agriculture story in marathi, Shaila Shinde of Sangli District has became a successful poultry business women. | Agrowon

उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक पोल्ट्री उद्योजक

अभिजित डाके
मंगळवार, 28 जुलै 2020

पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित युवा महिलेने हिंम्मत, धडाडी, ‘फायनान्स’ विषयातील शिक्षण, ज्ञान व कुशल व्यवस्थापन यांच्या बळावर १२ हजार ब्रॉयलर पक्षांचा व्यवसाय यशस्वी केला आहे. एक कोटींपर्यंत उलाढाल पोचवली आहे.

पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित युवा महिलेने हिंम्मत, धडाडी, ‘फायनान्स’ विषयातील शिक्षण, ज्ञान व कुशल व्यवस्थापन यांच्या बळावर १२ हजार ब्रॉयलर पक्षांचा व्यवसाय यशस्वी केला आहे. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून व्यवसायाकडे काटेकोर लक्ष देताना त्यांनी एक कोटींपर्यंत उलाढाल पोचवली आहे.
 
सांगली जिल्ह्यात पळशी (खानापूर- विटा नजीकचे) येथे तुषार पाटील यांचे कुटुंब राहते. तुषार एका कंपनीतील नोकरीचा अनुभव घेऊन आता पूर्णवेळ निर्यातक्षम द्राक्षशेती पाहतात. त्यांच्या पत्नी प्रतीक्षा पाटील (माहेरच्या शैला शिंदे) तब्बल १२ हजार ब्रॉयलर पक्षांच्या पोल्ट्रीची जबाबदारी पाहतात. त्यांचे या व्यवसायातील कार्य समस्त पोल्र्टी व्यावसायिकांसाठी आदर्श असेच म्हणायला हवे.

उच्चशिक्षित शैला यांची पार्श्‍वभूमी
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे या दुष्काळी गावातील बाळासाहेब शिंदे हे शैला यांचे वडील.
आई सौ. सुमन, भाऊ प्रवीण आणि संदीप असे त्यांचे कुटुंब. शैला यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स (८०० मीटर धावणे) स्पर्धेत यश संपादन केले. पुणे येथून एम.कॉम, एमबीए (फायनान्स) व डिप्लोमा इन टॅक्सेशन या पदव्या घेतल्या. पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये फायनान्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काही काळ अनुभव घेतला.

पोल्ट्री व्यवसायातील करिअर

 • सुमारे आठ वर्षांपूर्वी नोकरी सोडून शैला गावी आल्या. उद्योजक म्हणून स्वतःला घडवण्याचे प्रयत्न सुरू केले.
 • टेक्स्टाईल व्यवसायाचा विचार होता. दोन कोटींची आवश्यकता होती. अवघे चार लाख रुपये हाती होते. या भांडवलावर पोल्ट्री हाच व्यवसाय समोर आला.
 • दरम्यान संग्राम देशमुख यांची भेट झाली. खेळातील प्रावीण्यामुळे अकॅडमी ‘जॉईन’ करण्याचा सल्ला दिला. मात्र गुडघ्यांचा त्रास होत असल्याने त्यात खंड पडला होता. अखेर देशमुख यांनी शैला यांच्यातील क्षमता ओळखून उद्योजक होण्याची दिशा दाखवली.
 • स्वतःकडील पैसे उभारून शेड उभारले.

पहिला अनुभव

 • सन २०१२ मध्ये सात हजार चौरस फुटाचे पहिले शेड उभारले. ४५ दिवसांनी पहिल्या बॅचची विक्री झाली. तेव्हा एक लाख रुपये मिळाले. ते पाहून घरातील सर्वांना खूप आनंद झाला. त्यानंतर उत्तेजन मिळत गेले आणि व्यवसायाची दिशा ठळक होत गेली.

आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

 • प्रति सात हजार चौरस फुटांचे दोन शेडस
 • सध्याची पक्षी संख्या १२ हजार
 • सण, समारंभ तसेच वर्षांतील मागणी ओळखून त्यानुसार पुरवठा होण्यासाठी
 • तीनहजार, ६००० अशा पक्षांच्या बॅचेस
 • दर ४५ दिवसांची बॅच
 • पक्षांना खाद्य देण्यासाठी स्वतःची फीडमील
 • त्यामुळे त्यावरील खर्चात २० ते २५ टक्के बचत
 • ३००० पक्षांसाठी वयानुसार दररोज १०० किलोपासून ते एक टनांपर्यंत खाद्याची गरज. 
 • शेडची स्वच्छता आणि खाद्य नियोजनातूनच पक्षांची वाढ.
 • चांगल्या ‘ब्रीड’च्या पक्षांची खरेदी.
 • -स्वतः पक्षांना लसीकरण करतात.
 • कच्च्या मालाची शेतकरी आणि मार्केटमधून खरेदी
 • विक्री- कोल्हापूर, पंढरपूर, गोवा, कर्नाटक, नागज, शिरढोण
 • प्रति १२ हजार पक्षांसाठी प्रति बॅच सुमारे २० लाख रुपयांचे भांडवल लागते.
 • वर्षात पाच बॅचेस झाल्यास उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत

