संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर सोयाबीन बियाणे

नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे.
गटातील शेतकऱ्यांना ब्रीडर व फाउंडेशन बियाण्याचे वितरण
गटातील शेतकऱ्यांना ब्रीडर व फाउंडेशन बियाण्याचे वितरण

नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील प्रयोगशील तरुण ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत संजीवनी शेतकरी बचत गटाची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात ते आले. तेथील कृषीविद्या शाखेचे विषय विशेषज्ञ डॉ.प्रकाश कदम यांनी सोयाबीन बीजोत्पादनाचे अर्थकारण व त्यातून उत्पन्नातील वाढ स्पष्ट केली. सोयाबीन बीज ग्राम संकल्पनेला त्यातून चालना मिळाली. बीजोत्पादनाला अशी मिळाली चालना

  • पूर्वी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र अधिक होते. मात्र जमीन मध्यम- खोल काळ्या प्रकारची असल्याने शेंगाधारणा अवस्थेत पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम व्हायचा. सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीड-रोग व्यवस्थापनाचाही अभाव होता. या सर्व बाबीं तपासून तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले.
  • केव्हीके व तरुणांच्या माध्यमातून आत्मा यंत्रणेकडे गटाची नोंदणी झाली. जेएस-९३०५, एमएसीएस-११८८, डीएस-२२८ (फुले कल्याणी) व फुले संगम या वाणांचे ब्रीडर आणि फाउंडेशन बियाणे केव्हीकेमार्फत वेळोवेळी उपलब्ध करून दिले. बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा जिवाणू खतांचे साह्य करण्यात आले.
  • नियोजनातील प्रमुख बाबी:

  • हवामान आणि माती परीक्षणाद्वारे बीजोत्पादन कार्यक्रम आखणी
  • अधिक उत्पादकता, आकर्षक रंग, भौगोलिक परिस्थितीनुसार वा दुष्काळी परिस्थितीस प्रतिरोधक वाणांवर भर.
  • पीक तणावात असताना किमान संरक्षित सिंचनाची सुविधा
  • पेरणीपश्चात उगवण, शाखाविस्तार, फूलधारणा, शेंगा विकास आणि कापणीच्या अवस्थेत निरीक्षणे
  • एकमेकांच्या चर्चेतून पीकवाण वैशिष्ट्य़े, गुणधर्म व पिकांचा आढावा
  • गुणवत्ता टिकून राहण्यासाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदल
  • पेरणीपश्चात क्षेत्रात निवड केलेल्या वाणापेक्षा दुसरा वाण आढळून आल्यास ती झाडे काढून टाकली जातात. (rouging)
  • दोन विभिन्न वाणांच्या पेरणी क्षेत्रात गुणधर्म स्वतंत्र असावेत. यासाठी विलगीकरण करून अंतर ठेवले जाते. (isolation)
  • बियाणे प्रक्रिया धोरणानुसार प्रतवारी, पॅकिंग आणि लेबलिंग विषयी कौशल्य आधारित प्रशिक्षण गट सदस्यांना देण्यात आले आहे.
  • काढणीपश्‍चात तंत्र व्यवस्थापन

