agriculture story in marathi, Shivtej farmer producer company of Pune- Narayangaon has made promising progress in last 3 to four years. | Agrowon

उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळी

गणेश कोरे
शनिवार, 8 मे 2021

शेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी नारायणगाव (ता. जुन्नर. जि. पुणे) येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत आहे. निविष्ठा विक्री केंद्र, परसबाग, फळे-भाजीपाला थेट विक्री आदी यशस्वी उपक्रम कंपनीने राबवले. 

शेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी नारायणगाव (ता. जुन्नर. जि. पुणे) येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनी अखंड कार्यरत आहे. निविष्ठा विक्री केंद्र, परसबाग, फळे-भाजीपाला थेट विक्री आदी यशस्वी उपक्रम कंपनीने राबवले. शीतगृहे व सुविधा केंद्रांच्या नव्या उभारणीसह वार्षिक पावणेदोन ते दोन कोटी रुपये उलाढालीपर्यंत कंपनीने मजल मारली आहे.

पुणे जिल्ह्यात नारायणगाव (ता. जुन्नर) येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीने नेटके नियोजन, सर्व सदस्यांची एकजूट, दूरदृष्टीपणा आदी गुणांच्या आधारे आपली ओळख तयार केली आहे. कंपनीच्या वाटचालीबाबत अध्यक्ष सतीश पाटे म्हणाले, की पुणे- नाशिक महामार्गासाठी शेती अधिग्रहण करण्यात येत होती. यामध्ये आमच्या परिसरातील शेकडो एकर जमिनी संकटात आल्या. आम्ही आंदोलनही केले. शेतीच गेली तर काय करायचे असा प्रश्‍न होता. मिळणाऱ्या मोबदल्याचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध राहिलेल्या शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला तर भविष्यात शेतीसारखे क्षेत्र नाही असा विचार आम्ही करत होतो. त्यादृष्टीने कंपनीने पुढील धोरण व कार्यपद्धती आखली. मजुरीच्या प्रश्‍नावर यांत्रिकीकरण, शेतीमाल संकलन, प्रक्रिया आणि विपणन आदी बाबी विचारात घेतल्या. त्यातून २०१७ मध्ये शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली.

धडाक्याने सुरुवात
सुरुवातीला १७ सभासद होते. प्रत्येकी एक लाख १५ हजार भागभांडवल याप्रमाणे सुमारे १९ लाख रुपये रक्कम उभी केली. पुढे एक हजार सभासद शुल्क घेण्यास सुरुवात झाली. शिवतेज ॲग्रो सर्व्हिसेस कृषी सेवा केंद्र नारायणगाव येथे सुरू केले. त्याचे उद्‍घाटन नाशिक जिल्ह्यातील आघाडीच्या सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या हस्ते झाले. केंद्राद्वारे विविध कंपन्यांशी समन्वय साधत शेतमाल ‘मार्केटिंग’साठी प्रयत्न सुरू केले. आदित्य बिर्ला (मोर), बिग बास्केट, रिलायन्स, स्टार बाजार, महिंद्रा ॲग्रो सोल्यूशन आदींना उच्च प्रतीचा शेतीमाल पुरवठा केला. शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

प्रशिक्षण
सभासदांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे, चर्चासत्रे आयोजित केली. केंद्र शासनाची राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था व पंचायत राज, हैदराबाद या ठिकाणी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. शेतकरी उत्पादक कंपनीचे योग्य व्यवस्थापन कसे असावे याबाबत महत्त्वाचे प्रशिक्षण त्यातून मिळाले. या माध्यमातून पहिल्याच वर्षी एक कोटी ४० लाख रुपयांची उलाढाल केली. त्यातून
कंपनीचा आत्मविश्‍वास वाढला.

माझी परसबाग उपक्रम
‘शिवतेज’ आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या माध्यमातून सभासदांच्या घराजवळ माझी परसबाग संकल्पना राबविली जात आहे. रसायनांच्या वापराविना संपूर्ण सेंद्रिय व विषमुक्त फळे- भाजीपाला निर्मिती हा त्यामागील उद्देश आहे. त्यासाठी परसबाग मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करून शेतकरी व नागरिकांना अत्यल्प दरात उपलब्ध केली आहे. विषमुक्त शेतीमाल उत्पादन व शेतकरी जीवन शैली विकास या कार्यक्रमांतर्गत आयुर्वेदिक वनस्पती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात.

कोरोना संकटात थेट शेतीमाल पुरवठा
गेल्यावर्षी पासून सुरु झालेल्या कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्या बंद होत्या. शेतमाल पुरवठा साखळी विस्कळित होऊन माल विक्रीअभावी शेतातच पडून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अशावेळी कंपनीने परिसरातील शेतकऱ्यांकडील भाजीपाला व फळांची थेट विक्री ग्राहकांना सुरू केली. शहरी ग्राहकांनाही रास्त दरात दर्जेदार माल उपलब्ध झाला. यात ॲग्रोवनचे प्रोत्साहन मिळाले. त्यातून फळे- भाजीपाला यांच्या एक आठवड्याच्या बास्केटसचा पुरवठा पुणे, मुंबई शहरातील विविध उपनगरांतील गृहनिर्माण सोसायट्या व ग्राहक पंचायतीमध्ये सुरु केला. सहा महिन्यांमध्ये सुमारे ४० लाख रुपयांच्या शेतमालाचा पुरवठा करण्यापर्यंत कंपनीने
यश मिळवले. थेट विक्रीचा हा अनुभव संपन्न करणारा ठरला.

शीतगृह व सुविधा केंद्र
कंपनीचे अनेक सभासद द्राक्ष उत्पादक आहेत. त्यांची गरज ओळखून इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे (ESS) मशिन कंपनीने खरेदी केले आहे. ते शेतकऱ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्याने मजुरीवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. द्राक्ष विक्रीतील अडचणींवर मात करण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी खासगी कंपनीसोबत प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाचा आधार घेतला. त्या अंतर्गत दोन एकर जागा खरेदी करून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित ५०० मे. टन क्षमतेचे शीतगृह व पॅक हाउस उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. निर्यातदार शेतकऱ्यांसाठी विविध परवाने, देशांतर्गत व्यापारासाठी थेट शेतीमाल खरेदी, लघू उद्योग, वस्तू आणि सेवा कर आदी परवाने कंपनीने घेतले आहेत.

शिवतेज ब्रॅण्ड विकसित करणार
भविष्यात शेतीमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कंपनीचा शिवतेज ब्रँड विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत पुरवठा साखळी भक्कम करीत शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कोल्हापूर महापुरात मदतीचा हात
शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून कार्यरत असताना सामाजिक बांधिलकीही जपली. सांगली, कोल्हापूर भागांत अलीकडील वर्षांत झालेल्या महापुरात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून जुन्नर डॉक्टर असोसिएशन यांच्यासोबत आवश्यक औषधांची मदतही केली.

कंपनीची उलाढाल

  • सभासद - ५०८
  • वर्ष --- उलाढाल (रु.)
  • २०१७-१८ --- १ कोटी ४० लाख
  • २०१८-१९ --- १ कोटी ८० लाख
  • २०१९-२० --- १ कोटी ८४ लाख
  • २०२०-२१ --- सुमारे २ कोटी (प्रस्तावित)

संपर्क-  सतीश पाटे, ९८२२५३९४९१
अध्यक्ष, शिवतेज कंपनी


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...