agriculture story in marathi, Shrikrishna Sawant of Sangli Dist. has started rice mill enterprise. | Page 2 ||| Agrowon

राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार, हातसडीच्या, कमी पॉलिश तांदळाला मागणी

अभिजित डाके
शनिवार, 20 नोव्हेंबर 2021

सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील श्रीकृष्ण सावंत या युवकाने राइस मिल’ व्यवसायातून स्वयंरोजगार निर्मिती केली आहे. इंद्रायणीसह स्थानिक विविध वाणांच्या तांदळावर प्रक्रिया करून हातसडीचा व कमी ‘पॉलिश’ केलेला तांदूळ बनविला जातो. परिसरात थेट ग्राहकांकडून त्यास चांगली पसंती व मागणी मिळविण्यास व टिकवण्यात सावंत यांना यश आले आहे.

सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील श्रीकृष्ण सावंत या युवकाने राइस मिल’ व्यवसायातून स्वयंरोजगार निर्मिती केली आहे. इंद्रायणीसह स्थानिक विविध वाणांच्या तांदळावर प्रक्रिया करून हातसडीचा व कमी ‘पॉलिश’ केलेला तांदूळ बनविला जातो. परिसरात थेट ग्राहकांकडून त्यास चांगली पसंती व मागणी मिळविण्यास व टिकवण्यात सावंत यांना यश आले आहे.
 
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका अतिपावसाचा म्हणून ओळखला जातो. या तालुक्याला भाताचे माहेरघर असे संबोधले जाते.  क्षेत्रधारणा कमी असून तुकड्यातुकड्यांमध्ये शेती होते. इंद्रायणी, कोलम, रत्नागिरी आणि स्थानिक अशा विविध वाणांची लागवड इथे होते. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी उत्पादनवाढ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील युवा शेतकरी श्रीकृष्ण सावंत यांची अडीच एकर शेती आहे. त्यात भात व ऊस पिके असतात. वडील बाळासाहेब पाटबंधारे विभागात नोकरी करतात.

‘राइस मिल’चा व्यवसाय
उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी स्थानिक स्रोतांवर आधारित कोणता व्यवसाय फायदेशीर ठरेल याचा विचार श्रीकृष्ण यांनी केला. तालुक्यात भाताचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे राइस मिलला असलेली संधी ओळखली. कच्चा माल इथेच उपलब्ध होईल आणि विक्री करणेही काही प्रमाणात सोपे होईल हा विचार केला. दिशा पक्की झाली. आता यंत्रांची गरज होती. कर्नाटक राज्यातील दावणगिरी येथे ती पाहण्यात आली. हव्या त्या पद्धतीचे यंत्र मिळाले देखील. आता राहिला प्रश्‍न कच्च्या मालाचा म्हणजे भाताचा. तोही सोडविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी-गाठी सुरू केल्या. सन २०१५-१६ च्या दरम्यान ‘ श्रीगणपती राइस मिल नावाने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला कच्च्या मालाच्या पुरवण्यात सातत्य नसणे, बाजारपेठ या अडचणी आल्या. मात्र हिंमत न राहता चिकाटी सोडली नाही. वडिलांचीही साथ मिळाली.

बाजारपेठ मिळवली
भात कांडून मिळू लागल्याने स्थानिक शेतकऱ्यांनाही ते सोपे झाले. या भागात तांदळाची विक्री करणे तसे सोपे नसते. कारण या तालुक्यात प्रत्येकाच्या घरीच भाताचे उत्पादन होत असते. पण कृषी विभागाने साथ दिली. त्याद्वारे कृषी प्रदर्शनात तांदूळ विक्रीचा स्टॉल उभारणे सुरू केले. त्या वेळी घरच्या इंद्रायणी वाणासह अन्य तांदूळही विक्रीस ठेवला. त्यातून पुढे थेट ग्राहक मिळत गेले. त्यांच्याकडून पुढेही मागणी होत राहिली. मुळात शेडगेवाडी गाव असे मध्य ठिकाण आहे की इथून सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांकडे जाता येते. इथली बाजारपेठही तशी बऱ्यापैकी मोठी आहे. शिवाय परिसरात चांदोली, गणपतीपुळे ही पर्यटनाची ठिकाणे आहेत. त्यामुळे पर्यटकांकडूनही तांदळाला मागणी मिळू लागली.

