agriculture story in marathi, Shivanand Randive from Solapur Dist. has done crop pattern change through Banana in Sugarcane belt. | Agrowon

ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदल

सुदर्शन सुतार
गुरुवार, 14 जानेवारी 2021

तुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद रणदिवे यांनी ऊसपट्ट्यात केळी लागवडीतून पीकबदल साधला आहे. केळी उत्पादनाचा त्यांचा नवा अनुभव उत्साह वाढवणारा ठरला असून, निर्यातदारांमार्फत दुबई येथे केळी पाठवण्यातही ते यशस्वी झाले आहेत.

तुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद रणदिवे यांनी ऊसपट्ट्यात केळी लागवडीतून पीकबदल साधला आहे. केळी उत्पादनाचा त्यांचा नवा अनुभव उत्साह वाढवणारा ठरला असून, निर्यातदारांमार्फत दुबई येथे केळी पाठवण्यातही ते यशस्वी झाले आहेत.
 
मोहोळ-पंढरपूर महामार्गावर तुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे शिवानंद रणदिवे यांची वडिलोपार्जित शेती आहे. गेली वीस वर्षे ते शेती करतात. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. मोठे रामचंद्र, मधले शिवानंद व लहान इंद्रजित असे तीन बंधू, आई, पत्नी, भावजय, मुले, पुतणे-पुतणी असे १३ सदस्यांचे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. रामचंद्र शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. तेही दोन्ही भावांसमवेत शेती करतात. प्रयोगशील शेतकरी म्हणून या कुटुंबाची ओळख आहे. शेतीतील उत्पन्नातून पूर्वीच्या २० एकरांवरून त्यांनी ५० एकर शेती नव्याने घेतली. सध्या ७० एकरांत २० एकर केळी, तीन एकर द्राक्ष, १० एकर शेवगा व ३० एकर ऊस आणि नव्याने आणखी १० एकरांत केळी आहे.

असा घडला पीकबदल
तुंगत हा सर्वाधिक ऊसपट्टा म्हणून गणला जातो. अगदी काही अंतरावरील भीमा नदी आणि उजनी धरणाच्या कालव्यामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता या भागात आहे. शिवानंद यांनीही उसाचे एकरी ११० टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. पण दरातील चढ-उतार आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्यानं पीकबदल हवा होता. त्यातूनच २०१५ मध्ये डाळिंबाची लागवड केली.
मात्र त्यातून फारसे हाती लागले नाही. त्यानंतर गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेत २०१८ मध्ये केळी लागवडीचा निर्णय घेतला. नवीन पीक असल्यानं सुरुवातीला कठीण वाटलं.
पण माघार नाही असं म्हणत त्यात उडी घेतली. आवश्यक माहिती घेतली. अभ्यास केला.

व्यवस्थापनातील बाबी
केळीसाठी जी-9 वाणाची टिश्युकल्चर रोपे निवडली. सहा बाय पाच फूट व सात बाय पाच फूट
अशा अंतरावर लागवड केली आहे. लागवडीनंतर दहा दिवसांनी १९-१९-१९ व ह्युमिक ॲसिड यांचा वापर केला. मुख्य विद्राव्य खतांचा वापर करताना तिसऱ्या महिन्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फेरस सल्फेट आणि दुय्यम अन्नद्रव्ये देण्यात आली. नवव्या महिन्यात फॅास्फोरिक ॲसिड आणि पोटॅशिअम सोनाइट प्रत्येकी पाच लिटर आलटून-पालटून दोन वेळा दिले. अकराव्या महिन्याच्या सुमारास केळी काढणीस आली.

केळी पोहोचली दुबईला
ग्रॅंड नैन वाणाच्या उतिसंवर्धित वाणांची रोपांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी विक्रीसाठी त्यांना बाजारात जाण्याची गरज लागली नाही. निर्यात करणारी व्यापारी कंपनी थेट बांधावर पोचली. सरासरी १३ रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळाला. एकरी ३५ टनांच्या आसपास उत्पादन मिळाले. प्रति रास २५ किलोच्या पुढे व ३० किलोपर्यंत मिळाली. पाच एकरांतून मिळालेल्या उत्पन्नातून हा प्रयोग उत्साह वाढवणारा ठरला. यंदाही खोडवा केळीची काढणी सुरू आहे. प्रति किलो १० रुपये दर आहे. आतापर्यंत एकरी १० टन उत्पादन मिळाले आहे. सध्या प्लॅाट सुरू असून, किमान महिना-दीड महिन्यापर्यंत हंगाम चालेल.

यंदा नव्याने क्षेत्रविस्तार
सध्या १० एकर क्षेत्र केळीखाली आहे. नव्यानेच गेल्या आठवड्यात १० एकरांत लागवड वाढवली आहे. तर आणखी पंधरवड्यानंतर पुन्हा १० एकरांत नव्या लागवडीचा विचार आहे. त्याची तयारी सुरू आहे. शिवानंद यांनी पीकबदल महत्त्वाचा मानताना शेवगा आणि द्राक्षांसारखी फळबागही घेतली. सध्या शेवग्याची दहा एकरांत तर द्राक्षाची तीन एकरांत लागवड आहे. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने नावीन्याचा शोध घेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. केळी लागवडीमध्ये अवघ्या दोनेक वर्षांपासून शिवानंद आहेत. पण त्याबद्दलची नेमकी आणि अचूक माहिती मिळवत त्याचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे.

संपर्क- शिवानंद रणदिवे, ८८३०८२२०७२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...