पैदाशीसाठी निवडा सशक्त, जातिवंत शेळ्या

फायदेशीर शेळी पालनासाठी
फायदेशीर शेळी पालनासाठी
गोठ्यातील खरेदी केलेल्या शेळ्यांची प्रत चांगली नसेल, तर त्याचा शेळीपालनाच्या नफा- तोट्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जातिवंत, उत्तम आरोग्य, उत्तम वंशावळ व उत्तम शारीरिक ठेवण असणाऱ्या शेळ्यांची निवड महत्त्वाची ठरते.   शेळीपालन व्यवसाय जर यशस्वीरीत्या करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातिवंत शेळ्यांची निवड. खरेदी करताना पुढील बाबी तपासूनच शेळ्यांची निवड करावी. पैदाशीच्या शेळीची निवड
  • सुधारित शेळीच्या जातींची निवड करावी. उदा. संगमनेरी, उस्मानाबादी किंवा बोअर संकरित जात
  • दोन करडे देणारी शेळी पैदाशीसाठी निवडावी.
  • करडाचे जन्मतः वजन जास्त असावे. आई- वडिलांची वजनवाढ चांगली असेल अशा करडांची निवड करावी.
  • पावसाळ्यात शेळी खरेदी करू नये, हिवाळ्यात शेळ्यांची खरेदी करणे उत्तम असते.
  • शक्‍यतो दुसऱ्या वेताची व गाभण शेळी स्थानिक व माहितीतील लोकांकडूनच निवडावी.
  • शेळी विकत आणल्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर प्रत्येक शेळी ओळखण्यासाठी व वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी शेळ्यांना ओळख नोंदणी क्रमांक (Ear Tagging) देणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्या शेळीचे वय तिचे दात पाहून कळू शकते.
  • लांब अंतरावरून शेळी आणणार असल्यास गाभण शेळी घेऊ नये.
  • डोळ्यातून, नाकातून पाणी येणारी, मागचा भाग खराब असणारी, नाकपुडी कोरडी असलेली शेळी निवडू नये. ही रोगट शेळीची लक्षणे आहेत.
  • शेळीमध्ये कोणताही शरीरदोष नसावा.
  • निवडली जाणारी शेळी भरपूर दूध देणारी, शांत व तिला उपजत मातृप्रेम असावे.
  • शेळी व बोकड शांत, निरोगी, पैदासक्षम, सशक्त, कातडी नरम, मऊ व चकाकणारी असलेले असावे.
  • पाठीचा कणा सरळ, लांब असणे महत्त्वाचे आहे. सुंदर शरीरयष्टी, मागच्या पायाच्या गुडघ्याचा कोन १६० अंश, कणखर खूर व सांधा, गुडघे सरळ असावेत.
  • मागून जास्तीत जास्त रुंद, पोट फुगलेले, पाठीचा कणा सरळ व जास्त रुंद, मागच्या पायाच्या मांड्या मांसल व काटक असाव्यात.
  • शरीराचा मध्य काढल्यास मागचा व पुढचा असे दोन समान भाग पाडावेत.
  • मान लांब व खांद्यावर व्यवस्थित जोडलेली असावी.
  • उंच खांदे व बाहेरून न दिसणाऱ्या; पण हाताला लागणाऱ्या बरगड्या असाव्यात.
  • नरामध्ये छाती रुंद व मादीमध्ये जास्त त्रिकोणी असावी.
  • मागच्या पायांची रचना सरळ असावी व पायाचे खूर पायाच्या सरळ रेषेत असावेत.
  • कास जास्त लोंबकळणारी नसावी व भरीव असावी.
  • कास जास्तीत जास्त वरती जोडलेली असावी व कासेच्या मधली लाइन जास्त खोल नसावी.
  • कासेचे सड आतल्या किंवा बाहेरील बाजूला वळलेले नसावेत.
  • कासेला दोनपेक्षा जास्त सड नसावेत व दोन्ही सडांतून दूध येत नसावे.
  • कासेला जोडणारी शीर मोठी असावी व कास दोन्ही पायांमध्ये जास्त मागे किंवा पुढे नसावी.
  • कानाचे छिद्र मोकळे आहे का, गळ्याला सूज किंवा गाठ आहे का, डोळ्यातून पाणी येते का किंवा डोळ्याला सूज आहे का, हे पाहून घ्यावे.
  • पाठीमागचा भाग भरलेला, नाकातून स्राव, तोंडाला व पायांच्या खुरांमध्ये जखमा असतील तर शेळी निरोगी नाही असे समजावे. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी.
  • शेळी पैदाशीसाठी चांगली असावी व २ वर्षांतून ३ वेते देणारी असावी.
  • जास्त किंमत द्यावी लागली तरी शेळीपालकांकडूनच जातिवंत शेळ्या व बोकड यांची खरेदी करावी.
  • एक करडू देणारी व आजारी, विनाउपयोगी शेळी कळपातून लवकर बाहेर काढावी.
  • संपर्क ः डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

     

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com