दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
कृषिपूरक
शेळ्या-मेंढ्यांतील देवी आजार
देवी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने सुरवातीला लालसर पुरळ येतात, पुढे ते पिवळ्या रंगाचे होऊन त्याच्या खपल्या पडतात. शेळ्या, मेंढ्यांचे खाणे-पिणे कमी किंवा बंद होते. कासेवर पुरळ आल्यास दूध पिणाऱ्या लहान करडांना संसर्ग होण्याची शक्यता असते. आजाराची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
देवी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने सुरवातीला लालसर पुरळ येतात, पुढे ते पिवळ्या रंगाचे होऊन त्याच्या खपल्या पडतात. शेळ्या, मेंढ्यांचे खाणे-पिणे कमी किंवा बंद होते. कासेवर पुरळ आल्यास दूध पिणाऱ्या लहान करडांना संसर्ग होण्याची शक्यता असते. आजाराची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
देवी हा विषाणुजन्य आजार आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या अंगावर पुरळ येतात. खाणे-पिणे मंदावते. दूध व मांस उत्पादनावर परिणाम होतो. आजारामध्ये कातडी बाधित होते, त्यामुळे त्यांचे बाजारमूल्य कमी होते. देवी हा अतिसंसर्गजन्य आजार आहे. मेंढ्यांमध्ये याची बाधा जास्त प्रमाणात दिसून येते. शेळ्यांमध्ये हा कमी त्रासदायक आहे. हा आजार मेंढ्यांमध्ये ‘शीप पॉक्स’ तर शेळ्यांमध्ये ‘गोट पॉक्स’ या विषाणुमुळे होतो.
प्रसार ः
- शेळ्यांच्या श्वसनातून किंवा नाकाच्या स्रावातून येणाऱ्या विषाणूमुळे प्रादुर्भाव होतो.
- रोगग्रस्त शेळी-मेंढीच्या संपर्कामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
- चावणाऱ्या माश्यांमार्फतसुद्धा प्रसार होतो.
लक्षणे ः
- सुरवातीला भरपूर ताप येतो.
- शेळ्यामेंढ्या सुस्त, निस्तेज आणि मलूल होतात.
- शरीरावरील कातडीची चमक कमी होऊन, केस, लोकर रुक्ष दिसते.
- शरीराच्या विविध भागावर हनुवटी, नाकपुड्या, ओठ, केस किंवा लोकर कमी असलेल्या (कान, तोंड, सड, पाय किंवा शेपटीच्या आतील भाग) ठिकाणी पुरळ येतात.
- रोगाच्या सुरवातीला लालसर पुरळ येतात, पुढे ते पिवळ्या रंगाचे होऊन त्याच्या खपल्या पडतात.
- आजारामध्ये खाणे-पिणे कमी किंवा बंद होते.
- नाकातून स्राव येतो, कधी-कधी ठसकतात.
- कासेवर पुरळ आल्यास दूध पिणाऱ्या लहान करडांना संसर्ग होऊ शकतो.
- आजारात मरतुकीचे प्रमाण ५ ते ५० टक्क्यांपर्यंत आहे.
औषधोपचार ः
- आजार विषाणुजन्य असल्यामुळे विशिष्ट औषधोपचार उपलब्ध नाही. दुष्परिणाम आणि जिवाणूचे दुय्यम संक्रमण कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवके, वेदनाशामक इंजेक्शन तीन ते पाच दिवस द्यावीत.
- पुरळ किंवा जखमा पोटॅशियम परमॅंग्नेटच्या सौम्य द्रावणाने (एक टक्के) स्वच्छ करून त्यावर जंतुनाशक मलम लावावे किंवा हळद आणि तूप एकत्र करून लावावे.
प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणाचे उपाय ः
- तीन महिने व त्यावरील निरोगी शेळ्या-मेंढ्यांना दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात लसीकरण करावे.
- आजारी शेळ्या-मेंढ्यांना वेगळे ठेवून औषधोपचार करावा.
- प्रादुर्भाव झालेला कळप इतर निरोगी कळपात नेवू नये.
- आजारी शेळ्या-मेंढ्यांना चारा व पाण्याची वेगळी व्यवस्था करावी.
- शेळ्या-मेंढ्यांचा गोठा जंतूनाशक द्रावणाने स्वच्छ करावा.
- यामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी, दूध व मांस उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी दरवर्षी लसीकरण करणे आवश्यक आहे.
संपर्क ः डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०
(पशुवैद्यकीय रोगप्रतिबंधक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी
- 1 of 34
- ››