  • कापणीनंतर यांत्रिकी पद्धतीने उफणणी केली जाते. सोयाबीनच्या दाण्यांना बाधा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाते. ‘ग्रेडर’ द्वारे प्रतवारी होते.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) बियाणे उत्पादन निकषांनुसार क्षेत्रनिहाय लॉट तयार केले जातात. प्रतवारी केलेले
  • बियाणे पुणे येथे प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले जाते. यात उगवण क्षमता चाचणी, आनुवंशिक गुणधर्म आणि वाण शुद्धता चाचण्या केल्या जातात.
  • अहवाल प्राप्त झाल्यानंतर बियाणे ३० किलो प्लॅस्टिक कोटेड पॉलीबॅगमध्ये (गोण्या) भरण्यात येते. त्यासाठी केव्हीकेने गुरुत्वाकर्षण पद्धतीने प्रतवारी यंत्र आणि पॅकिंगसाठी शिवणयंत्र दिले आहे.
  • गोण्या सुरक्षित हाताळून ठेवल्या जातात. ही सर्व कामे गटाचे सदस्य करतात.
  • बीजोत्पादन व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • क्षेत्रीय प्रयोगांमुळे तंत्रज्ञान विस्तार
  • सोयाबीन उत्पादन एकरी- १० ते १२ क्विंटल
  • त्यातील बीजोत्पादन- ८ ते ९ क्विंटल
  • परिसरातील मोहदरी, चिंचोली, वडगाव, ब्राह्मणवाडा, रामनगर, वडझिरे, चाटोरी, सायखेडा, लोणारवाडी, सापनारी, चांदगाव अशा सुमारे २५ ते ३० किलोमीटर परिघातील विविध गावांत तसेच तीन जिल्ह्यांत बियाणे पुरवठा
  • बीजोत्पादनातून प्रति किलो १५ ते २० रुपये अधिक उत्पन्न
  • त्यातून गटातील सदस्यांमध्ये रुजला व्यावसायिक दृष्टिकोन
  • बियाणे उत्पादन (प्रातिनिधिक) वर्ष..  बियाणे उत्पादन  (क्विंटल)  बॅगेची किंमत २०११.. .७०                             . १५०० २०१३... ९०.                              १८०० २०१४.. .७०                              १९५० २०१५.. .१२०                             १९५० २०१७. ..९०                                १९५० २०१८.. .६०                                 २०४०

    टीप- दर बॅग प्रति ३० किलोचे

  • गटाचे अध्यक्ष सुनील भिसे. उपाध्यक्ष रामदास भिसे, सचिव- किरण बोराडे
  • गोरख एकनाथ भिसे ,भरत बोडके, राधाकृष्ण भिसे, भगवान झाडे, पांडुरंग भिसे, संदीप भिसे, मोहन बोडके, गोरख गणपत भिसे हे सदस्य.
  • रास्त दरात सत्यप्रत बियाण्याची विक्री महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निकषांवर बियाण्यांचे दर निश्चित केले जातात. सर्व शास्त्रीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर तयार झालेले बियाणे प्रति किलो ६५ ते ६८ रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकण्यात येते. शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे पुरवण्याचे गटाचे धोरण आहे. प्रत्येक सदस्याच्या बियाण्याची नोंद असते. विक्रीनंतर प्रत्येकाचा लाभांश वितरित केला जातो. दुय्यम प्रतीच्या सोयाबीनची स्थानिक बाजारात विक्री होते. ‘कृषी संजीवनी शेतकरी गट’ दृष्टिक्षेपात

  • एकूण सदस्य- ११
  • पैकी कृषी पदवीधर सदस्य...६
  • व कृषी पदविकाधारक...३
  • सामूहिक प्रयोगाचे फलित

  • उत्पादनासह उत्पन्न वाढल्याने सदस्यांची आर्थिक सुधारणा
  • परिसरात सुधारित बियाणे बदलण्याच्या प्रमाणात ४० टक्क्यांहून अधिक वाढ
  • कौशल्य विकसित करून सदस्यांनी बियाणे उद्योजक म्हणून मिळविली ओळख
  • आत्मा,नाशिकच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शनात ‘आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराने सन्मान
  • प्रतिक्रिया बाजारातील दरांपेक्षा आम्ही शेतकऱ्यांना कमी दरात गुणवत्ताप्राप्त सोयाबीनचे बियाणे पुरवत आहोत. किलोमागे चार रुपये आमचा दर कमी आहे. लवकरच बियाण्याचा ब्रॅण्ड तयार करून तो बाजारपेठेत यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. -सुनील भिसे-९४२३०६०३०८ अध्यक्ष, संजीवनी शेतकरी बचत गट पारंपरिक सोयाबीन उत्पादनाच्या तुलनेत ग्राम बीजोत्पादन संकल्पनेत सहभाग घेतल्याने मोह गावचे शेतकरी तंत्रज्ञानाभिमुख झाले. त्यातून आर्थिक स्तर उंचावल्याने त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सातत्य ठेवल्यास प्रगतीही सुरूच राहील. चालू वर्षी बियाणे तुटवडा झाल्याची जी परिस्थिती अनुभवली त्यावर मात करणे शक्य झाले आहे. -डॉ.प्रकाश कदम- ९४०३७७४७६२ विषय विशेषज्ञ, कृषीविद्या, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com