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तंत्रज्ञान व एकूण शेतीच्या विकासासाठी सुमारे ९५ लाखांचे कर्ज घेतले. कृषी विभागाचे अनुदान, शेतीतील उत्पन्न याद्वारे कर्जाची रक्कम मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य झाले आहे. लवकरच कर्ज नील होईल असे गाडेकर सांगतात.  ॲग्रोवन सुमारे सहा वर्षांपासून नियमित वाचत असल्याचेही ते सांगतात. दिगंबर गाडेकर- ९९२३१०९४९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com