agriculture story in marathi, sangli, united agricultural family, vegetable farming | Agrowon

एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून होतेय प्रगती

अभिजित डाके
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे एकमेकांचा भार हलका करीत शेती व नोकरीची सांगड, आठवडी बाजारात थेट विक्री, त्यातून अधिक नफा व योग्य पीक नियोजन यातून सांगली जिल्ह्यातील सुरुल (ता. वाळवा) येथील अधिक राजाराम पाटील यांनी आपली पाच एकर शेती आर्थिकदृष्ट्या सुस्थिर केली आहे. वर्षभरात प्रत्येकी १० गुंठ्यांत तीन भाज्या व जोडीला ऊस अशा शेती पद्धतीची घडी त्यांनी बसविली आहे.

अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे एकमेकांचा भार हलका करीत शेती व नोकरीची सांगड, आठवडी बाजारात थेट विक्री, त्यातून अधिक नफा व योग्य पीक नियोजन यातून सांगली जिल्ह्यातील सुरुल (ता. वाळवा) येथील अधिक राजाराम पाटील यांनी आपली पाच एकर शेती आर्थिकदृष्ट्या सुस्थिर केली आहे. वर्षभरात प्रत्येकी १० गुंठ्यांत तीन भाज्या व जोडीला ऊस अशा शेती पद्धतीची घडी त्यांनी बसविली आहे.

सांगली जिल्ह्यात पेठ नाका-शिराळा राज्यमार्गापासून पश्चिमेला सुमारे १० ते १२ किलोमीटरवर वसलेलं सुरुल गाव वाळवा तालुक्यात येते. हा तसा सधन तालुका आहे. ऊस पट्ट्यासह द्राक्ष, भाजीपाला पिकांसाठी तो अग्रेसर आहे. सुरुल गाव म्हणाल तर तसं डोंगराळ भागातच आहे. गावात वांगी आणि टोमॅटोची पिके घेतली जातात. सुरुल गावापासून काही अंतरावर वाटेगाव साखर कारखाना आहे. त्यामुळे या भागात ऊस हे देखील मुख्य पीक असते. एप्रिल, मे या दोन महिन्यांत पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे या भागात सुरू हंगामातील ऊस लागवडीला प्राधान्य दिले जाते.

कष्टमय प्रवास
गावातील अधिक राजाराम पाटील यांचं दहा सदस्यांच एकत्रित कुटूंब आहे. पूर्वी घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडिलोपार्जित शेती केवळ चार एकर. शेती कोरडवाहूच म्हणजे पावसावर अवलंबून. अधिक सांगतात, की शिक्षणासाठी पैसे नव्हते. पण आई-वडिलांनी खूप कष्ट केले. त्यामुळे दहावीपर्यंत शिक्षण घेता आलं. बंधू तानाजी यांनी आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अडीच एकर शेती साखर कारखाना उभारणीत गेली. त्यामुळे उत्पन्नाची स्थिती नाजूक झाली होती. मग शेतात मजुरी करण्याची वेळ आली. विहिरीतील गाळ काढण्याऱ्या यंत्रावर काम करणं सुरू झालं. पण कुठल्याही कामाचा कमीपणा आणू दिला आहे. सर्व कष्टांची तयारी ठेवली.

पुन्हा नव्या जोमाने तयारी
अधिक सांगतात, की जमीन कारखान्यासाठी गेली होती. त्यामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन मिळाले होते. पण नोकरी काही लवकर लागली नाही. बंधू १९९६ पासून नोकरी करत होते. उपलब्ध शेतीत धान्य पिकत होते. त्यावर घरचा गाडा चालत होता. पै पै साठवून काही शेती विकत घेतली. पण ती खडकाळ होती. लागवडीखाली ती आणण्यासाठी नेटके व्यवस्थापन करावे लागले. पाण्याची शाश्‍वत सोय करण्यासाठी २००५ मध्ये कूपनलिका घेतली. परंतु कोणते पीक घ्यायचे याचा आराखडा समोर नव्हता. मग बाजारपेठांचा अभ्यास करून ताजा पैसे देणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळण्याचा निर्धार केला.

