Agriculture story in marathi solar water purifier | Agrowon

जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्र

हेमंत श्रीरामे,  मयूरेश पाटील, किशोर धांदे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

दुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सौर शुद्धजल संयंत्राचा वापर करता येतो. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते त्यामुळे प्रदूषण होत नाही. या संयंत्रासाठी खर्चही कमी येत असल्यामुळे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

दुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सौर शुद्धजल संयंत्राचा वापर करता येतो. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते त्यामुळे प्रदूषण होत नाही. या संयंत्रासाठी खर्चही कमी येत असल्यामुळे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

समुद्राच्या खाऱ्या, मचुळ पाण्याचे तसेच अशुद्ध पाण्याचे गोड्या पाण्यात/शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. सौर शुद्धीजल यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याची सोय केली जाऊ शकते. हे पाणी पिण्यासाठी तसेच मोटार उद्योग, बॅटरी चार्जिंग स्टेशन, आरोग्य केंद्र, शासकीय मोटार कार्यशाळा, प्रयोगशाळा तसेच प्रक्रिया उद्योगामध्ये वापरले जाऊ शकते.

 सौर शुद्धजल संयंत्राची रचना व कार्यप्रणाली

 • सौर शुद्धजल सयंत्र एक हवाबंद चौकोनी उतरता डबा असतो, तो हवाबंद करण्यासाठी फायबर रेनफोर्सड प्लॅस्टिक या विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकचा उपयोग केला जातो. या डब्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम पत्र्याचे आवरण असून त्यावर उष्णताशोषक काळ्या रंगाचे सिलव्हर्टीव्ह कोटींग केलेले असते. त्यामुळे सूर्याची किरणे डब्याच्या आतील भागात शोषली जाऊन आतील तापमान वाढते. या चौकोनी (१ मी × १ मी) डब्याच्या वरच्या बाजूला ४ मि. मी. जाड काचेचे आवरण असून अॅल्युमिनियम किंवा प्लॅस्टिक पट्टीच्या सहाय्याने ही काच डब्यावर घट्ट बसविली जाते. चौकोनी डबा व काच यांच्यामध्ये रबर सिलिंग वापरून डबा हवाबंद करण्यात येतो. या संयंत्रामध्ये अशुद्ध पाणी भरण्याकरिता पाईपची रचना केली जाते.
 • एक चौरस मीटर सौर शुद्धजल संयंत्रामध्ये अशुद्धजलाचा सर्वसाधारण एक इंच जाडीचा थर होईल (अंदाजे ५ लिटर) इतके पाणी भरण्यात येते. अशुद्ध पाणी चौकोनी डब्यात भरल्यानंतर पाणी आत सोडणाऱ्या पाईपचे तोंड बूच लाऊन बंद केले जाते. सौर शुद्धजल संयत्राच्या वरील काचेच्या आवरणातून सौर किरणे आतील काळा रंग (सिलेक्टिव्ह कोटींग) दिलेल्या आवरणावर शोषली जातात. त्यामुळे आतील पाण्याचे तापमान वाढून बाष्पीभवन क्रियेने पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते.
 • चौकोनी डब्यामधील वाफ आपल्या नैसर्गिक गुणधर्मानुसार वरच्या बाजूस सरकते. ही वाफ काचेच्या आतील बाजूने अडविली जाते, परंतु काचेची बाहेरील बाजू थंड असल्यामुळे वाफेचे रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होते. काचेच्या उतरत्या रचनेमुळे असे अनेक पाण्याचे थेंब सरकत खालच्या बाजूस असणाऱ्या संकलन पाईपमध्ये जमा होतात. या संयंत्राद्वारे एक चौरस मीटर आकाराच्या चौकोनी डब्यातून दररोज २ ते २.५ लिटर शुद्धजल मिळते.

फायदे

 • कोणत्याही प्रकारच्या (विद्युत) खर्चिक ऊर्जेची गरज भासत नाही.
 • गढूळ / मचूळ पाण्याचे रूपांतर शुद्धजलामध्ये करता येऊ शकते.
 • या संयंत्रामध्ये कोणताही गंजणारा भाग नसून वापरण्यास अत्यंत सोपे आहे.
 • दुर्गम भागात तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवता येते.
 • कोणतेही प्रदूषण होत नसून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

वैशिष्ट्ये

 • एक चौरस मीटर सौरशुद्धजल संयत्राद्वारे दररोज २ ते २.५ लिटर शुद्ध पाणी मिळते.
 • हे संयंत्र वापरण्या करिता पारंपरिक विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही.
 • या संयंत्राच्या वापरामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

कार्यप्रणालीवर परिणाम करणारे घटक
सौर किरणे ः सौर शुद्धजल संयंत्राचे कार्यक्षमता सौर किरणावर अवलंबून असते. शुद्धजलाची निर्मिती ही सौर ऊर्जेच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. जर सौर किरणांची तिव्रता जास्त असेल, तर सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढते.
वाऱ्याची गती ः जशी वातावरणामध्ये वाऱ्याची गती वाढत जाते, त्याप्रमाणे शुद्धजल संयंत्रातील उष्णतामान कमी होते. वाऱ्याची गती जर कमी असेल, तर संयंत्रापासून जास्त प्रमाणात शुद्धजल प्राप्त होते.
वातावरणातील तापमान ः जसे-जसे वातावरणातील तापमान वाढत जाते, त्याप्रमाणात सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढत जाते.
संयंत्रातील पाण्याची पातळी ः संयंत्रामधील मचुळ पाण्याची पातळी जास्त असेल तर आतील पाण्याचे तापमान कमी राहते. त्यामुळे संयंत्राची उत्पादन क्षमता कमी होते. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पाण्याची पातळी कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे. एक चौरस मीटर संयंत्रासाठी एक इंच पाण्याची पातळी ठेवावी.
संयंत्रामधील काचेचा उतार ः संयंत्रातील वरील बाजूस असलेल्या काचेचा उतार कमीत कमी असेल तर उत्पादन क्षमता जास्त असते, परंतु काचेचा उतार जर ४०० पेक्षा जास्त असेल, तर पाण्याचे थेंब संयंत्राच्या संकलन पाईपमध्ये न जाता संयंत्रामध्येच पडतात. त्यामुळे काचेचा उताराचा कोन २०-३० अंशामध्ये असावा.
 
 


इतर टेक्नोवन
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...