अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे युवा शेतकऱ्याची शेती

वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन झाल्टे या युवा द्राक्ष बागायतदारानेबागेत अत्याधुनिक ‘वेदर स्टेशन’ उभारले आहे.११ सेन्सर्सचा वापर करूनबागेचे व्यवस्थापन करणे व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन वाजवी खर्चात करणे शक्य झाले आहे.
झाल्टे यांनी द्राक्षबागेत उभारलेले वेदर स्टेशन
झाल्टे यांनी द्राक्षबागेत उभारलेले वेदर स्टेशन

वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन झाल्टे या युवा द्राक्ष बागायतदाराने आपल्या बागेत अत्याधुनिक ‘वेदर स्टेशन’ उभारले आहे. त्याअंतर्गत ११ सेन्सर्सचा वापर करून हवामानाच्या निकषांचा डाटा तपासणे, त्यानुसार योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन बागेचे व्यवस्थापन करणे व निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन वाजवी खर्चात करणे शक्य झाले आहे. ‘प्रिसीजन फार्मिंग’ चा हा आदर्श नमुना म्हटले पाहिजे.   नाशिक जिल्ह्यातील वडाळी नजीक (ता. निफाड) येथील झाल्टे कुटुंबाने १९८० दरम्यान एक एकरांत थॉंमसन , अनाबेशाही वाणाच्या लागवडीतून द्राक्षशेतीचा पहिला प्रयोग केला. कुटुंब विभागल्यानंतर स्व. यादवराव झाल्टे यांच्याकडे द्राक्षशेती आली. मुले अनिल व विश्वास यांच्या मदतीने लागवड टप्प्याटप्प्याने वाढविली. आज त्यांची तिसरी पिढी रोशन व राकेश प्रयोगशीलतेने राबत असून द्राक्षाखालील क्षेत्र १५ एकर क्षेत्रावर गेले आहे. कुटुंबाच्या द्राक्षशेतीचा केंद्रबिंदू

  • माती, पान, देठ परीक्षण करूनच अन्नद्रव्यांचे नियोजन
  • उपलब्ध भांडवलाचा अंदाज घेऊन आंतरमशागत, फवारणी, डिपींगसाठी आधुनिक यांत्रिकीकरण
  • पाणी झिरपण्याची क्षमता, पाण्याचा डिस्चार्ज यांचा अंदाज घेऊन नवी सिंचनप्रणाली कार्यान्वित
  • कार्यक्षमता वाढ, मजूर टंचाईवर मात आर्थिक बचतीसह अचूक कामकाज
  • तिसऱ्या पिढीने धरली आधुनिक तंत्राची कास आर्थिक परिस्थिती बेताची असताना कुटुंबातील रोशनने २००८ साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून ‘कृषी अभियांत्रिकी’ ची (बी.टेक) पदवी मिळवली. नोकरीच्या मागे न लागता २०११ पासून प्रयोगशील द्राक्ष शेतीचा ध्यास घेतला. वडील अनिल व काका विश्वास यांचे मार्गदर्शन तर भाऊ राकेशची साथ मिळत गेली. झपाटून पूर्ण वेळ जबाबदारी स्वीकारत बदलत्या द्राक्षशेतीचा अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे द्राक्षसल्लागार रॉड्रीगो ओलीव्हा यांच्या मार्गदर्शनातून द्राक्षशेतीतील संकल्पना अजून विस्तारली. माती व तुटीचे सिंचन व्यवस्थापन या विषयाचा सविस्तर अभ्यास होऊन नवी दिशा मिळाली. उभारले ‘वेदर स्टेशन’ रोशन यांनी अलीकडे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र अर्थात वेदर स्टेशनची उभारणी आपल्या बागेत केली आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या हवामान घटकांच्या विविध तपशीलाआधारे बागेचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोर व वेळेवर करणे शक्य झाले आहे. वेदस स्टेशन प्रणालीची रचना भाग १

  • 'आयआयटी’ ची पदवी घेतलेले सुशांत व सुमोत यांच्या कंपनीकडून सातत्यपूर्ण अभ्यासातून भारतीय बनावटीची हवामान आधारित सूचना देणारी प्रणाली विकसित
  • सुमारे ५७ हजार रुपये त्यासाठी खर्च, शिवाय सेन्सर्सनिहाय ३३ हजारांपर्यंत खर्च
  • कार्य सौर ऊर्जेवर
  • एकूण ११ सेन्सर्सचा वापर (पेटंटेड सेन्सर्सही)
  • त्यातील सीम कार्डद्वारे सेन्सरकडून प्राप्त हवामान अंदाज व स्थिती यांची माहिती सर्व्हरवर अपलोड होते.
  • भाग २ प्रणालीत ११ सेन्सर्स व त्यांचे कार्य 1  व २-मुळांच्या कक्षेभोवती ओलावा- एक सेन्सर -जमिनीखाली एक फुटांवर दुसरा- जमिनीखाली २ फुटांवर ३- मातीचे तापमान (जमिनीच्या ६ इंच खोल) ४- हवेतील तापमान ५- हवेतील आर्द्रता ६- हवेचा दाब ७- वेलीच्या पानाचा ओलावा ८- सूर्यप्रकाशाची तीव्रता ९- पर्जन्यमान १०- हवेचा वेग ११- हवेची दिशा भाग ३ मोबाईलवर पाहण्याची सोय

