agriculture story in marathi, Shruti Ahire, young entrepreneur has launched pro chicken concept in poultry business. | Page 2 ||| Agrowon

आरोग्यदायी, ताजे ‘प्रो चिकन, युवा उद्योजक श्रुती अहिरेने उभारला व्यवसाय

मुकूंद पिंगळे
शनिवार, 27 जून 2020

परदेशात उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतून आपल्या वडिलांच्या पोल्र्टी उद्योगाचा विस्तार व उंची अधिक वाढवण्याचे काम श्रुती उद्धव अहिरे ही युवती करीत आहे. आरोग्य स्वच्छतेच्या (हायजेनिक) सर्व नियमांचे पालन केलेली आधुनिक विक्री केंद्रे उभारून प्रो चिकन संकल्पनेद्वारे दर्जेदार, स्वच्छ ताजे चिकन व प्रक्रिया उत्पादने पुरवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. ग्राहकांचाही त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

परदेशात उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतून आपल्या वडिलांच्या पोल्र्टी उद्योगाचा विस्तार व उंची अधिक वाढवण्याचे काम श्रुती उद्धव अहिरे ही युवती करीत आहे. आरोग्य स्वच्छतेच्या (हायजेनिक) सर्व नियमांचे पालन केलेली आधुनिक विक्री केंद्रे उभारून प्रो चिकन संकल्पनेद्वारे दर्जेदार, स्वच्छ ताजे चिकन व प्रक्रिया उत्पादने पुरवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. ग्राहकांचाही त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

नाशिक येथील उध्दव अहिरे हे प्रगतिशील व यशस्वी पोल्ट्री उद्योजक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या उद्योगाचा वारसा मुलगी श्रुती नव्या संकल्पना राबवून पुढे चालवताना दिसत आहे. मुंबई विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन पदवी व त्यानंतर लंडनजवळील नॉटिंगहॅम येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन ही पदव्युत्तर पदवी तिने घेतली. त्यानंतर वडिलांच्या पोल्ट्री उद्योगाचाही ती अनुभव घेऊ लागली. वडिलांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळत गेल्याने उद्योगात रुची वाढू लागली. शिक्षण, व्यवस्थापन कौशल्य व नव्या संकल्पनांच्या वापरातून त्यात अजून संधी दिसू लागल्या. त्यातूनच
‘प्रो चिकन’ व ‘फार्म टू फोर्क’ या संकल्पना २०१६ मध्ये प्रत्यक्षात अवतरल्या.
 
काय आहे प्रो किचन संकल्पना

 • पारंपारिक पद्धतीच्या चिकन विक्री केंद्र पद्धतीत स्वच्छतेसह आरोग्य दुर्गंधीचा प्रश्न निर्माण व्हायचा.
 • त्याचे स्वरूप बदलायचे ठरवले.
 • आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानकांचा अभ्यास करून अन्न सुरक्षिततेचे नियम अवलंबिले.
 • नावीन्यपूर्ण व आरोग्य स्वच्छता पूर्ण वातावरणात ‘प्रो चिकन’ स्टोअर सुरू केले.
 • ज्यातून ग्राहकांना दर्जेदार व ताजे चिकन उपलब्ध झाले.
 • ब्रॉयलर चिकन स्वतःच्याच पोल्ट्री उद्योगातून प्रक्रिया करून येते.
 • बर्फाच्या पेट्यांमध्ये त्याचे शीतकरण केलेले असते. त्यामुळे ते खराब होत नाही.
 • ग्राहकांना वजनी मागणीनुसार ताजे पुरवण्यात येते.

असे केले उद्योगाचे प्रमोशन
जिवंत पक्षी विक्रीऐवजी प्रक्रियायुक्त विक्रीची संकल्पना तशी नवी होती. सुरुवातीला ग्राहकांचाही अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र ग्राहकांचे गैरसमज दूर करून विपणन कौशल्यांच्या आधारे त्यांची मानसिकता बदलवली. आपला अत्याधुनिक पोल्ट्री उद्योग व दर्जेदार चिकन उत्पादन सांगणारा व्हिडिओ तयार करून तो ग्राहकांना दाखवण्यास सुरुवात केली. ग्राहकांचा त्यास प्रतिसाद मिळू लागला. संकल्पना रुजली. यातून आत्मविश्वास वाढल्याचे श्रुती सांगते.

