तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधार

खरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास शेजूळ यांची पाच एकर शेती आहे. मात्र रेशीम शेती, शेळीपालन व कोंबडीपालन हे तीन पूरक व्यवसाय दहा गुंठे क्षेत्रात सुरू केले. घरातील सर्व सदस्यांची मेहनत, एकोपा, उत्तम नियोजन यातून त्यात वृद्धी केली. शेतीचे अर्थकारण मजबूत केले.
 पूरक व्यवसायात संपूर्ण कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
पूरक व्यवसायात संपूर्ण कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

खरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास शेजूळ यांची पाच एकर शेती आहे. मात्र रेशीम शेती, शेळीपालन व कोंबडीपालन हे तीन पूरक व्यवसाय दहा गुंठे क्षेत्रात सुरू केले. घरातील सर्व सदस्यांची मेहनत, एकोपा, उत्तम नियोजन यातून त्यात वृद्धी केली. शेतीचे अर्थकारण मजबूत केले. उद्योगाचे शहर म्हणून जालना शहराची ओळख आहे. त्यास लागूनच असलेल्या खरपुडी ( ता.. जि..जालना ) येथे कैलासराव दत्तात्रेय शेजूळ यांची पाच एकर शेती आहे. पत्नी कुशीवर्ता यांच्यासह गणेश व मुकुंद ही दोन मुले, प्रियांका व शीतल या सुना व दोन नाती असा आठ सदस्यांचा त्यांचा परिवार आहे. मुलगा गणेश दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालवितो. तर मुकुंद एका ‘स्टील’ विषयक कंपनीत कार्यरत आहे. त्यातून मिळणाऱ्या वेळेतून ते शेतीचीही जबाबदारी सांभाळतात. पूरक व्यवसायांचे नियोजन वडिलोपार्जित शेतीत दोन विहिरी आहेत. मात्र पाणी जेमतेम आहे. वर्षभरापूर्वी शेततळ्याची निर्मिती उभारून पाण्याचा शाश्‍वत स्रोत उभारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हंगामी बागायती वाटत असली तरी या शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघडच होते. त्यामुळे कैलासराव पूरक व्यवसाय करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासमोर शेळीपालनाचा पर्याय होता. कारण कुटुंबात अनेक वर्षांपासून एक- दोन शेळ्या पाळल्या जायच्या. त्यातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळायचा. दरम्यान गावातीलच खरपुडी कृषी विज्ञान केंद्र त्यांनी गाठले. तिथेही शेळीपालन करण्याचाच सल्ला मिळाला. कुटुंबाकडील जमापुंजीतून २०१६-१७ मध्ये व्यवसायास सुरवात केली. विस्तार करण्याचे मनात आल्याने शास्त्रोक्‍त प्रशिक्षण घेतले. रेशीम शेती लगतच्या कचरेवाडी येथील रेशीम उत्पादकांचाही आदर्श समोर होता. त्या प्रेरणेतून कैलासराव व त्यांच्या परिवाराने रेशीम शेतीचे धडे घेतले.सन २०१७ मध्ये हा व्यवसाय सुरू केला. एवढ्यावरच न थांबता गावरान कोंबडीपालनाला मागील वर्षी सुरवात केली. पारंपारिक शेतीत गुरफटून न राहता या तीनही व्यवसायांच्या विस्ताराचं गणित डोक्‍यात पक्कं बसलं आहे. घरातील सर्वांच्या मेहनतीमुळं बाहेरील मजूरबळ कमी होऊन मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. त्यातून स्वतः:चं पक्‍क घर उभे राहते आहे. पूरक व्यवसायासंबंधी शेळीपालन

  • अर्धबंदिस्त शेळीपालन. सुरवातीला ६० हजार खर्चून उस्मानाबादी जातीच्या १० शेळ्या व एक बोकड घेतला.
  • सध्या संख्या ७०
  • दोन लाख रुपये खर्चून शेडनिर्मिती. एकूण गुंतवणूक अडीच लाख रू.
  • वर्षातून दोन वेळा लसीकरण. दिवसातून दोन वेळा शेडची स्वच्छता.
  • महिन्यातून एक वेळा निर्जंतुकीकरण
  • वर्षाला या व्यवसायातून दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न
  • नग व वजन अशी दोन्ही पद्धतीने विक्री. वजनावर ४०० ते ६०० रुपये प्रति किलो दर.
  • एकूण चारा क्षेत्र दीड एकर. दशरथ, पवना व नेपिअर गवत
  • वाळलेल्या चाऱ्यात कडबा, सोयाबीन, हरभरा, तूर, भूस व मूरघासाचा वापर
  •  दरवर्षी पाच हजारांचा चारा विकत घेतात.
  • ७० हजार रुपये खर्चून बनविले भुसा साठवण घर
  • बांधावर व शेडभोवती शेवरी, सुबाभूळ .
  • रेशीम व्यवसाय

  • एक एकर क्षेत्रावर तुती लागवड, रेशीम अळी संगोपनाचे मजबूत शेड
  • पहिल्याच वर्षी पाऊस कमी असल्याने घेतल्या केवळ दोन बॅचेस
  • प्रति १०० अंडीपुंजाची एक बॅच
  • प्रति बॅच ८० ते १०० किलोपर्यंत उत्पादन
  • अळ्यासाठी बांधला मजबूत शेड
  • मागील वर्षी चार बॅचेस घेतल्या.
  • जालना मार्केटला विक्री. प्रति किलो २५० रुपयांपासून ते ३७५ रुपयांपर्यंत मिळतो दर.
  • गावरान कोंबडीपालन

  • ३० कोंबड्या व पाच नरांपासून सुरू केला व्यवसाय. १५ हजार रुपयांची सुरवातीची गुंतवणूक.
  • दररोज सुमारे ३० ते ४० पर्यंत होते अंड्यांची विक्री. प्रति नग दर १५ रुपये.
  • मागणी व उपलब्धतेनुसार कोंबड्यांचीही विक्री.
  • संपर्क- कैलासराव शेजूळ-९६३७३०४०९९ शेळीपालन, रेशीमशेती व कोंबडीपालन अशा विविध पूरक व्यवसायांमधून शेजूळ यांनी आपले अर्थकारण उंचावले आहे. रोजगार निर्मितीसाठी रेशीम शेती फायदेशीर असून दर महिना नोकरी प्रमाणे उत्पन्न ग्रामीण युवकांना त्यातून मिळू शकते. -डॉ. हनुमंत मोतीराम आगे विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जि. जालना. ७३५००१३१८१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com