agriculture story in marathi, Solapuri Raisins has set its name in Maharashtra. The raisin cluster is developed in Solapur District. | Agrowon

चव, रंगाचे वैशिष्ट्य राखून असणारा सोलापुरी बेदाणा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, बार्शीत क्लस्टर -वर्षाकाठी वीस हजार टन उत्पादन

सुदर्शन सुतार
बुधवार, 1 जुलै 2020

सोलापूरसारख्या दुष्काळी भागात डाळिंब, द्राक्षासारख्या फळपिकांतून चांगले उत्पादन काढून शेतकऱ्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षात त्यात बेदाण्याच्या भर पडली आहे. द्राक्षाच्या थेट विक्रीपेक्षाही शेतकरी बेदाण्याला अधिक पसंती देत आहेत. 

सोलापूरसारख्या दुष्काळी भागात डाळिंब, द्राक्षासारख्या फळपिकांतून चांगले उत्पादन काढून शेतकऱ्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षात त्यात बेदाण्याच्या भर पडली आहे. द्राक्षाच्या थेट विक्रीपेक्षाही शेतकरी बेदाण्याला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळेच बेदाण्याची पंढरपूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ अशी क्लस्टर निर्माण झाली आहेत. विशिष्ठ चव, रंग आणि आकारामुळे सोलापुरी बेदाणा बाजारात लक्षवेधी ठरला आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात द्राक्षाची सुमारे ३० ते ३५ हजार एकरांवर लागवड आहे. त्यांपैकी सर्वाधिक सुमारे २० हजार एकरांवरील द्राक्षांचा बेदाणा केला जातो. त्यामध्ये एकट्या पंढरपूर तालुक्‍यात बेदाण्याचे सर्वाधिक १० ते १५ हजार टनांपर्यंत उत्पादन होते. तर सोलापूर परिसरात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी या परिसरातून चार ते पाच हजार टनांपर्यंत उत्पादन होते. बेदाण्यासाठी पंढरपूरसह आता सोलापूर बाजार समितीतही मार्केट सुरू झाल्यामुळे या भागातील उत्पादकांसाठी बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न सुटला आहे. शिवाय सीमेवरील बाजारपेठेमुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातूनही मोठी मागणी आहे.

विशिष्ट चव, रंगामुळे लक्षवेधी
बेदाणानिर्मितीसाठी थॉमसन, तास ए गणेश, माणिक चमन, क्‍लोन टू, सोनाका या जातींची द्राक्षे उपयोगात आणली जातात. कमी आर्द्रता, सर्वाधिक तापमान हे घटक गुणवत्तापूर्ण बेदाणा निर्मितीसाठी आवश्‍यक असतात. नेमकी हीच परिस्थिती जिल्ह्यात असल्याने उत्कृष्ट बेदाणा तयार होतो. येथील जमिनींमध्ये पोटॅशचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे बेदाण्याला चकाकी आणि चमक मिळते. शिवाय सर्वाधिक तापमानामुळे बेदाण्याला सुकवण्याचा कालावधीही कमी लागतो. एकूणच चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत सोलापूरचा बेदाणा सरस आहे.

कासेगाव, निंबर्गी, विरवडे, पिंपरी क्लस्टर
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, सरकोली, तनाळी, बोहाळी, दक्षिण सोलापुरातील निंबर्गी, भंडारकवठे, उळे, उत्तर सोलापुरातील नान्नज, बीबीदारफळ, मोहोळ तालुक्यातील विरवडे, कामती, बार्शीतील पिंपरी, मळेगाव, वैराग, माढ्यातील मानेगाव ही बेदाण्यासाठी छोटी क्लस्टर आहेत. या भागात बेदाण्याच्या स्वच्छतेसह प्रतवारी करणारे खास उद्योग आहेत. शिवाय काही शेतकऱ्यांकडे स्वतः ची सर्व सुविधांसह यंत्रणा आहे. त्यामुळे बेदाण्याचे क्लस्टर विकसित व्हायला चांगलीच गती मिळाली आहे.

प्रतिक्रिया
बेदाण्यासाठी यंदा पोषक वातावरण होते. पण ऐन हंगामातच कोरोनामुळे बाजारावर परिणाम झाला, सध्या शीतगृहात बेदाणा ठेवल्यामुळे अडचण नाही. जिल्ह्यातील विविध क्लस्टरमुळे बेदाणा मार्केट वाढण्यास मोठी संधी आहे.
-सचिन भोसले-गवळी, बेदाणा उत्पादक, विरवडे (ब्रु), ता. मोहोळ


इतर यशोगाथा
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...