विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार केळीची शेती

वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील यांनी केळी पिकातून शेतीत समृद्धी आणली आहे. जी-९ वाणासह येल्लकी, अन्य देशी वाणांचे प्रयोग, आधुनिक तंत्राचा वापर,शेतीतील कामे हलकी करणाऱ्या अवजारांची निर्मिती व एकरी ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन आदी बाबींमधून त्यांनी या पिकातील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
संदीप पाटील येल्लकी वाणाच्या केळीबागेत.
संदीप पाटील येल्लकी वाणाच्या केळीबागेत.

वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील यांनी केळी पिकातून शेतीत समृद्धी आणली आहे. जी-९ वाणासह येल्लकी, अन्य देशी वाणांचे प्रयोग, आधुनिक तंत्राचा वापर, शेतीतील कामे हलकी करणाऱ्या अवजारांची निर्मिती व एकरी ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन आदी बाबींमधून त्यांनी या पिकातील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.   जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका केळीसाठी आघाडीवर आहे. तालुक्यातील वढोदा येथील संदीप पाटील यांनीही या पिकात दहा वर्षांच्या अनुभवातून मास्टरी संपादित केली आहे. त्यांची शेती अशी. 

  • क्षेत्र ३५ एकर. तापी व अनेर नदीच्या लाभक्षेत्रात. जलसाठे मुबलक. १० एकर ‘लीज’वर.
  • केळी क्षेत्र २० एकरांपर्यंत. मृग व कांदे असे दोन्ही बहार घेतात.
  • सात ते आठ एकरांत पपई, हरभरा व अन्य पिके. पाच कूपनलिका, दोन सालगडी, एक बैलजोडी, ट्रॅक्टर.
  • जागतिक केळी तज्ज्ञ के. बी.पाटील यांच्या मार्गदर्शनातून विविध बदल केले.
  • सुधारित तंत्राचा वापर सात वर्षांपासून ‘फ्रूटकेअर’ तंत्रज्ञानाचा अवलंब होतो. कमळ बाहेर येण्याच्या वेळी ‘थ्रिप्स’ किडीपासून संरक्षण करावे लागते. त्यासाठी कीटकनाशकाची ‘बड इंजेक्शन’ प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी फिलीपीन्स येथून आणलेल्या निडल्स् व फवारणी पंपाचा उपयोग व्हायचा. मात्र फवारणी दांडी कमी उंचीची होती. कमळात सोडले जाणारे द्रावण स्वतंत्र बाटलीत घ्यावे लागे. शिडीवर चढून उंचावर ही प्रक्रिया करावी लागे. यात वेळ व श्रम वाया जायचे. यावर उपाय म्हणून संदीप यांनी कौशल्याने तंत्र शोधले. इमारत बांधकामासाठीची दांडी स्टील दुकानातून घेतली. ती पंपाला बसविली. दांडीला स्वतंत्र निडलची आवश्यकता होती. पंप उत्पादक कंपनीकडून स्टीलची तयार करून घेतली. त्यासाठी के. बी. पाटील यांची मदत झाली. त्यासाठी ‘जैन हिल्स’ येथे शेतकरी व फवारणी पंप उत्पादकांची बैठक झाली. निडल अहमदाबाद (गुजरात) येथील कंपनीकडून उपलब्ध झाली. ‘बड इंजेक्टर’साठी स्वतंत्र पंपाची व्यवस्थाही झाली. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान पाहिले. दांडी व निडलचे उत्पादन सावदा (ता.रावेर) येथील शेतीपयोगी वस्तू केंद्रातही सुरू करण्याची व्यवस्था झाली आहे. स्कर्टिंग बॅग लावणे झाले सुकर केळी घडाला स्कर्टिंग बॅग्ज लावण्यासाठी फिलिपिन्सच्या धर्तीवर शिडी वापरली जायची. पण शिडीवर चढल्यानंतर हातात बॅग, अनावश्यक पाने काढण्यासाठी छोटा विळा या बाबी सांभाळाव्या लागत. यात अनेकदा तोल जायचा. मग संदीप यांनी पाइप, रॉडच्या मदतीने पिरॅमिड आकारासारखी शिडी तयार केली. उभे राहण्यासाठी दोन बाय दोन फूट आकाराचा मजबूत पत्रा बसवला. स्कर्टिंग बॅग, विळा व अन्य साहित्य ठेवण्यासाठी पोते अडकविण्याची व्यवस्था केली. तोल जाण्याची समस्याही दूर केली. नव्या वाणांचा प्रयोग देशी केळी ग्रॅण्डनैन, श्रीमंती, वसई, महालक्ष्मी आदी वाणांचे प्रयोग संदीप अनेक वर्षे करीत आहेत. नाशिक येथील सह्याद्री शेतकरी कंपनी, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याशी ते जोडले आहेत. त्यातून बाजारपेठेतील गरजांचा अभ्यास झाला. पुणे येथील रोपवाटिकेतर्फे रोपे आणून देशी केळीचा प्रयोग दोन वर्षांपासून सव्वा- दीड एकरांत सुरू आहे. पुणे व बारामती परिसरात या केळीला मागणी आहे.१६ किलोपर्यंतही रास व किलोला २५ ते ३० रुपये दर मिळाला आहे. लाल केळी लागवडही चार एकरांत करण्याचे नियोजन आहे. येल्लकी वाण संदीप त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात ‘सेमिनार’साठी गेले होते. त्यावेळी त्या भागातील वाण, बाजारपेठांच्या अनुषंगाने पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यातून दक्षिण भारतात अधिक लागवड होणाऱ्या येल्लकी केळी वाणाची रोपे मदुराई (तमिळनाडू) येथून मागविली. पावणेचार एकरांत लागवड केली. यंदा दोनहजार झाडांमध्ये २७ टन उत्पादन तर १४ किलोपर्यंत रास मिळाली आहे. किलोला ४७ रुपये दर नाशिक येथील सह्याद्री शेतकरी कंपनी सर्व वाणांच्या केळीची खरेदी करते. त्यांनी येल्लकी केळीला किलोला ४०, ४४ ते ४७ रुपये असे उल्लेखनीय दर दिले आहेत. या वाणाची वैशिष्ट्ये

  • झाडाचा बुंधा अन्य केळी वाणांच्या तुलनेत बारीक.
  • निसवणीनंतर झाडाची उंची (पानांसह)- २० फुटापर्यंत
  • उष्णता, थंडीत तग धरणारे वाण.
  • ऊर्जा, प्रथिने, कर्बोदके, तंतूमय घटक (फायबर्स) आदी पोषक घटकांनी भरपूर. त्यामुळेच दर जास्त मिळतो.
  • अवजार व तंत्रवापर केळीची लागवड सहा बाय पाच फूट अंतरावर गादीवाफा (बेड) पद्धतीने आहे. पॉली मल्चिंगचा वापरही होतो. दोन बैलांच्या साह्याने आंतरमशागत करताना रोपे व बेडला इजा होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन एक बैलचलित कोळपे तयार केले. हरभरा व अन्य पिकांच्या आंतरमशागतीसाठी हातचलित सायकल कोळप्याचा वापर करतात. यात दिवसाला एक व्यक्ती सहा एकर काम करू शकते. सुमारे ३१ एकरांत स्वयंचलित ठिबक यंत्रणेचे काम पूर्ण होत आले आहे. कृषी उपसंचालक अनिल भोकरे, लोणी (ता.चोपडा) येथील नरेंद्र पाटील, पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ महेश महाजन यांच्या संपर्कात संदीप कायम असतात. संपर्क- संदीप पाटील - ९०७५४५७६६५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com