agriculture story in marathi, Sanjivani Group of Nasik District has set its identity in soyabean seed production. | Agrowon

संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर सोयाबीन बियाणे

मुकूंद पिंगळे
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील प्रयोगशील तरुण ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत संजीवनी शेतकरी बचत गटाची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात ते आले. तेथील कृषीविद्या शाखेचे विषय विशेषज्ञ डॉ.प्रकाश कदम यांनी सोयाबीन बीजोत्पादनाचे अर्थकारण व त्यातून उत्पन्नातील वाढ स्पष्ट केली. सोयाबीन बीज ग्राम संकल्पनेला त्यातून चालना मिळाली.

बीजोत्पादनाला अशी मिळाली चालना

 • पूर्वी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र अधिक होते. मात्र जमीन मध्यम- खोल काळ्या प्रकारची असल्याने शेंगाधारणा अवस्थेत पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम व्हायचा. सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीड-रोग व्यवस्थापनाचाही अभाव होता. या सर्व बाबीं तपासून तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले.
 • केव्हीके व तरुणांच्या माध्यमातून आत्मा यंत्रणेकडे गटाची नोंदणी झाली. जेएस-९३०५, एमएसीएस-११८८, डीएस-२२८ (फुले कल्याणी) व फुले संगम या वाणांचे ब्रीडर आणि फाउंडेशन बियाणे केव्हीकेमार्फत वेळोवेळी उपलब्ध करून दिले. बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा जिवाणू खतांचे साह्य करण्यात आले.

नियोजनातील प्रमुख बाबी:

 • हवामान आणि माती परीक्षणाद्वारे बीजोत्पादन कार्यक्रम आखणी
 • अधिक उत्पादकता, आकर्षक रंग, भौगोलिक परिस्थितीनुसार वा दुष्काळी परिस्थितीस प्रतिरोधक वाणांवर भर.
 • पीक तणावात असताना किमान संरक्षित सिंचनाची सुविधा
 • पेरणीपश्चात उगवण, शाखाविस्तार, फूलधारणा, शेंगा विकास आणि कापणीच्या अवस्थेत निरीक्षणे
 • एकमेकांच्या चर्चेतून पीकवाण वैशिष्ट्य़े, गुणधर्म व पिकांचा आढावा
 • गुणवत्ता टिकून राहण्यासाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदल
 • पेरणीपश्चात क्षेत्रात निवड केलेल्या वाणापेक्षा दुसरा वाण आढळून आल्यास ती झाडे काढून टाकली जातात. (rouging)
 • दोन विभिन्न वाणांच्या पेरणी क्षेत्रात गुणधर्म स्वतंत्र असावेत. यासाठी विलगीकरण करून अंतर ठेवले जाते. (isolation)
 • बियाणे प्रक्रिया धोरणानुसार प्रतवारी, पॅकिंग आणि लेबलिंग विषयी कौशल्य आधारित प्रशिक्षण गट सदस्यांना देण्यात आले आहे.

काढणीपश्‍चात तंत्र व्यवस्थापन

 • कापणीनंतर यांत्रिकी पद्धतीने उफणणी केली जाते. सोयाबीनच्या दाण्यांना बाधा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाते. ‘ग्रेडर’ द्वारे प्रतवारी होते.
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) बियाणे उत्पादन निकषांनुसार क्षेत्रनिहाय लॉट तयार केले जातात. प्रतवारी केलेले
 • बियाणे पुणे येथे प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले जाते. यात उगवण क्षमता चाचणी, आनुवंशिक गुणधर्म आणि वाण शुद्धता चाचण्या केल्या जातात.
 • अहवाल प्राप्त झाल्यानंतर बियाणे ३० किलो प्लॅस्टिक कोटेड पॉलीबॅगमध्ये (गोण्या) भरण्यात येते. त्यासाठी केव्हीकेने गुरुत्वाकर्षण पद्धतीने प्रतवारी यंत्र आणि पॅकिंगसाठी शिवणयंत्र दिले आहे.
 • गोण्या सुरक्षित हाताळून ठेवल्या जातात. ही सर्व कामे गटाचे सदस्य करतात.