भाजीपाला पिकांचे नियोजन
कमी क्षेत्र आणि कमी जोखीम या दोन बाबी डोळ्यासमोर ठेवल्या. अधिक क्षेत्रावर लागवड केली तर विक्री व्यवस्था उभी होईल, पण त्यावर खर्च अधिक करावा लागणार हे निश्चित होते. त्यामुळे १० गुंठे एवढेच क्षेत्र ठरवले. प्रत्येकी तेवढ्या क्षेत्रात मिरची, टोमॅटो आणि वांगी यांची लागवड सन २००५ पासून सुरू केली. चार पैसे मिळू लागले. अधिक यांचे मन आता शेतीत रमले होते. नोकरीची आशा सोडून दिली होती. अचानक २०११ मध्ये कारखान्याकडून नोकरीचे पत्र आले. ही संधीही गमवायची नाही
असे ठरले. सकाळी लवकरचा वेळ शेतीला देऊन आठ वाजता नोकरीच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात झाली. अर्थात ही कारखाना बिगरहंगामातील बाब होती. हंगामात रात्रपाळी मिळाली. त्यामुळे दिवसा शेतीला वेळ मिळाला.

घरच्यांनी जबाबदारी पेलली
वडील राजाराम, आई सौ. सुभद्रा यांच्याकडे शेतीची मुख्य जबाबदारी होती. मात्र ते थकल्यानंतर पत्नी स्वाती, बंधू तानाजी, त्यांच्या पत्नी सुजाता यांनी शेतीची मुख्य जबाबदारी उचलली. बंधूदेखील एका दुग्धव्यवसायातील एका संस्थेत नोकरीत आहेत. ते देखील नोकरी व शेती अशी दुहेरी कसरत करतात. एकमेकांचा भार हलका होऊ लागल्याने कामे सुकर झाली. अवधूत आणि आकाश ही मोठ्या बंधूंची मुले तर प्रतीक आणि प्रज्वल ही अधिक यांची मुले शिक्षण घेत आहेत. अधिक मुलांना नेहमी सल्ला देतात की आम्ही शून्यातून उभे राहिलो आहे. पडेल ते कष्ट करण्यात कमीपणा नको. शेती जपली पाहिजे. अभ्यासातून वेळ मिळेल तशी शेतीदेखील शिका. साहजिकच मुलेदेखील वडीलधाऱ्यांचा
सल्ला प्रमाण मानून शक्य तो हातभार लावतात.

पाटील यांचे पीक नियोजन

  • मिरची, वांगी, टोमॅटो प्रत्येकी १० गुंठे
  • ऊस- तीन एकर (वाण-को ८६०३२)
  • पावटा- पाच गुंठे

थेट विक्रीचा फायदा
पाटील कुटूंब भाजीपाला पिकांची थेट विक्री करते. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. जिल्ह्यातील इस्लामपूर व मलकापूर (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) या ठिकाणी आठवडी बाजार आहेत. तेथे शेतकरी गटांद्वारे पिकअपच्या साह्याने माल घेऊन जातात. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही कमी होतो. यंदा पावसाने भाजीपाला पिकांचे भागात अतोनात नुकसान झाले. परंतु माळरान असल्याने आमच्याकडे नुकसान तुलनेने कमी झाल्याचे अधिक यांनी सांगितले. बाजारात भाजीपाल्याची आवकही कमी असल्याने दर वधारल्याचा फायदा त्यांना मिळाला. प्रत्येकी चार दिवसांला साधारण १००, १५० ते ३०० किलोपर्यंत माल उपलब्ध होतो. त्याला किलोला १५ रुपयांपासून ते ४० रुपये व कमाल ६० ते ७० रुपयांपर्यंतचा दर मिळतो. भाजीपाला शेतीतून सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.

पाटील यांच्या शेती पद्धतीच्या जमेच्या बाजू

  • खरिपात तीन भाज्यांची लागवड
  • शेणखताचा भरपूर वापर
  • लागवडीआधी शेतात मेंढ्या बसवल्या जातात
  • हिरवळीची खते मातीआड केली जातात
  • ऊस तसेच भाजीपाला शेतीला ठिबक सिंचन
  • थेट विक्रीचा पर्याय
  • घरचे सदस्य राबत असल्याने मजूरबळ कमी.

संपर्क - अधिक पाटील - ९६२३५२८९७३, ७०५८५५७८४३
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...