agriculture story in marathi, Sanjay Pawar is getting corn crop in two seasons in a year for fodder & also for grains. | Agrowon

गरजेला पैसे देणारा दोन हंगामांतील मका

विकास जाधव
गुरुवार, 3 जून 2021

सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) येथील निवृत्त जिल्हा सरकारी वकील संजय माणिकराव पवार मका पिकात ‘मास्टर’ शेतकरी झाले आहेत. चारा, धान्य अशा मागणीनुसार खरिपासह रब्बीत चार- पाच एकर क्षेत्र, विविध वाण, मातीची सुपीकता टिकवणे आदी व्यवस्थापानातून एकरी ४० क्विंटल उत्पादनासह गरजेला लागणारे ताजे उत्पन्न म्हणून हे पीक त्यांनी यशस्वी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) येथील निवृत्त जिल्हा सरकारी वकील संजय माणिकराव पवार मका पिकात ‘मास्टर’ शेतकरी झाले आहेत. चारा, धान्य अशा मागणीनुसार खरिपासह रब्बीत चार- पाच एकर क्षेत्र, विविध वाण, मातीची सुपीकता टिकवणे आदी व्यवस्थापानातून एकरी ४० क्विंटल उत्पादनासह गरजेला लागणारे ताजे उत्पन्न म्हणून हे पीक त्यांनी यशस्वी केले आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दुग्धोत्पादन फलटण तालुक्यात घेतले जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गायींचे गोठे आहेत. साहजिकच चारा पिके घेण्यावर व मुरघास करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहातो. त्यामुळे मक्याला कायम मागणी राहते. हीच संधी तालुक्यातील राजाळे (ता. फलटण) येथील निवृत्त जिल्हा सरकारी वकील व प्रयोगशील शेतकरी संजय माणिकराव पवार यांनी ओळखली. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी मका पिकात सातत्य ठेवत त्यात ‘मास्टरी’ मिळवली आहे.

पवार यांची मका शेती
पवार यांनी जिल्हा सरकारी वकील म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती अशा विविध विभागांत काम पाहिले. शेतीची आवड होती. मात्र तेवढा वेळ देता येत नव्हता. सन २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी शेतीला अधिकाधिक वेळ देण्यास सुरुवात केली. वडिलोपार्जित २५ एकर शेती होती. गावात नदी, कॅनॉल असल्याने सुरुवातीच्या काळात ऊस हे प्रमुख पीक होते. आता बाजारपेठेतील मागणी व संधीचा विचार करून मका हे त्यांनी मुख्य पीक बनवले आहे.

सुरुवातीच्या काळात खरिपात तीन एकरांत मका घेतला. त्या वेळी एकरी १८ ते २० टन चाऱ्याचे उत्पादन व प्रति टनास १७०० ते १८०० रुपये दर मिळाला होता. शेतकऱ्यांकडून चाऱ्यासाठी होत असलेली मागणी पाहून क्षेत्रात वाढ करत नेली.

व्यवस्थापनातील बाबी दृष्टिक्षेपात

  • खरिपात पाच ते सहा एकर तर रब्बीत तीन ते चार एकर लागवड.
  • दरवर्षी चारा व धान्य यांची गरज व दर अभ्यासून त्यानुसार काढणीचे नियोजन
  • दरवर्षी विविध कंपन्यांकडील वाणांची निवड. यात अमेरिकन लष्करी अळीला प्रतिकारकता, पाने व कणसांचा आकार, कणसांची संख्या आदी बाबींचे गुणधर्म लक्षात येतात.
  • चांगल्या उगवणीसाठी बीजप्रक्रिया.
  • अलीकडील चार वर्षांपासून पेरणी यंत्राचा वापर.
  • दोन बियाण्यांत एक फूट तर दोन ओळीतील दहा इंच अंतर.
  • एकरी १८ ते २० टनांपर्यंत चाऱ्याचे, तर धान्याचे एकरी ४० ते ४२ क्विंटल उत्पादन.
  • अमेरिकन लष्करी अळी येण्याआधीपासून उपाययोजना

अर्थकारण
पवार सांगतात, की मक्याचे एकरी किमान ४० क्विंटल उत्पादन मिळायलाच हवे. तरच अर्थकारण साधते. कारण त्याचे क्विंटलचे दर १२०० ते १३०० रुपयांच्या दरम्यानच आहेत. काही वेळाच ते हा आकडा ओलांडतात. उत्पादनाचे एकरी ५० क्विंटल उद्दिष्ट ठेवले आहे. तरही ४० क्विंटल उत्पादन, धान्याचा प्रति क्विंटल एकरी एकहजार रुपये दर मिळाला तरी ४० हजार रुपये होतात. पाच एकर क्षेत्रात दोन लाख रुपये मिळतात. खर्च वजा जाता एक लाख रुपये जरी उरले तरी पुढील पिकासाठी ते महत्त्वाचे भांडवल म्हणून उपयोगाचे होते. साधारण ७० ते ८० दिवसांत शेतकऱ्यांसाठी मिळणारे हे गरजेचे ताजे पैसे असतात. असे वर्षांतील दोन हंगाम साधले तरी फायद्याचे ठरते. खरिपातील मक्याचे एकरी उत्पादन रब्बीच्या तुलनेत अधिक राहते.

जमीन सुपीकतेवर भर
पवार खरिपात सोयाबीन, बाजरी, तूर, भात तर रब्बीत हरभरा, गहू आदी पिके घेतात.
खपली गहू, बटाटा, तसेच करडईची लागवडीचे प्रयोगही त्यांनी यशस्वी केले आहेत. ते सांगतात की मका जमिनीतील अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात उचलणारे पीक आहे. त्यामुळे खरिपात हे पीक घेतलेल्या जागी रब्बीत ते पीक पुन्हा घेत नाही. फेरपालटाला महत्त्व देतो. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी एक वर्ष शेतात मेंढ्या बसविणे, दुसऱ्या वर्षी जिप्समच वापर करणे तर तिसऱ्या वर्षी हिरवळीची पिके घेऊ ती फुलोऱ्यावर येताच गाडणे असे प्रयोग केले जातात. उसाचे दरवर्षी एकरी ५० ते ६० टन सरासरी उत्पादन घेतात. ट्रॅक्टर व आवश्यक अवजारे असल्याने शेतीतील कामे वेळेत होतात.

मदत व मार्गदर्शन
पवार यांच्या शेताला परिसरासह जिल्ह्यातील शेतकरी भेटी देतात. शेतीशाळा, मेळावे, पीक स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. कीटकशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते, कृषी उपसंचालक धनश्री जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, भरत रणवरे यांनी त्यांच्या शेताला भेट दिली आहे. कृषी सहायक सचिन जाधव यांची मदत झाली आहे. बंधू शिरीश व शैलेंद्र यांचे मार्गदर्शन झाले असून पत्नी सुषमा व मुलगा अर्जुन यांचीही मदत होते.

संपर्क-  संजय पवार, ९७६७०१४९००


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी...शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी...
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय...पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी)...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...