agriculture story in marathi, Sachin Ghadge has runningdairy business successfully under the brand of My Sahyadri at Pune Dist. | Agrowon

‘माय सह्याद्री’ मजूर ते दुग्ध उद्योजक - संघर्षमय प्रवास

संदीप नवले
मंगळवार, 1 जून 2021

शेती अर्धा एकर. घरातील सर्व मजुरी करायचे. वीटनिर्मिती व्यवसायही केला. मात्र प्रशिक्षण, अभ्यास व उद्योजकवृत्तीतून सचिन घाडगे (गुणवडी, जि. पुणे) यांनी दुग्ध व्यवसाय उभारला.  आज तेरा फ्रॅंचायसीद्वारे मासिक ३५ लाख रुपये उलाढालीसह ‘माय सह्याद्री’ हा प्रतिष्ठित ब्रँड बनवला आहे.

शेती अर्धा एकर. घरातील सर्व मजुरी करायचे. वीटनिर्मिती व्यवसायही केला. मात्र प्रशिक्षण, अभ्यास व उद्योजकवृत्तीतून सचिन घाडगे (गुणवडी, जि. पुणे) यांनी दुग्ध व्यवसाय उभारला. प्रयत्नपूर्वक वाढवून विविध उत्पादनांची श्रेणी तयार केली. आज तेरा फ्रॅंचायसीद्वारे मासिक ३५ लाख रुपये उलाढालीसह ‘माय सह्याद्री’ हा प्रतिष्ठित ब्रँड बनवला आहे.
 
बारामतीपासून पाच किलोमीटरवर ‘गुणवडी’ (जि. पुणे) हे साधारण आठ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे सचिन व मोठे बंधू विकास या घाडगे बंधूंचे घर आहे. जमीन मोजून अर्धा एकर. आई खुरपणीसाठी रोजाने दुसऱ्यांच्या शेतात जायची. वडीलही घरच्या दोन गायींचे दूध काढून अन्यत्र शेतमजुरीस जायचे. आर्थिक चणचण कायम भासायची. सचिनदेखील लहानपणापासून मजुरी करायचे. दुसरा पर्याय नव्हता. वीटनिर्मितीचा व्यवसायही सुरू केला.

व्यवसायाकडे वाटचाल
सन २०१४ मध्ये पुणे येथील संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी सचिन यांची निवड झाली. दुधापासून तसेच फळांवर आधारित जॅम, जेली, केचप, मसाले आदींविषयी प्रशिक्षण त्यातून मिळाले. गणेश खामगळ यांचे मार्गदर्शन लाभू लागले. त्यातून नवी दिशा, उभारी मिळाली. आई- वडिलांसोबत चर्चा करून दुग्ध व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले. वीटनिर्मिती व्यवसायातील भांडवलाचा वापर केला. मामा बाळासाहेब काकडे यांच्याकडून सात लाख रुपयांची मदत झाली. २२ म्हशी घरी आल्या. पण व्यापाऱ्यांकडून गुणवत्तापूर्ण म्हशी न मिळाल्याने सचिन यांचे खूप आर्थिक नुकसान झाले. पदरी निराशा आली.

बॅंकेकडून कर्ज
प्रक्रियायुक्त प्रकल्प उभा करताना अनेक अडचणींपैकी आर्थिक गुंतवणूक ही सर्वांत मोठी बाब होती. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून सुमारे २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक उभारत आज जवळपास एक कोटी रुपये क्षमतेचा प्रकल्प उभा केला आहे.

यांत्रिकी सेटअप उभारला
विविध व्यवसायात मनासारखे यश मिळत नसल्याने अस्वस्थता होती. पुन्हा मामांसोबत चर्चा केली. निराशेतून सावरत २०१६ मध्ये मित्राच्या मदतीने कुल्फी यंत्र विकत घेत कुल्फी बनवणे सुरू केले. या वेळी घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा झाला. सचिन जीव ओतून काम करू लागले. हळूहळू कुल्फीची विक्री वाढली. मग खवानिर्मितीचे यंत्र विकत घेतले. सध्या बॉयलर, पाश्‍चरायझेशन, होमोजेनायझिंग, दूध, लस्सी यंत्र व पॅकिंग, खवा भट्टी, श्रीखंडनिर्मिती, चक्का मऊ करणे, बल्क कुलर, जनरेटर, आठ फ्रिज, लस्सी, तूप पॅकिंग, लस्सी कप पॅकिंग आदींसाठी यंत्रे व दोन वाहने असा यांत्रिकी सेटअप उभारला आहे.

