बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’

संशोधक इम्तियाझ खांडे आणि प्रो. वेंकटेसान सुदर्शन आणि सहकाऱ्यांनी बियांपासून क्लोन मिळवण्याची पद्धत शोधली आहे. (स्रोत ः कारीन हिग्गिन्स)
संशोधक इम्तियाझ खांडे आणि प्रो. वेंकटेसान सुदर्शन आणि सहकाऱ्यांनी बियांपासून क्लोन मिळवण्याची पद्धत शोधली आहे. (स्रोत ः कारीन हिग्गिन्स)

बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञांनी पिकाच्या पुनरुत्पादनासाठी बियांद्वारे प्रतिपिंड (क्लोन) मिळवण्याची पद्धत शोधली आहे. या पद्धतीमध्ये पिकांच्या अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक किंवा वातावरणाला सहनशील जातींची पैदास करणे तुलनेने सोपे होणार आहे. याचा फायदा पैदासकार आणि जनुकतज्ज्ञांना होणार आहे. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जंगली वनस्पतीच्या सुमारे ४०० प्रजातींमध्ये फलनाशिवाय बिया बनवण्याची क्षमता आहे. या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये ‘अॅपोमिक्सिस’ असे म्हणतात. उत्क्रांतीच्या दरम्यान काही जंगली वनस्पतींनी ही प्रक्रिया विकसित केली असली तरी व्यावसायिक पिकांच्या वनस्पतीमध्ये ती फारशी आढळत नाही. ती पिकांमध्ये आणण्यासाठी कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील वनस्पती जीवशास्त्रातील संशोधक इम्तियाज खांडे आणि प्रो. वेंटटेसान सुदर्शन यांनी आयोवा राज्य विद्यापीठ आणि फ्रान्स येथील इन्रा संस्थेच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत. सन १९२० पर्यंत दोन जातींच्या संकरातून पिकांच्या संकरीत जाती विकसित केल्या जात. पुढे त्यांच्या बियांद्वारे त्यात वाढ केली जाई. बियांद्वारे वाढ करताना पिकांचे मूळ गुणधर्म सातत्याने पुढे जातीलच याची खात्री नसे. त्याऐवजी त्या वनस्पतींचे क्लोन तयार केल्यास त्यात पूर्ण गुणधर्म येण्याची क्षमता असते. त्यातही बियांपासून क्लोन मिळवण्याची सोय झाल्यास कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी संकरीत बियाणे विकत घेण्याची गरज राहणार नाही. सध्या असे बियाणे खरेदी करणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

असे आहे संशोधन इम्तियाज खांडे आणि प्रो. वेंटटेसान सुदर्शन यांनी भातातील ‘बीबीएम१’ हे जनुक शोधले आहे. ते विर्याच्या पेशीमध्ये आढळणारे असून, अंड्यामध्ये आढळत नाही. फलनानंतर ‘बीबीएम१’ हे फलित पेशीमध्ये कार्यान्वित होते. मात्र, प्राथमिक पातळीवर हे नराकडून जनुकीय संरचनेत येते. फलित अंड्यापासून गर्भाच्या निर्मिती करण्याच्या क्षमतेसाठी ‘बीबीएम१’ची ओळख आहे. संशोधकांनी प्रथम जनुकांच्या संपादनातून वनस्पतींची मेयॉसिसमध्ये जाण्याची क्षमता काढून टाकली. त्यामुळे अंडपेशींची निर्मिती केवळ मातेकडून आलेल्या गुणसूत्रातून होते. त्यानंतर अंड पेशीमध्ये ‘बीबीएम१’ कार्यान्वित केले. सामान्यतः हे फलनाशिवाय कार्यान्वित होत नाही. सध्या या प्रक्रियेचा कार्यक्षमता ३० टक्क्यापर्यंत आहे. मात्र, सातत्याच्या संशोधनातून ते प्रमाण वाढवणे शक्य असल्याचे संशोधकांचे मत आहे. ‘बीबीएम१’सारखे जनुक अन्य तृणधान्यामध्येही असून, अशा अनेक पिकांमध्ये हे तंत्र उपयुक्त ठरू शकेल, असा दावा प्रो. सुदर्शन यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com