सेंद्रिय खतनिर्मिती तंत्रातून आंबा उत्पादन, दर्जावाढ

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी येथील आंबा बागायतदार रोहित पटवर्धन यांनी सन २०१५ पासून पूर्ण सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.सेंद्रिय खत व्यवस्थापन तंत्राद्वारे झाडांची उत्पादकता दीडपटीने वाढण्यासह फळांची गुणवत्ता व झाडांच्या प्रतिकारशक्तीही वाढ झाल्याचे त्यांना आढळले आहे.
कंपोस्ट खताचा वापर करून फुलवलेली आंबाबाग.
कंपोस्ट खताचा वापर करून फुलवलेली आंबाबाग.

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी येथील आंबा बागायतदार रोहित पटवर्धन यांनी सन २०१५ पासून पूर्ण सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. कंपोस्ट खत, घन व द्रवरूप जिवामृत, पंचगव्य आदींची निर्मिती ते करतात. सेंद्रिय खत व्यवस्थापन तंत्राद्वारे झाडांची उत्पादकता दीडपटीने वाढण्यासह फळांची गुणवत्ता व झाडांच्या प्रतिकारशक्तीही वाढ झाल्याचे त्यांना आढळले आहे.   रत्नागिरी जिल्ह्यात पोचरी (ता. संगमेश्‍वर) येथील रोहित पटवर्धन यांची हापूस आंब्याची एकेठिकाणी २१०, तर अन्य ठिकाणी १८४ वडिलोपार्जित झाडे असून, ती ३५ ते ४० ते ७० वर्षे जुनी आहेत. पोचरी हा गावदरीच्या लागून भाग आहे. येथील बागेत प्रचंड गारवा असतो. सूर्यकिरणांची उपलब्धता फार नाही. सुमारे ८० टक्के आंबा हा मेच्या कालावधीत येतो. पूर्वी रोहित व्यापाऱ्यांना कराराने बाग द्यायचे. मात्र त्यांच्याकडून झाडांचे अपेक्षित संगोपन होत असल्याने निदर्शनास आले. रासायनिक खते व कीडनाशके यांचा अनियंत्रित वापर होत होता. ही दुरवस्था न बघवून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे असे रोहित यांना वाटू लागले. त्यांची संगोपनाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर २०१५ पासून रासायनिक खतांचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला. देशी गायींचे पालन सेंद्रिय खते वापरण्यासाठी बाहेरून खरेदी केली तर उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे शेणखत, घन व द्रवरूप जिवामृत, पंचगव्य आदींचे तंत्रशुद्ध पद्धतीने उत्पादन स्वतःच करायचे ठरवले. त्यासाठी दोन देशी गीर गायी विकत घेतल्या. आज टप्प्याटप्प्याने वाढ करीत गोठ्यात गायींची संख्या २१ पर्यंत नेली आहे. कंपोस्ट खताचे बेड्‍स घराजवळ चार बेड्‍स तयार केले आहेत. २० फूट लांब व सहा फूट रुंद अशी त्याची रचना आहे. त्यामध्ये एकूण १६ टन कंपोस्ट खत तयार केले जाते. जिवाणू कल्चर वापरले जाते. प्रक्रियेत खत चार महिने बेडमध्ये ठेवले जाते. चांगले कुजल्यावर प्रति झाड ७० ते ८० किलो असा पावसाच्या सुरुवातीला म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वापर होतो. घन जिवामृत ऑगस्ट महिन्यात पावसाची तीव्रता कमी होऊन श्रावणसरी सुरू झाल्या, की १० किलो घन जिवामृत प्रति झाड असे दिले जाते. १०० किलो शेण, १० किलो गोमूत्र, प्रत्येकी दोन किलो गूळ व बेसन एकत्र करून गोणपाटावर ४८ तास ठेवले जाते. त्यानंतर आठ दिवस चांगले सुकल्यावर त्याची पावडर तयार होते. द्रवरूप जिवामृत दोनशे लिटर पाण्याला प्रत्येकी १० किलो शेण, गोमूत्र, प्रत्येकी एक किलो बेसन, गूळ, वडाच्या झाडाखालील माती या पद्धतीने द्रवरूप जिवामृत तयार केले जाते. पावसाळा काळात दोन ते तीन वेळा प्रति झाड ५ ते १० लिटर त्याचा वापर होतो. पंचगव्य शेण, गोमूत्र, दूध, दही व तूप अशा गायीच्या पाच पदार्थांपासून पंचगव्य तयार केले जाते. तीस लिटर द्रावणात एक किलो तूप वापरले जाते. मोहोरापूर्वी व नंतर प्रत्येकी दोनवेळा वापर होतो. पंचगव्याच्या फवारणीमुळे झाडाची आंतरिक शक्ती वाढते. कीटकांच्या प्रकोपाला बळी पडण्यासाठी उपयुक्त ताकद झाडांना मिळते असे रोहित सांगतात. पूर्वी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. प्रयोग सुरू केल्यानंतर तो होतो. मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. त्याचे कारण झाडांची प्रतिकारशक्ती वाढली असून, कोणत्याही वातावरणाला सामोरे जाण्यास झाडे सज्ज आहेत असे निरीक्षण रोहित यांनी सांगितले. पूर्वीच्या तुलनेत रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या दोन ते तीनने कमी झाल्या आहेत. त्यावरील खर्चही कमी झाला आहे. सेंद्रिय घटकांमुळे झालेले फायदे