गुणवत्ता जपली
‘माय सह्याद्री’ ब्रँड तयार केला. उत्पादनांना मागणी वाढू लागली. मग दूध संकलन केंद्र स्थापन करण्याचे ठरवले. आजमितीला घरचे ४०० लिटर गायीचे, १०० लिटर म्हशीचे, तर बाहेरून २५०० लिटर असे दररोज तीन हजार लिटर दूध संकलन होते. त्याद्वारे पदार्थांची श्रेणी वाढविण्यावर भर दिला. पॅकेजिंग, लेबलिंगद्वारे उत्पादने अधिक आकर्षक बनवली. दूधपुरवठ्यातील सातत्य, उत्तम गुणवत्ता आणि नैसर्गिक चव या बळावर बाजारपेठ सक्षम केली.

उद्योगावर दृष्टिक्षेप

 • उत्पादने-दूध, तूप, दही, लस्सी, ताक, खवा, कुल्फी, आइस्क्रीम, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर
 • असे नानाविध पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
 • आजमितीला १३ फ्रॅंचायसी आहेत. यात पुणे जिल्ह्यात बहुतांश व एक फलटण (सातारा) येथे आहे. लॉकडाउनच्या काळात फ्रॅंचायसीसाठी महाराष्ट्रातून तब्बल २८५ अर्ज प्राप्त.
 • शिवाय जिल्ह्यातील विविध भागांतही माल वितरित होतो.
 • आपला ब्रँड परदेशात पोहोचविण्यासाठी पावले उचलली आहेत.
 • आई अनसूया, वडील मनोहर, पत्नी सुवर्णा, मोठे बंधू विकास व वहिनी नीता अशा परिवारातील सर्व सदस्यांची सचिन यांना साथ लाभते. संपूर्ण प्रवासात मामा बाळासाहेब काकडे यांची मोलाची मदत झाली.

उत्पादन (अंदाजे व मासिक)

 • श्रीखंड ३ टन, आम्रखंड २ टन, बासुंदी १ टन, तूप १ टन, पेढे १ टन, लस्सी ३००० लिटर, लस्सी कप २००० लिटर, दही ३ टन, ताक २००० लिटर, कुल्फी १ लाख नग, फ्रूटखंड १ टन, खवा १ टन -प्रति किलो ५५ रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत दराने विक्री
 • महिन्याला ३५ लाख रुपयांपर्यंत उलाढाल. (प्रामुख्याने उन्हाळ्यात).
 • पावसाळा, हिवाळा काळात २३ लाख रुपयांपर्यंत होते.
 • मजुरी, वाहतूक खर्च, पॅकेजिंग मटेरियल, वीज, कच्चा माल या बाबींवर अधिक खर्च. (सुमारे ३२ लाख रुपयांपर्यंत). मागणी कमी असलेल्या काळात तो कमी.
 • सुमारे १० टक्क्यांच्या आसपास नफा.

उद्योगातील महत्त्वाच्या बाबी
सचिन सांगतात की गुणवत्तेवर सर्वांत भर दिला. आपला माल खपावा म्हणून बाजारात प्रसिद्ध ब्रॅंडच्या किमतींपेक्षा त्या कमी ठेवायच्या असे केले नाही. पॅकेजिंग मटेरिअल उत्तम दर्जाचे वापरले. उत्पादनांची श्रेणी विस्तारली. दूध संकलन झाल्यानंतर जलदगतीने त्यावर प्रक्रिया करून
ती आउटलेट्‌स ठिकाणी पोहोचवली जातात. त्यामुळे ग्राहकांना ताजी उत्पादने मिळवण्यावर भर दिला.

संपर्क- सचिन घाडगे, ९९२१६९४४४४, ९८५०१४३७३७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी...शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी...
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय...पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी)...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...