agriculture story in marathi, Savner Market Committee has achieved name in cotton commodity. | Page 2 ||| Agrowon

कापूस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध सावनेर बाजार समिती

विनोद इंगोले
मंगळवार, 2 मार्च 2021

ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात कापूस लागवड क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीने कापूस खरेदी विक्री व्यवहारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा व प्रोत्साहनपर उपक्रमही राबवले आहेत. 

ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात कापूस लागवड क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सावनेर बाजार समितीने कापूस खरेदी विक्री व्यवहारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा व प्रोत्साहनपर उपक्रमही राबवले आहेत. 
 
कधीकाळी ही बाजार समिती सोयाबीन व्यवहारासाठी ओळखली जायची. मात्र सोयाबीनची दरवर्षी कमी होणारी उत्पादकता पाहता क्षेत्र घटले, त्या पाठोपाठ आवकही. सन २०१०-११ पर्यंत चार हजार क्‍विंटल सोयाबीनची आवक व्हायची. आता ती घटली आहे.हरभरा, तूर, गहू यांच्याबरोबर मका आवकही वाढीस लागली आहे. दोन ते अडीच हजार क्‍विंटलपर्यंत त्याची आवक होते.

जपला विश्‍वास
चार जानेवारी, १९७३ मध्ये या बाजार समितीची स्थापना झाली. पंधरा एकरांत धान्याचे आवार आहे. तीन एकर जागा उपबाजार खापाअंतर्गंत आहे. या ठिकाणी जनावरांचा बाजार रविवारी भरतो. खरेदी किंमतीवर एक टक्‍का सेस आकारला जातो. दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा दर येथे बैलजोडील मिळतो. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तालुक्‍यातील १३५ गावे आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्‍वास पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून येथील प्रशासनाने जपला आहे. गेल्या वर्षी सेसच्य माध्यमातून तीन कोटी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. संपूर्ण परिसराला आवारभिंत असून एक प्रवेशव्दार आहे. चार सुरक्षारक्षक आहेत. त्या माध्यमातून शेतमालाचे संरक्षण होते. कायद्याप्रमाणे २४ तासांत पैसे देण्याचा नियम आहे. मात्र या ठिकाणी दोन ते तीन तासांत पैसे दिले जातात.

कापूस खरेदी विक्रीचे हब
कापूस खरेदी विक्रीसाठी सावनेर बाजारसमितीची ओळख आहे. दरवर्षी सात लाख क्‍विंटल कापसाची आवक होते. मध्यप्रदेश, आंधप्रदेश, उत्तरप्रदेशातील कापूसही येथे येतो. पारदर्शी व्यवहार प्रक्रिया, चुकाऱ्याची सोपी पध्दत यासोबतच मिळणारा चांगला दर अशी अनेक कारणे आवकेमागे आहेत. कापसावर पूर्वी एक रुपया पाच पैसे ‘सुपरव्हिजन’ शुल्क याप्रमाणे सेस आकारला जायचा. मात्र व्यवहाराला चालना मिळावी यासाठी ७५ पैसे सेस आणि पाच पैसे ‘सुपरव्हिजन’ शुल्क याप्रमाणे ८० पैशांपर्यंत कमी केला आहे. ‘सुपरव्हिजन’ शुल्क शासनाला अदा करावे लागते.

गोदाम सुविधा
चार गोदामे असून एकूण साठवणूक क्षमता २२७८ मे. टन आहे. शेतमाल तारण योजना स्वनिधीतून राबविली जाते. यास शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळतो. पाचशे रुपये प्रति क्‍विंटल दराने मक्‍याला तारण रक्‍कम दिली जाते. तूर, हरभरा आदी मालही ठेवण्यात येतो. बाजारात दर हमीभावापेक्षा कमी असला तरच शेतकरी तारण ठेवतात.

जिनींग प्रेसींगची वाढली संख्या
बाजार समिती अंतर्गंत चार जिनींग प्रेसिंग आहेत. त्यांच्याव्दारे खरेदी होते. एका व्यावसायिकाने पणनचा स्वतंत्र खरेदी परवाना मिळविला आहे. अशाप्रकारे कापसावर प्रक्रिया करणारे पाच उद्योग भागात असल्याने त्यांच्याकडून कापसाला मागणी राहते. प्रक्रिया उद्योग बंद ठेवता येत नसल्याने त्यांच्याकडून कमी आवकेच्या काळात शेतकऱ्यांना चांगले पैसे देऊन कापसाची खरेदी होते.

खुल्या लिलाव पध्दतीचा अंगीकार

सावनेर बाजारात १९ तर उपबाजार खापा येथे पाच याप्रमाणे अडत गाळे आहेत. पाच लिलाव शेडस आहेत. साडेसात हजार फुटाचा लिलाव ओटा आहे. एकूण पाच ओटे आहेत. खुली लिलाव प्रक्रिया राबविली जाते. नुकतीच ‘इ’ नाम बाजार समिती म्हणून सानवेरची निवड झाली आहे. त्यामुळे देशांतर्गंत बाजारातील दराचा अंदाज घेत शेतकऱ्यांना माल विकता येणार आहे.

बाजार समिती वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांना विनामूल्य जेवणाची सोय. सुमारे १०० शेतकरी दररोज लाभ घेतात.
  • निःशुल्क कॉफी. त्यासाठी दुधाची संघाकडून खरेदी होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडील दुधालाही बाजारपेठ.
  • शेतकऱ्यांना निःशुल्क निवासाची सोय. आता इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यामुळे मोजणीची गती वाढल्याने मुक्‍कामाची गरज भासत नाही.
  • कोरोना संकटाच्या काळात खबरदारीच्या सर्व उपायांवर भर. निःशुल्क मास्कचे वितरण.
  • अडीच क्‍विंटल कापडापासून मास्क तयार करण्यात आले.
  • पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बाजार समितीला मास्क तयार करण्यासाठी कापडाचा पुरवठा केला.
  • ‘अ’ वर्ग व्यापारी ६५, अडते २५ आहेत. अन्य व्यापारी १२

माती परिक्षण सुविधा
ट्रॅक्‍टर चालक प्रशिक्षण आणि दुरुस्ती याचबरोबर माती परिक्षण निःशुल्क करून देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. बाजार समितीचे कर्मचारी स्वतः शेतात जाऊन नमुने संकलित करतात. समितीच्या परिसरातच माती परिक्षण प्रयोगशाळा आहे. कृषी विभागाने त्यास मान्यता दिली आहे. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने दरवर्षी ४०० ते ५०० नमुन्यांची तपासणी होते.

बक्षीस योजना
बाजारात मालाची आवक वाढावी, खेडा खरेदीच्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीला चाप बसावा याकरिता प्रोत्साहनपर सात लाख रुपये किमतीच्या बक्षिसाची योजना राबवली जाते. पाच ते सात हजार शेतकरी यात सहभागी होतात. ज्याने माल विकला तेच योजनेस पात्र ठरतात. अधिकारी, पदाधिकारी, हमाल, मापारी असे कोणाचेही नातेवाईक बक्षिसासाठी अपात्र असतात. संपूर्ण पारदर्शी प्रक्रिया राबविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवर विश्‍वास आहे.

संपर्क- बंडू ऊर्फ गुणवंत चौधरी-९९२३११६५०६
(सभापती)

अरविंद दाते- ९९२३०८१८५१
(सचिव)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...