हातसडीचा व कमी पॉलिश तांदूळ
इंद्रायणी, रत्नागिरी २४, रत्नागिरी १, कोमल, स्थानिक जोंधळा, मासाड आदी वाणांचा हातसडीचा व कमी पॉलिश केलेला तांदूळ विक्रीस उपलब्ध केला. त्यामुळे पॉलीश केलेल्या बाजारपेठेतील तांदळापेक्षा या तांदळास ग्राहकांकडून मागणी अधिक येऊ लागली. मुंबई, पुण्याचे ग्राहकही तांदूळ घेतात. शिवाय सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर भागातील ग्राहक नेहमीचे झाले आहेत. आजमितीला व्यवसायाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. महिन्याला तीन ते चार लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत श्रीकृष्ण यांनी मजल मारली आहे. श्रीकृष्ण सांगतात, की आमच्या शेतात इंद्रायणीसह स्थानिक भातवाणही घेतो. स्थानिक वाणांचे उत्पादन तुलनेने कमी असते. मात्र मागणी चांगली असते.
आता शिराळा इंद्रायणी हा देखील ब्रॅण्ड तयार केला आहे.

राइस मिल उद्योग- ठळक बाबी

 • -मिलसाठीची जागा नातेवाइकाची असून भाडेतत्त्वावर घेतली. सुमारे २५ लाखांचे भांडवल गुंतवले. यामध्ये शेड, यंत्रे व अन्य साहित्य अशी तरतूद आहे. सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. अन्य रक्कम घरून उभी केली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून सव्वा लाख रुपयांचे अनुदान मिळाले.
 • कच्चा माल तालुक्यातील शेतकऱ्यांकडून घेतला जातो. संबंधित शेतकऱ्यांना वाहतुकीच्या
 • अडचणी येत असल्यास प्रसंगी बांधावरूनही खरेदी होते.
 • -बाजारातील भाताचे दर कमी- अधिक होत असतात. त्यानुसार खरेदी होते.
 • -अन्य शेतकऱ्यांनाही त्यांच्याकडील भातापासून तांदूळ करून दिला जातो.
 • त्यास प्रति पोचे ७० रुपये शुल्क घेतले जाते.
 •  शेतासाला एक ते दीड टन प्रक्रियेची मिलची क्षमता. मात्र रोजचे गणित कच्चा माल उपलब्ध होण्यावर अवलंबून. महिन्याला सुमारे २० ते २५ टन प्रक्रिया होते.
 • तांदूळ दर (प्रति किलो)

 

 • इंद्रायणी- ४५ ते ५० रु.
 • कोमल- ३० रु.
 • इंद्रायणी तुकडा- २६ रु.
 • तांदळाला वर्षभर मागणी.
 • भुश्‍शालाही चांगली मागणी. ४ ते ५ हजार रुपये प्रति टन दराने विक्री.
 • व्यवसायात आई रुक्मिणी आणि पत्नी मनीषा यांचीही मोलाची मदत.
 • आता मिनी डाळमिलचीही जोड दिली आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी कऱ्हाड आणि इस्लामपूर भागातून होणार आहे. तांदळाबरोबर डाळीची विक्री करणे सोपे जाईल.

संपर्क-  श्रीकृष्ण सावंत, ९९७५८६८२३७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
रेशीम शेतीतील समाधानकिनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन...
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची...राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८...
पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळखभादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा...
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी...
नागली उत्पादनांचा ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डनाशिक ः  कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी...
जागतिक दर्जाच्या शेतीतून वाटा केल्या...निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान-...
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा...परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट...
सालईबनला मिळाली नवी ओळखबुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत कांदा...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिलकांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या...
‘ड्रायझोन’मध्ये आली गंगाअमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय...हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन...
साहिवाल पालनात तरुणाने दाखवली जिद्दकुठल्याही व्यवसायात टक्के-टोणपे, यश -अपयश येतच...
कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले...विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना...
पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीरभातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगतीकामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी...
प्रयोगशीलतेतून वाढवले तुरीचे उत्पादनलोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील एकनाथ...