व्यवसाय वृद्धीसाठी यांचा केला वापर

 • फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप, रेडिओ जिंगल्स, माहितीपत्रके
 • इंटरनेटच्या माध्यमातून सेवा व उत्पादनासंबंधी अपडेटस
 • ग्राहकांचे फीडबॅक घेण्याचीही पध्दत
 • नवे संकेतस्थळ विकसित करण्याचे काम सुरू

प्रो किचनचे चार स्टोअर्स

 • सुरुवातीला गंगापूर रोड परिसरात एकच स्टोअर होते. दोन वर्षात काठे गल्ली, इंदिरानगर, उत्तमनगर या तीन ठिकाणी कार्यान्वित.
 • वातानुकूलित केंद्र
 • अत्याधुनिक स्टेनलेस स्टील उपकरणांचा वापर
 • चारही स्टोअर्समधून दररोजची विक्री ८०० किलोपर्यंत
 • चार शाखांसाठी दोन व्यवस्थापक. जोडीला ८ कुशल कर्मचारी तैनात
 • विक्री, व्यवहार नोंदी व स्वच्छता याबाबत त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित
 • त्यांना वैद्यकीय व विमा सुरक्षा
 • सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

रेडी टू कुक उत्पादने

 • चिकनसोबत अंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
 • शिवाय ग्राहकांची गरज ओळखून ही रेडी टू कुक उत्पादनेही उपलब्ध केली आहेत.
 • रेड चिकन टिक्का, हरियाली चिकन टिक्का, चिकन लॉलीपॉप
 • चिकनमधील टाकाऊ घटकांचीही विक्रीही श्‍वानखाद्य (डॉग फूड) म्हणून होते. 

 कोरोनाच्या संकटात ‘ई- कॉमर्स’ चा वापर :
कोरोनाच्या संकटात ग्राहकांची मागणी लक्षात घेता झोमॅटो, स्वीगी यांसाख्या ई-कॉमर्स सेवा पुरवठादारांसोबत व्यावसायिक करार केला. ताज्या चिकन विक्रीचा असा पहिलाच प्रयोग असावा.
त्यासही ग्राहकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे अडचणीत काळातही व्यवसाय वृद्धीसाठी निर्णय रास्त ठरले.
 
स्वच्छता व अन्न सुरक्षिततेसंबंधी ग्राहक कोरोना संकटाच्या दरम्यान जागृत झाले. ‘ग्राहकांची सुरक्षा हेच आमचे ध्येय’ हे उद्दिष्ट ठेऊन शारीरिक अंतर पाळण्यासह चिकनचे आहारातील महत्त्व याबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. त्या माध्यमातून स्वच्छ, निर्जंतुक, गुणवत्तापूर्ण व किमान मानवी स्पर्श असलेल्या चिकनची विक्री लॉकडाऊन काळात चांगल्या प्रकारे झाली.
 
प्रो किचनची कार्यप्रणाली

 • पोल्ट्री उत्पादकांकडून ब्रॉयलर पक्षांची खरेदी
 • त्यांनाही किफायतशीर परतावा त्यातून मिळतो -
 • मानवी स्पर्श विरहीत अत्याधुनिक यंत्रणा
 • दैनंदिन दर पाहण्यासाठी डिजिटल फलक
 • पारदर्शक विक्री व्यवस्थेसाठी डिजिटल वजनी यंत्रणा. ज्याद्वारे ग्राहकांना वजनाप्रमाणे किंमत दिसते.
 • खरेदीनुसार छापील बिल देण्याची व्यवस्था
 • दैनंदिन विक्री,आवक-जावक यासह सर्व व्यवहाराच्या नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणाली.
 • पोर्टलच्या माध्यमातून शाखानिहाय नोंदी कामगारांच्या माध्यमातून दररोज अपडेट. त्यातून सर्व व्यवहाराची पडताळणी
 • अन्न सुरक्षिततेला विशेष प्राधान्य. उदा. शीतकरण प्रक्रियेसाठी आरओ पाण्याच्या बर्फाचा वापर, हातमोजे, मास्क यांचा वापर
 • विक्रीत पर्यावरण पूरक पिशव्यांचा वापर

प्रतिक्रिया :
कोरोना संकटात आरोग्यदायी व सुरक्षित अन्नाविषयी ग्राहकांत जागरूकता वाढली
आहे. त्याचा अनुभव आम्हांला विक्रीतून आला. चिकनसंबंधी विविध पाककृतींसाठी यू ट्यूब चॅनल सुरु करण्यावर भर देणार आहोत.
श्रुती अहिरे
८८८८८५७८०५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील...
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ,...राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......
यांत्रिकी पद्धतीने मूरघास निर्मिती...सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी...कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत...
कोकणात प्रयत्नावादातून दिली...कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा विकसित झालेला...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...