२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक योजना

ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि. सांगली) येथे श्री. भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था कार्यरत आहे. या माध्यमातून २४० एकरांसाठी व १३४ शेतकऱ्यांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसह ‘वायरबेस्ड’ तंत्र कार्यान्वित केले. त्यातून वीज बिल, पाणी वापर, श्रम व वेळ यांची बचत झालीच. शिवाय पीक उत्पादकता काही पटींनी वाढवणे शक्य झाले.
 श्री भैरवनाथ’ संस्थेचे ठिबक सिंचन युनिट
श्री भैरवनाथ’ संस्थेचे ठिबक सिंचन युनिट

ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि. सांगली) येथे श्री. भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था कार्यरत आहे. या माध्यमातून २४० एकरांसाठी व १३४ शेतकऱ्यांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसह ‘वायरबेस्ड’ तंत्र कार्यान्वित केले. त्यातून वीज बिल, पाणी वापर, श्रम व वेळ यांची बचत झालीच. शिवाय पीक उत्पादकता काही पटींनी वाढवणे शक्य झाले.   सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका ऊस व द्राक्ष पिकांसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील अहिरवाडी गावातील काही भागात पाणी व खताचा अनियंत्रित वापर झाल्याने काही शेती क्षारपड झाली आहे. जवळच कृष्णा नदी व दोन सहकारी साखर कारखाने आहेत. पाण्याचा काटेकोर वापर करून माती व पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ठिबकच्या दिशेने गावात श्री. भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था कार्यरत आहे. हुतात्मा किसन अहीर साखर कारखान्याने संस्थेला पुरस्कृत केले आहे. त्यामाध्यमातून २०११-१२ च्या दरम्यान सामुहिक स्वयंचलित ठिबक सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प झाले आहेत तेथे प्रत्यक्षात पाहणी करून त्यातील तांत्रिक गोष्टी समजावून घेतल्या. जुनी पाणी योजना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत करण्याचे ठरवले. संस्थेचे अध्यक्ष अरुण यादव म्हणाले की आमच्या भागात काही प्रमाणात शेती क्षारपड झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटेकोर करणे गरजेचे होते. त्यामुळे योजनेत अधिकाधिक शेतकरी सहभागी होऊ लागले. पूर्वी एका युनिट होते. क्षेत्र आणि शेतकरी संख्या यांचा ताळमेळ बसविण्यासाठी व प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत आणि समान पाणी देण्यासाठी दुसरे युनिट उभारण्याचा निर्धार केला. सामुहिक स्वयंचलित ठिबक योजनेविषयी

  • युनिट १ ची पाणीसाठवण क्षमता दीड लाख लिटर तर युनिट २ ची ही क्षमता सव्वा लाख लिटर
  • पाटबंधारे विभागाकडून पाणी परवाना.
  • युनिट १ चे क्षेत्र- १४० एकर तर युनिट २ चे क्षेत्र १०० एकर असे मिळून एकूण क्षेत्र- २४० एकर
  • १० गुंठ्यापासून तीन एकरांपर्यंतचे शेतकरी समाविष्ट.
  • एकूण सभासद संख्या- १३४
  • ऊस क्षेत्र- १७० एकर, द्राक्ष क्षेत्र- ७० एकर
  • कृष्णा नदीवरून मुख्य पाइपलाइन केली आहे.
  • गरजेनुसार यंत्रणेत शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी चालू-बंद करण्यासाठी व्हॉल्वज.
  • एकूण योजनेसाठीचा खर्च- दोन कोटी ७५ लाख रू.
  • योजनेचे झालेले फायदे

  • खते, पाणी वापर यात २० ते ५० टक्के बचत. दोन्हींच्या वापराबाबत शेतकरी झाले जागरूक.
  • मजुरी खर्चातही मोठी बचत.
  • लागवड पद्धतीत बदल झाला. ऊस बेण्यात ४० टक्के बचत.
  • एक डोळा पध्दतीचा वापर
  • भांगलणीचा खर्च कमी झाला.
  • रात्री- अपरात्री शेतकऱ्याला शेतात जावे लागत नाही.
  • एकरी ऊस उत्पादनात वाढ झाली. पूर्वी एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. आता ते ६०, ६५ ते ७० एकरांवर पोचले आहे.
  • ठिबक योजनेत दोन ड्रिपरमधील अंतर ४० सेंटीमीटर. डिस्चार्ज- २.४ लिटर प्रति तास
  • कृष्णा नदीवरून युनिट एक व दोनपर्यंतचे अंतर साडेपाच किलोमीटर
  • -अंतर्गत पाइपलाइन- युनिटनिहाय ६५०० ते ७५०० मीटर.
  • यंत्रणेत १२ व्हॉल्वजचा वापर. प्रति व्हॉल्व १२ एकरांसाठी
  • ४० अश्वशक्तीचे दोन व २५ अश्वशक्तीचे २ असे चार पंप. .
  • पाणीपट्टी (प्रति एकर)- ऊस व द्राक्षे प्रत्येकी १२ हजार रू   काही तंत्रे   
  • प्रेशर मीटर- यात पाण्याचा दाब ३ किलोपर्यंत आवश्यक ठेवला आहे. त्यामुळे विसर्ग समप्रमाणात होतो. अंतर्गत पाइप फुटत नाही.  

    वॉटर मीटर एका मिनिटात किती पाणी किंवा प्रति एकरास किती लिटर पाणी वापरले जाते याची नोंद संगणकावर ठेवली जाते.

    दाब नियंत्रित ठेवणारा व्हॉल्व्ह दाब ठरावीक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास हा व्हॉल्व स्वयंचलित पद्धतीने सुरू होतो. त्यामुळे दाब योग्य प्रकारे संतुलित राहण्यास मदत होते.   सोलेनॉईड व्हॉल्व संपूर्ण क्षेत्राला पाणी पुरवठा करणारा व्हॉल्व. पाणी चालू- बंद करण्यासाठी याचा वापर होते. तो संगणक प्रणालीला जोडला आहे.   प्रतिक्रिया आमची योजना सुरवातीच्या काळात पाटपाण्याच्या संदर्भात होती. परंतु संपूर्ण क्षेत्राला पाणी देण्यात अडचणी येत होत्या. काळानुसार बदल करताना स्वयंचलित ठिबक व वायरबेस्ड प्रणाली योजना राबविण्याचे ठरविले. संस्था पातळीवर पाणी पुरवठा करताना आता ही प्रणाली सुकर झाली आहे. एकसमान पद्धतीने पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. अरुण यादव, अध्यक्ष, श्री. भैरवनाथ संस्था. संपर्क- ८६६८२९३९१३ आमच्या जमिनीचा सामु आठपेक्षा अधिक सामू आहे. पाण्याचा अति वापर टाळण्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून स्वयंचलित ठिबक यंत्रणा शेतात बसवली. ऊसासह द्राक्ष लागवड केली आहे. अनिकेत पाटील ९७३०७००५३५ संपर्क- गुणवंत यादव- ९५०३२८४६११ सचिव, श्री.. भैरवनाथ संस्था.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com