agriculture story in marathi, Sandip Gambhir has developed mango orchid successfully with much efforts & good management. | Page 2 ||| Agrowon

माळरानावर स्वादयुक्त आंब्याचा गोडवा

गणेश कोरे
गुरुवार, 27 मे 2021

पुणे जिल्ह्यात खामुंडी (ता. जुन्नर) येथील संदीप गंभीर यांची एकत्रित कुटुंबाची ३० एकर शेती आहे.
त्यांनी काही वर्षांपूर्वी केशर, हापूस व राजापुरी आंबा वाणांच्या झाडांची लागवड केली. प्रयत्नपूर्वक व चांगल्या व्यवस्थापनातून त्यांची जोपासना केली. आज कष्टाची मधुर फळे त्यांना मिळू लागली असून, त्यातून शेतीचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.

पुणे जिल्ह्यात खामुंडी (ता. जुन्नर) येथील संदीप गंभीर यांची एकत्रित कुटुंबाची ३० एकर शेती आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी केशर, हापूस व राजापुरी आंबा वाणांच्या झाडांची लागवड केली. प्रयत्नपूर्वक व चांगल्या व्यवस्थापनातून त्यांची जोपासना केली. आज कष्टाची मधुर फळे त्यांना मिळू लागली असून, त्यातून शेतीचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव परिसर भाजीपाला, द्राक्षे आदींसाठी प्रसिद्ध आहे. जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथे संदीप गंभीर कुटुंबाची एकत्रित सुमारे ३० एकर शेती आहे. पूर्वी यातील १५ एकर क्षेत्र माळरान होते. पारंपरिक शेती करत असताना कांदा, गहू, सोयाबीन आदी हंगामी पिके ते घ्यायचे. पडीक माळरान पिकांखाली आणण्यासाठी संदीप यांनी प्रयत्न सुरू केले. सन २००८ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सुमारे सहा एकर पडीक माळरानावर आंबा लागवडीचे नियोजन त्यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून एक वर्षे वयाची कलमी केसर वाणाची सुमारे १५०, हापूस वाणाची ४०, राजापुरी वाणाची ८०, तर आम्रपाली वाणाची ३० अशी सुमारे ३०० झाडांची लागवड त्यांनी केली. लागवड ३० बाय २० फूट अंतरावर आहे. पाण्याच्या शाश्‍वत स्रोतासाठी अर्धा एकर शेततळे उभारले. पारंपरिक विहिरीची दुरुस्ती केली. ठिबक सिंचन सुविधाही उभारली. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी उत्पादन सुरू झाले. मात्र चौथ्या वर्षापासून व्यावासायिक उत्पन्न घेण्यास सुरवात केली.

वाण व हंगाम
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम मार्च- एप्रिल-मे असा जोमदार सुरू असतो. तो अखेरच्या टप्प्यात असताना पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील हापूससह केसर आणि राजापुरी आंब्याचे उत्पादन सुरू होते. हे उत्पादन साधारण मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन १५ जूनपर्यंत सुरू असते. संदीप यांनी विविध वाण निवडताना त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेतली. केसर आंबा आकाराने लहान असला तरी चवीला अतिशय गोड असतो. त्यामुळे मागणी चांगली असते. राजापुरी आंबा आकाराने मोठा असून, साधारण एक फळ ६०० ते ८०० ग्रॅमएवढे असते. चवीला मधूर असल्याने त्यालाही मागणी असते. कोकणातील हापूस आंब्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर ग्राहकांना जुन्नर भागातील हापूसची चव चाखता येते.

सघन लागवड करणार
पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सर्व झाडांची आळी स्वच्छ करून शेणखताचा वापर केला जातो. तसेच खोडाला कीडनाशकाची प्रक्रिया केली जाते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मोहोर लागल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी होते. फळांचा आकार हरभऱ्याएवढा झाल्यानंतर मार्च- एप्रिल महिन्यात प्रति दिन प्रति झाड २५ लिटर पाणी ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. आंबा उत्पादनातील १२ वर्षांच्या अनुभवानंतर आता उर्वरित तीन एकर पडीक क्षेत्रावर अतिघन पद्धतीने लागवडीचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्पादन व विक्री व्यवस्था
झाडे अनेक वर्षांपूर्वीपासून जपली असल्याने उत्पादनही चांगले देत आहेत. दरवर्षी एकूण सुमारे चार ते पाच टन आंबा उपलब्ध होतो. जुन्नर तालुक्यातील आंब्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असते. जुन्नर, आळेफाटा, नारायणगांव, ओतूर, चाकण, भोसरी येथे आंब्याचे दैनंदिन बाजार भरतात. या ठिकाणी औद्योगीकरण झाले आहे. विविध राज्यांतील कामगारांचे कुटुंबीयांसह या ठिकाणी वास्तव्य आहे. साहजिकच परिसरातील व्यापारी थेट बागांमधून खरेदी करतात. संदीप सांगतात, की अलीकडील वर्षांत कच्च्या आंब्याला सरासरी ५० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. थेट ग्राहकांना केलेल्या विक्रीमध्ये डझनाला २५० ते ३०० रुपये दर मिळतो. या वर्षी लवकर संपलेला पाऊस, थंडीमधील चढउतार, थंडीचा कमी
कालावधी, जांभळाच्या आकाराच्या फळधारणेच्या वेळी झालेली गारपीट यामुळे उत्पादनात घट झाली.

संपर्क- संदीप गंभीर, ७३५००६२७६९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...
डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...
गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली...अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या...
कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेहीनाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी...
बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेतीवनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी...
डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरणआटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...