  • रोहित सांगतात की पानांचा तजेलदारपणा, आकार वाढला. प्रकाश संश्‍लेषण क्रिया अधिक प्रभावी होऊन त्याचा उत्पादनवाढीवर चांगला परिणाम दिसू लागला.
  • रासायनिक खतांची गरज संपली. त्यावरील खर्च कमी झाला. झाडे निरोगी व सुदृढ झाली.
  • झाडांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होते.
  • फळांचा आकार व गुणवत्ताही वाढली.
  • आंबा पिकात यंदा उत्पादन जास्त आले तर पुढील वर्षी त्यात घट होते. त्यानुसार पूर्वी सहा एकरांत म्हणजे २१० झाडांपासून १२०० ते १४०० क्रेट उत्पादन अधिक उत्पादनाच्या वर्षी मिळते. त्यापुढील वर्षी ते ६०० ते ७०० क्रेट मिळते. पूर्वीच्या हे दीडपट ते दुपटीने अधिक उत्पादन असल्याचे रोहित यांनी सांगितले.
  • शेणामध्ये अनेक प्रकारचे लाभदायक जिवाणू आहेत. ते झाडांसाठी अधिक फायदेशीर ठरतात.
  • सेंद्रिय खतांच्या वापरामुळे हापूसची चव, दर्जा याबाबत ग्राहकांकडूनच प्रतिक्रिया मिळत आहेत. पुणे शहरात थेट ग्राहकांकडून अधिक मागणी होते.
  • बाजारपेठ मुंबई व अहमदाबाद या बाजारपेठांमध्ये रोहित आपल्याकडील आंबा पाठवतात. सर्वसाधारण १५ एप्रिलपासून आंबा पाठवण्यास सुरुवात होते. हंगाम २५ मेपर्यंत चालतो. त्यानंतरचा आंबा ‘कॅनिंग’कडे वळविण्यात येतो. हंगामात सुमारे दीड हजार पेटी आंबा विक्री होते. गेल्या चार वर्षांत पाच डझनाच्या प्रति पेटीला साडेतीन हजार रुपयांपासून ते १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दुधाची विक्री रोहित यांनी गुजरात येथून देशी गायी आणल्या असून, चांगल्या वळूपासून पैदास करण्याचाही प्रयत्न केला आहे. गुजरातमध्ये अधिक उत्पादनक्षम गीर गायी आहेत. त्या कोकणात आल्या की त्यांचे दूध कमी होत जाते. रोहित यांना दिवसाला एकूण ८० ते १०० लिटर दूध मिळते. त्यातील ६० टक्के गावातच ६० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. उर्वरित दुधापासून तूप बनविले जाते. या देशी तुपाला चांगली मागणी असून किलोला तीन हजार रुपये त्याचा दर आहे. संपर्क- रोहित पटवर्धन, ७०२००६५७०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com