कापूस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध सावनेर बाजार समिती

‘ ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात कापूस लागवड क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीने कापूस खरेदी विक्री व्यवहारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा व प्रोत्साहनपर उपक्रमही राबवले आहेत.
सावनेर बाजार समितीच्या आवारात कापसाची आवक
सावनेर बाजार समितीच्या आवारात कापसाची आवक

‘ ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात कापूस लागवड क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीने कापूस खरेदी विक्री व्यवहारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा व प्रोत्साहनपर उपक्रमही राबवले आहेत.    कधीकाळी ही बाजार समिती सोयाबीन व्यवहारासाठी ओळखली जायची. मात्र सोयाबीनची दरवर्षी कमी होणारी उत्पादकता पाहता क्षेत्र घटले, त्या पाठोपाठ आवकही. सन २०१०-११ पर्यंत चार हजार क्‍विंटल सोयाबीनची आवक व्हायची. आता ती घटली आहे.हरभरा, तूर, गहू यांच्याबरोबर मका आवकही वाढीस लागली आहे. दोन ते अडीच हजार क्‍विंटलपर्यंत त्याची आवक होते. जपला विश्‍वास चार जानेवारी, १९७३ मध्ये या बाजार समितीची स्थापना झाली. पंधरा एकरांत धान्याचे आवार आहे. तीन एकर जागा उपबाजार खापाअंतर्गंत आहे. या ठिकाणी जनावरांचा बाजार रविवारी भरतो. खरेदी किंमतीवर एक टक्‍का सेस आकारला जातो. दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा दर येथे बैलजोडील मिळतो. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तालुक्‍यातील १३५ गावे आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्‍वास पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून येथील प्रशासनाने जपला आहे. गेल्या वर्षी सेसच्य माध्यमातून तीन कोटी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. संपूर्ण परिसराला आवारभिंत असून एक प्रवेशव्दार आहे. चार सुरक्षारक्षक आहेत. त्या माध्यमातून शेतमालाचे संरक्षण होते. कायद्याप्रमाणे २४ तासांत पैसे देण्याचा नियम आहे. मात्र या ठिकाणी दोन ते तीन तासांत पैसे दिले जातात. कापूस खरेदी विक्रीचे हब कापूस खरेदी विक्रीसाठी सावनेर बाजारसमितीची ओळख आहे. दरवर्षी सात लाख क्‍विंटल कापसाची आवक होते. मध्यप्रदेश, आंधप्रदेश, उत्तरप्रदेशातील कापूसही येथे येतो. पारदर्शी व्यवहार प्रक्रिया, चुकाऱ्याची सोपी पध्दत यासोबतच मिळणारा चांगला दर अशी अनेक कारणे आवकेमागे आहेत. कापसावर पूर्वी एक रुपया पाच पैसे ‘सुपरव्हिजन’ शुल्क याप्रमाणे सेस आकारला जायचा. मात्र व्यवहाराला चालना मिळावी यासाठी ७५ पैसे सेस आणि पाच पैसे ‘सुपरव्हिजन’ शुल्क याप्रमाणे ८० पैशांपर्यंत कमी केला आहे. ‘सुपरव्हिजन’ शुल्क शासनाला अदा करावे लागते. गोदाम सुविधा चार गोदामे असून एकूण साठवणूक क्षमता २२७८ मे. टन आहे. शेतमाल तारण योजना स्वनिधीतून राबविली जाते. यास शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळतो. पाचशे रुपये प्रति क्‍विंटल दराने मक्‍याला तारण रक्‍कम दिली जाते. तूर, हरभरा आदी मालही ठेवण्यात येतो. बाजारात दर हमीभावापेक्षा कमी असला तरच शेतकरी तारण ठेवतात. जिनींग प्रेसींगची वाढली संख्या बाजार समिती अंतर्गंत चार जिनींग प्रेसिंग आहेत. त्यांच्याव्दारे खरेदी होते. एका व्यावसायिकाने पणनचा स्वतंत्र खरेदी परवाना मिळविला आहे. अशाप्रकारे कापसावर प्रक्रिया करणारे पाच उद्योग भागात असल्याने त्यांच्याकडून कापसाला मागणी राहते. प्रक्रिया उद्योग बंद ठेवता येत नसल्याने त्यांच्याकडून कमी आवकेच्या काळात शेतकऱ्यांना चांगले पैसे देऊन कापसाची खरेदी होते. खुल्या लिलाव पध्दतीचा अंगीकार सावनेर बाजारात १९ तर उपबाजार खापा येथे पाच याप्रमाणे अडत गाळे आहेत. पाच लिलाव शेडस आहेत. साडेसात हजार फुटाचा लिलाव ओटा आहे. एकूण पाच ओटे आहेत. खुली लिलाव प्रक्रिया राबविली जाते. नुकतीच ‘इ’ नाम बाजार समिती म्हणून सानवेरची निवड झाली आहे. त्यामुळे देशांतर्गंत बाजारातील दराचा अंदाज घेत शेतकऱ्यांना माल विकता येणार आहे. बाजार समिती वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांना विनामूल्य जेवणाची सोय. सुमारे १०० शेतकरी दररोज लाभ घेतात.
  • निःशुल्क कॉफी. त्यासाठी दुधाची संघाकडून खरेदी होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडील दुधालाही बाजारपेठ.
  • शेतकऱ्यांना निःशुल्क निवासाची सोय. आता इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यामुळे मोजणीची गती वाढल्याने मुक्‍कामाची गरज भासत नाही.
  • कोरोना संकटाच्या काळात खबरदारीच्या सर्व उपायांवर भर. निःशुल्क मास्कचे वितरण.
  • अडीच क्‍विंटल कापडापासून मास्क तयार करण्यात आले.
  • पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बाजार समितीला मास्क तयार करण्यासाठी कापडाचा पुरवठा केला.
  • ‘अ’ वर्ग व्यापारी ६५, अडते २५ आहेत. अन्य व्यापारी १२
  • माती परिक्षण सुविधा ट्रॅक्‍टर चालक प्रशिक्षण आणि दुरुस्ती याचबरोबर माती परिक्षण निःशुल्क करून देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. बाजार समितीचे कर्मचारी स्वतः शेतात जाऊन नमुने संकलित करतात. समितीच्या परिसरातच माती परिक्षण प्रयोगशाळा आहे. कृषी विभागाने त्यास मान्यता दिली आहे. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने दरवर्षी ४०० ते ५०० नमुन्यांची तपासणी होते. बक्षीस योजना बाजारात मालाची आवक वाढावी, खेडा खरेदीच्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीला चाप बसावा याकरिता प्रोत्साहनपर सात लाख रुपये किमतीच्या बक्षिसाची योजना राबवली जाते. पाच ते सात हजार शेतकरी यात सहभागी होतात. ज्याने माल विकला तेच योजनेस पात्र ठरतात. अधिकारी, पदाधिकारी, हमाल, मापारी असे कोणाचेही नातेवाईक बक्षिसासाठी अपात्र असतात. संपूर्ण पारदर्शी प्रक्रिया राबविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवर विश्‍वास आहे. संपर्क- बंडू ऊर्फ गुणवंत चौधरी-९९२३११६५०६ (सभापती) अरविंद दाते- ९९२३०८१८५१ (सचिव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com