पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या कोठीपोटमध्ये जाते.
यशोगाथा
तीन एकरांतील पेरूबाग फुलवतेय अर्थकारण
- ऊस हेच प्रमुख पीक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काही शेतकरी भागासाठी वेगळ्या फळपिकांकडे वळताना दिसत आहे. कागल तालुक्यातील गलगले या कर्नाटक सीमेजवळील गावातील शिवराज बाळकृष्ण साळोखे यांनी उसासह तीन एकरांत मोठ्या आकाराच्या पेरूची बाग तीन एकरांत फुलविली आहे. व्यवस्थापन व फळाची गुणवत्ता जोपासून बांधावरच त्यास बाजारपेठ मिळवली आहे.
ऊस हेच प्रमुख पीक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काही शेतकरी भागासाठी वेगळ्या फळपिकांकडे वळताना दिसत आहे. कागल तालुक्यातील गलगले या कर्नाटक सीमेजवळील गावातील शिवराज बाळकृष्ण साळोखे यांनी उसासह तीन एकरांत मोठ्या आकाराच्या पेरूची बाग तीन एकरांत फुलविली आहे. व्यवस्थापन व फळाची गुणवत्ता जोपासून बांधावरच त्यास बाजारपेठ मिळवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात गलगले हे छोटे गाव आहे. कर्नाटक जिल्ह्याची सीमा येथून जवळ आहे. गावात शिवराज साळोखे यांची आठ एकर शेती आहे. नदीचे पाणी नसले तरी विहिरीच्या पाण्यावर त्यांनी बारमाही शेती केली आहे. सुमारे साडेचार एकर क्षेत्रावर ऊस, तर तीन एकरांत पेरूची बाग उभी आहे. पूर्वी ते उसाबरोबर शेवगा, मिरची, आले आदी पिके घ्यायचे. उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास मर्यादा येत होत्या. उसासारखे दीर्घ पीक, त्यामुळेच रक्कम हाती येण्यास कालावधी लागायचा. कमी पाणी व मनुष्यबळ या देखील समस्या होत्या. त्यामुळे शिवराज वेगळ्या पिकांच्या शोधात ते होते.
पेरूची लागवड
सन २०१३ मध्ये पुणे येथील कृषी प्रदर्शनात कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या पेरूची व मोठ्या आकाराच्या वाणाची माहिती मिळाली. या पिकाविषयी आकर्षण जागृत झाले. मात्र त्वरित निर्णय न घेता मराठवाडा, सोलापूर आदी भागांतील काही पेरू बागांना भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली. बाजारपेठ अभ्यासली. अखेर एक एकर क्षेत्रावर प्रयोग करण्याचे निश्चित केले.
रायपूर (छत्तीसगड) येथून ऑनलाइन पद्धतीने रोपे मागवली. वाहतुकीसह ती १९० रुपये प्रति नग या दराने मिळाली. सन २०१४ मध्ये एक एकरात लागवड झाली. जमिनीची दोन वेळा उभी-आडवी नांगरणी केली. एकरी चार ट्रॉली शेणखत वापरून जमीन तयार करून घेतली. बारा बाय आठ फूट अंतरावर लागवड केली. एकरी सुमारे ४५० झाडे बसली. या पिकातील अनुभव नसल्याने ज्यांच्याकडून रोपे आणली त्यांच्याकडून विद्राव्य खते व अन्य निविष्ठांच्या वापराविषयी मार्गदर्शन घेतले.
एक गाय असल्याने जिवामृत तयार करून महिन्यातून एकदा त्याचा वापर केला जातो.
व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे
- साधारण सव्वा वर्षांतून दोन वेळा बहर घेण्यात येतो. उदाहरण सांगायचे तर मे- जूनमध्ये हार्वेस्टिंग आले तर त्यानंतर महिन्याने छाटणी होते. छाटणीनंतर पुन्हा सुमारे सहा महिन्यांनी उत्पादन येण्यास सुरुवात होते.
- फळ लिंबाच्या आकाराचे झाल्यानंतर त्यास बॅगिंग (आच्छादन केले जाते.) त्यामुळे किडी वा
- फळमाशीचा त्रास रोखण्याबरोबरच फळाची गुणवत्ता व चकाकी चांगली येण्यास मदत होते.
- बॅगिंग करण्यासाठी प्रति फळामागे दोन रुपये खर्च येतो. त्यामुळे पुढे त्यास चांगला दर मिळतो.
- शिवराज सांगतात की पंधरा ऑक्टोबर ते १५ जानेवारी या काळात अन्य भागातूनही पेरूची आवक होत असते. त्यामुळे या काळात पेरूचे दर तुलनेने कमी म्हणजे किलोला ४५ रुपयांपर्यंत असतात.
- मे ते सप्टेंबर या काळात हे दर ५० रुपयांपासून ६० ते ७० रुपयांपर्यंत असतात.
- प्रति झाडावर योग्य म्हणजे ३५ ते ४० पर्यंत फळे ठेवली जातात. संख्या जेवढी आटोक्यात तेवढी
- फळांची गुणवत्ताही टिकून राहते.
- प्रति झाड सुमारे १५ ते २० किलो तर प्रति बहर सुमारे सहा ते सात टनांपर्यंत उत्पादन मिळते.
- काढणी सुरू झाली, की दररोज तीनशे किलो माल उपलब्ध होतो. पेरूचे वजन अर्धा किलोपासून दीड किलोपर्यंत असते. शिवराज यांना भाऊ रविराज, भावजय वनिता, पत्नी राजलक्ष्मी आदींची या वेळी मोठी मदत होते.
- कोल्हापूर, जयसिंगपूर भागांतील व्यापारी बागेत येऊन वजन करून पेरू घेऊन जातात.
लॉकडाउनमध्ये समाधानकारक विक्री
लॉकडाउनच्या काळात बाजारपेठा बंद असल्या तरी फेरीवाल्यांकडून विक्री सुरू होती. त्याचा फायदा झाला. विक्रेत्यांकडून पेरूची मोठी मागणी नोंदविण्यात येत होती. या काळात पेरूला सातत्याने ५० रुपये प्रति किलो दर मिळाला. शिवराज यांनी आपल्या बागेतून थेट ग्राहकांनाही किलोला ८० रुपये दराने विक्री केली. त्याचा चांगला फायदा झाला.
पेरूविषयक अनुभव
शिवराज सांगतात की कमी पाणी व बाजारात मागणी हे मुद्दे विचारात घेऊन मी पेरू लागवडीकडे वळलो. या मोठ्या आकाराच्या पेरूमध्ये बियांची संख्या कमी असते. गर जास्त असतो. साल पातळ असते. गोडीही मध्यम असल्याने मधुमेही लोकही त्यास पसंती देत आहेत.
आमच्या भागात कुठेच बाग नसल्याने माझ्याकडील पेरूला दररोज मागणी असते. अनेक जण दहा- वीस किलो इतक्या मोठ्या प्रमाणातही पेरू घेऊन जातात. उसापेक्षा हे पीक नक्कीच फायदेशीर ठरते आहे.
संपर्क- शिवराज साळोखे, ८८०५२३७०३९
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››