बीजोत्पादन व्यवसाय दृष्टिक्षेपात

 • क्षेत्रीय प्रयोगांमुळे तंत्रज्ञान विस्तार
 • सोयाबीन उत्पादन एकरी- १० ते १२ क्विंटल
 • त्यातील बीजोत्पादन- ८ ते ९ क्विंटल
 • परिसरातील मोहदरी, चिंचोली, वडगाव, ब्राह्मणवाडा, रामनगर, वडझिरे, चाटोरी, सायखेडा, लोणारवाडी, सापनारी, चांदगाव अशा सुमारे २५ ते ३० किलोमीटर परिघातील विविध गावांत तसेच तीन जिल्ह्यांत बियाणे पुरवठा
 • बीजोत्पादनातून प्रति किलो १५ ते २० रुपये अधिक उत्पन्न
 • त्यातून गटातील सदस्यांमध्ये रुजला व्यावसायिक दृष्टिकोन

बियाणे उत्पादन (प्रातिनिधिक)

वर्ष..  बियाणे उत्पादन  (क्विंटल)  बॅगेची किंमत
२०११.. .७०                             . १५००
२०१३... ९०.                              १८००
२०१४.. .७०                              १९५०
२०१५.. .१२०                             १९५०
२०१७. ..९०                                १९५०
२०१८.. .६०                                 २०४०

टीप- दर बॅग प्रति ३० किलोचे

 • गटाचे अध्यक्ष सुनील भिसे. उपाध्यक्ष रामदास भिसे, सचिव- किरण बोराडे
 • गोरख एकनाथ भिसे ,भरत बोडके, राधाकृष्ण भिसे, भगवान झाडे, पांडुरंग भिसे, संदीप भिसे, मोहन बोडके, गोरख गणपत भिसे हे सदस्य.

रास्त दरात सत्यप्रत बियाण्याची विक्री
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निकषांवर बियाण्यांचे दर निश्चित केले जातात. सर्व शास्त्रीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर तयार झालेले बियाणे प्रति किलो ६५ ते ६८ रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकण्यात येते.
शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे पुरवण्याचे गटाचे धोरण आहे. प्रत्येक सदस्याच्या बियाण्याची नोंद असते. विक्रीनंतर प्रत्येकाचा लाभांश वितरित केला जातो. दुय्यम प्रतीच्या सोयाबीनची स्थानिक बाजारात विक्री होते.

‘कृषी संजीवनी शेतकरी गट’ दृष्टिक्षेपात

 • एकूण सदस्य- ११
 • पैकी कृषी पदवीधर सदस्य...६
 • व कृषी पदविकाधारक...३

सामूहिक प्रयोगाचे फलित

 • उत्पादनासह उत्पन्न वाढल्याने सदस्यांची आर्थिक सुधारणा
 • परिसरात सुधारित बियाणे बदलण्याच्या प्रमाणात ४० टक्क्यांहून अधिक वाढ
 • कौशल्य विकसित करून सदस्यांनी बियाणे उद्योजक म्हणून मिळविली ओळख
 • आत्मा,नाशिकच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शनात ‘आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराने सन्मान

प्रतिक्रिया
बाजारातील दरांपेक्षा आम्ही शेतकऱ्यांना कमी दरात गुणवत्ताप्राप्त सोयाबीनचे बियाणे पुरवत आहोत.
किलोमागे चार रुपये आमचा दर कमी आहे. लवकरच बियाण्याचा ब्रॅण्ड तयार करून तो बाजारपेठेत यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे.
-सुनील भिसे-९४२३०६०३०८
अध्यक्ष, संजीवनी शेतकरी बचत गट

पारंपरिक सोयाबीन उत्पादनाच्या तुलनेत ग्राम बीजोत्पादन संकल्पनेत सहभाग घेतल्याने मोह गावचे शेतकरी तंत्रज्ञानाभिमुख झाले. त्यातून आर्थिक स्तर उंचावल्याने त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सातत्य ठेवल्यास प्रगतीही सुरूच राहील. चालू वर्षी बियाणे तुटवडा झाल्याची जी परिस्थिती अनुभवली त्यावर मात करणे शक्य झाले आहे.
-डॉ.प्रकाश कदम- ९४०३७७४७६२
विषय विशेषज्ञ, कृषीविद्या, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...