  • काटेकोर शेती व्यवस्थापन (Precision Agriculture) प्रकारातील प्रणाली
  • हवामान घटकांची तपशीलवार माहिती (डेटा) सर्व्हरला जाते. ती पंधरा मिनिटांनी अपडेट होते. -मोबाईलवर पाहता येते. (अँड्रॉईड अँपद्वारे व ऑनलाईन डॅशबोर्डवरही)
  • इंग्लिश व मराठी असे भाषेचे पर्याय उपलब्ध
  • ॲपमध्ये शेत, कॅलेंडर, रोग, विश्लेषण व बातम्या असे पाच विभाग
  • विभाग-  १ शेत- यात अहवाल, माझे शेत व हवामान असे तीन उपविभाग अहवाल-  दिवसाचा सरासरी मातीचा ओलावा, कमी व जास्त तापमानाची सरासरी, प्रत्येक तासातील तापमान, आर्द्रतेची किमान, कमाल सरासरी, आर्द्रतेची ताशी टक्केवारी, पानांचा ओलावा, बाष्पीभवन स्थिती, रोग व किडीचा अंदाज माय फार्म - ११ सेन्सर्सच्या माध्यमातून अचूक तपशील पाहता येतात. यात स्थितीदर्शक हिरवा, पिवळा व लाल रंगाद्वारे सूचना उदा. हिरवा रंग- मुळांच्या कक्षेभोवती जमिनीत पुरेसा ओलावा पिवळा रंग- सिंचन करू शकता. लाल रंग- झाड पाण्याच्या ताणाखाली गेले आहे. सेन्सरनिहाय पर्यायांवर क्लिक केल्यास ताजी व मागील माहितीही पाहता येते. हवामान: यात पुढील पाच दिवसांचा स्थानिक हवामान अंदाज तसेच पुढील १२ तासांतील प्रत्येक तासनिहाय हवामान व पुढील ७ दिवसांच्या बाष्पीभवन वेगाचा अंदाज  विभाग २-कॅलेंडर:  छाटणी ते काढणी दरम्यान फवारणी, खते व पाणी यासंबंधीच्या कामकाजाच्या नोंदी ठेवता येतात. विभाग ३-किडी- रोग हवामान बदलांमुळे संभाव्य कीड रोगांचा प्रादुर्भाव, धोका व त्यानुसार फवारणी नियोजन करता येते. तात. विभाग ४- विश्लेषण यात डोळे फूट, काडी विरळणी, सबकेन, शेंडा मारणे, फुलोरा, फळधारणा, मण्यांची वाढ,पाणी उतरणे, काढणी आदी पीक अवस्था व कॅलेंडरप्रमाणे पाणी, खत, फवारणी व हवामान नोंदी समाविष्ट. त्यानुसार व्यवस्थापन कोणते करायचे याची निर्णयक्षमता तयार होते. विभाग ५-बातम्या द्राक्ष शेती संबंधित अधिक उपयुक्त माहिती पाहता येते. -मातीच्या प्रकारानुसार प्लॉटनिहाय मातीच्या अनुषंगाने उपयोगी सेन्सर्स बसवले आहेत. वेदर स्टेशनचे झालेले फायदे

  • हंगामाच्या प्रत्येक अवस्थेत रोग- कीड पूर्वसूचना, त्यानुसार फवारणी नियोजन
  • वाफसा तपासून गरजेनुसार सिंचन
  • कार्यक्षमतेत वाढ होऊन मजुरी, वेळ व त्यावरील खर्चात बचत
  • हवामानाच्या सर्व तपशिलांचे दरवर्षी होतेय माहिती संकलन
  • त्या आधारे व्यवस्थापनासंबंधी अचूक निर्णय घेणे शक्य
  • हवेचा वेग समजून त्यानुसार फवारणी
  • गरजेनुसार अहवाल ‘डाऊनलोड’ करणे शक्य
  • झालेले प्रत्यक्ष फायदे
  • द्राक्षक्षेत्र- १५ एकर. पैकी थॉंमसन १३.५ तर शरद सीडलेस (ब्लॅक) १.५ एकर.
  • निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ. सध्याचे एकरी उत्पादन १२ ते १५ टन
  • सिंचनाचा अंदाज घेतल्याने थंडीत द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या घटली
  • काटेकोर सिंचनातून पाण्यात ३० टक्के बचत
  • खते व फवारण्यांच्या खर्चात २० टक्के घट
  • मण्यांचा एकसमान आकार, रंग, चव व चकाकी, साखरेचे संतुलित प्रमाण व टिकवणक्षमतेत वाढ
  • दरवर्षी जर्मनी, नेदरलँडला निर्यात झाली. यंदा लॉकडाऊनमध्येही निर्यात सुकर.
  • नफ्याचे प्रमाण वाढल्याने तीन एकर जमिनीची अलीकडे खरेदी
  • प्रतिक्रिया द्राक्षवेलीच्या वरील भागाबरोबरच जमिनीच्या खालील भागाकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे असते हे रॉड्रीगो यांच्याकडून शिकलो. त्यानुसार व्यवस्थापन करतो. पुढील टप्प्यात ‘ऑटोमेशन’चे नियोजन आहे. - रोशन झाल्टे ९४२२९३१३७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com