शैला यांनी दिलेल्या टीप्स

 • एक- दोन बॅचेसचा नफा वा तोटा पाहून गणीत ठरवता येत नाही. वर्षभर सातत्य ठेवले तर नफा होऊ शकतो.
 • सण-समारंभ, वर्षातील मागणी असलेले दिवस असे शेड्यूल तयार करूनच त्यानुसार बॅच घेण्यासाठी पक्षांची संख्या ठरवावी.

व्यवहारातील अनुभव
शैला सांगतात की ज्या कंपनीकडून पक्षी खरेदी व्हायची त्यांनाच पक्षी दिले जायचे. पुढे काही गोष्टी पटल्या नाहीत. मग व्यापाऱ्यांशी संपर्क केला. मार्केटदरापेक्षा किलोला ५ रुपये दर कमी मिळायचा. त्यामुळे स्वतः मार्केटमध्ये उतरले. जुन्याजाणत्यांशी संपर्क केला. त्यांना योग्य दरात विक्री केली. पक्षांचे वजन, गुणवत्ता पाहून मागणी वाढली. दरही वाढवून मिळाला. त्यानंतर मध्यस्थ नसल्याने थेट विक्री सुकर झाली.
 
शैला यांच्याकडून घेण्याजोगे

शिक्षण- -पोल्ट्री व्यवसायातील कोणतेही ज्ञान नव्हते. विटा परिसरातील अनुभवी व्यक्तींना भेटून ज्ञान मिळवले. डॉ. पोळ यांनीही मार्गदर्शन केले.

कष्टांची तयारी- सकाळी सहापासून ते रात्री दहापर्यंत अखंड काम. घरचा स्वयंपाक, अन्य जबाबदाऱ्या, मुलगी मनवाचे संगोपन आदी सांभाळून व्यवसायाचे नियोजन
पती तुषार, सासरे अरविंद, सासू विमल यांची समर्थ साथ.
 
अभ्यास- -व्यवसायातील प्रत्येक बारकावा, प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा जाणून त्यानुसार सुधारणा

संकटातही धडाडी- चिकन खाल्याने कोरोना होतो असा समज लोकांमध्ये पसरला होता. पक्षांचे दर प्रचंड घसरले. अशावेळी शैला यांनी वेळ न दवडता मनुष्यबळ घेऊन परिसरातील गावांमध्ये जाऊन ग्राहकांत प्रबोधन करीत थेट विक्री केली. संकटातही साठ हजार रुपयांचा नफा अशा रितीने मिळवला. ,

भविष्यातील तरतूद- देशी कोंबड्यांची मोठी हॅचरी उभारण्याचा विचार

शैला शिंदे याच नावाने ओळख
लग्नानंतर मुलींचे नाव बदलले जाते. शैला यांचे सासरचे नाव प्रतीक्षा पाटील असे झाले. मात्र व्यवसायात त्या माहेरच्याच नावाने परिचित होत्या. आजही हेच नाव रूढ झाले आहे.

 प्रतिक्रिया 
एवढी उच्चशिक्षित मुलगी म्हटल्यावर मोठी नोकरी किंवा वेगळे करिअर करायचे सोडून पोल्ट्री व्यवसाय करणार असे कळताच अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. पण फायनान्स क्षेत्रातील माझे शिक्षण व ज्ञानाचा या व्यवसायात मोठा उपयोग होऊ शकतो याबाबत मला आत्मविश्‍वास होता. त्यामुळेच खाद्य, पाणी, आर्थिक ताळेबंद, तांत्रिक नियोजन करणे मला शक्य झाले.
कोणताही व्यवसाय हलका नसतो. तुमचे ज्ञान पणाला लावून तो तुम्ही मोठा करू शकता. मी तेच केले आहे.
-शैला शिंदे 
संपर्क- ८६६९५६७८२२, ९५२७६७९०६६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...