थंडीमुळे गुलाब उत्पादनात घट

तारळे (जि. सातारा) येथील सत्पाल जाधव यांच्या शेतातील पॅकिंग केलेली गुलाबाची फुले
तारळे (जि. सातारा) येथील सत्पाल जाधव यांच्या शेतातील पॅकिंग केलेली गुलाबाची फुले

सातारा : जिल्ह्यात गुलाबाच्या फुलांची शेती कमी झाल्याने गुलाबाची निर्यातही बंद झाली आहे. यामुळे सध्या उत्पादित होणारा गुलाब स्थानिक बाजारात पाठविला जात आहे. व्हॅलेंटाइनसाठी लागणाऱ्या डच गुलाबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अल्प असल्याने स्थानिक बाजारपेठेत इतर जिल्ह्यातून फुले येण्यास सुरवात झाली असल्याचे फुल व्यापारी सांगत आहेत. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून गुलाबाचे क्षेत्र कमी झाले आहे. साधा गुलाब आणि खास व्हॅलेंटाइनसाठी लागणाऱ्या गुलाबाच्या फुलात फरक असतो. लग्नसराईच्या काळात डच फुले फारशी उपयोगी ठरत नसल्यामुळे साधा गुलाब करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. व्हॅलेंटाइनच्या दृष्टीने गुलाब लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या उपलब्ध असणारी फुले बाजारात पाठविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. फुलांचे दर गेल्या १५ दिवसापासून फुलांचे दर टिकून असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र अचानक वाढलेल्या थंडीमुळे गुलाबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. फुलाचा आकार, कमी उमलने यासारखे परिणाम दिसून येत आहेत. यामुळे बाजारपेठेत फुले कमी प्रमाणात येत आहेत. सध्या डच वाणाच्या गुलाबाच्या २० फुलांच्या गड्डीस १६० ते २०० रुपये पर्यंत दर मिळत आहे. तसेच इतर गुलाबाच्या २० फुलांच्या गड्डीस ५० ते १०० रुपये दर मिळत आहे. पुणे जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली असल्याने बाजारात फुले मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. पॅालिहाउसमधील फूलशेतीत घट राज्यात सर्वाधिक पॅालिहाउस असणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख होती. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून फुलाचे अर्थकारण परवडत नसल्यामुळे अनेक पॅालिउस बंद झाली आहेत किंवा पॅालिहाउसमध्ये इतर पिके घेतली जात आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पॉलिहाउस असलेल्या वर्णे गावात अवघे २० टक्के पॉलिहाउस शिल्लक आहेत. माझे दहा गुंठे क्षेत्रात पॅालिहाउस असून, त्यामध्ये डच गुलाबाची लागवड केली आहे. सध्या गुलाबाचे दर समाधानकारक आहेत, मागणी वाढली आहे. मात्र, थंडीमुळे उत्पादनात घट झाली आहे. - सतपाल जाधव, तारळे, जि. सातारा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com