agriculture story in marathi, Somnath Shingare a food process subject expert has started a business of value added jaggary products. | Page 2 ||| Agrowon

गुळापासून नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित उत्पादने

मुकूंद पिंगळे
शनिवार, 29 मे 2021

आरोग्य व औषधी गुणधर्माच्या दृष्टीने गुळाचे वाढते महत्त्व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सोमनाथ शिनगारे यांच्या वेळीच लक्षात आले. गुळाच्या मूल्यवर्धनावर त्यांनी काम सुरू केले. त्यात व्यावसायिक दृष्टिकोन रुजवीत ‘जॅगरी टेल्स’ नावाने सुमारे १३ उत्पादने स्वतंत्र आउटलेससह बाजारपेठेत दाखल केली आहेत.

आरोग्य व औषधी गुणधर्माच्या दृष्टीने गुळाचे वाढते महत्त्व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सोमनाथ शिनगारे यांच्या वेळीच लक्षात आले. गुळाच्या मूल्यवर्धनावर त्यांनी काम सुरू केले. त्यात व्यावसायिक दृष्टिकोन रुजवीत ‘जॅगरी टेल्स’ नावाने सुमारे १३ उत्पादने स्वतंत्र आउटलेससह बाजारपेठेत दाखल केली आहेत.
 
मूळ सोलापूर जिल्ह्यातील मांजरी (ता. सांगोला) सोमनाथ बाळासाहेब शिनगारे यांचे पुणे येथे वास्तव्य असते. त्यांचे वडील शेती व मजुरी करायचे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ‘बीई मेकॅनिकल’ची पदवी घेतली. पुढे अन्न प्रक्रिया प्रकल्प क्षेत्रात १३ वर्षे अनुभव घेतला. साहजिकच या क्षेत्राचा गाढा अभ्यास झाल्याने उद्योगातील नव्या संधीही माहीत झाल्या. एकीकडे साखरेचे उत्पादन वाढते आहे. पण गुळाला मनासारखा दर नाही. तसेच आरोग्यदायी व औषधी गुणधर्मासाठी गुळाचे महत्त्व वाढते आहे या बाबी शिनगारे यांच्यासमोर आल्या. गुळाला सक्षम बाजारपेठ देण्याच्या दृष्टीने त्याच्या मूल्यवर्धनावर २०१९ च्या दरम्यान काम सुरू केले. अर्थात नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करणे आव्हानात्मक होते. पण अनुभव, अभ्यास व तंत्रज्ञानाच्या पाठबळावर ते पेलण्याची तयारी केली.

उत्पादनांची निर्मिती
सुरुवातीला गुळाची पावडर बनवली. मसाले, गवती चहा आदींचा वापर करून ‘प्रीमिक्स’ पद्धतीने उत्पादनांची ‘रेसिपी’ तयार करण्यास सुरुवात केली. वीस जुलै, २०१९ रोजी चिंचवड स्टेशन येथे गुळाचा चहा विक्री आउटलेट सुरू केले. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने हुरूप आला. सुरुवातीला चहाचा रंग व गोडीमध्ये काही त्रुटी समोर येत होत्या. ग्राहकांच्या सूचना प्राधान्याने विचारात घेतल्या. गुणवत्ता व ग्राहकांचे समाधान या बाबी सर्वात महत्वाच्या मानल्या. हळूहळू विक्री वाढत गेली.

प्रतिकूलतेवर मात
मात्र मार्च २०२० पासून कोरोना टाळेबंदी सुरू झाली. आणि व्यवसाय ठप्प झाला. खेळते भांडवल संपुष्टात आले. मात्र जिद्द मनाशी कायम होती. या परिस्थितीत जोखीम पत्करत पुन्हा उभे राहण्यासाठी घर गहाण ठेवून २५ लाख रुपये उभे केले. प्रतिकूल परिस्थितीत भांडवल उभारून पुन्हा अडचणीच्या काळात काम सुरू केले. फक्त गुळाचा चहा नको तर सोबत ग्राहकांची मागणी अभ्यासून चहासोबत कुकी, क्रीम रोल ही बेकरीजन्य उत्पादने गूळ व नाचणीपासून बनविण्यास सुरुवात केली. त्यावर काम करून ‘रेसिपी’ बनवून लागणाऱ्या घटक पदार्थांची मात्रा निश्‍चित केली. उत्पादने चवीला गोड, आरोग्यदायी व नावीन्यपूर्ण हवीत असा आग्रह होता. त्यातून उत्पादनांचा आकडा आजमितीस १३ वर गेला आहे.

अशी आहेत उत्पादने

 • पेयजन्य- प्रीमिक्स तसेच इन्स्टंट पद्धतीचा वापर. गुळाचा दुधासोबत तसेच प्लेन चहा, गुळाची कॉफी, ब्लॅक लेमन-टी, लेमन आइस-टी, कोल्ड कॉफी
 • बेकरीजन्य- नाचणी, गहू व गुळावर आधारित कुकीज, क्रीमरोल
 • शाही बर्फी
 • गुळाचे क्युब्स, काकवी

‘कार्पोरेट कल्चर’

 • उत्पादन निर्मितीसाठी गूळ पावडर करण्यासाठी ग्राइंडर, एकसमान घटकांच्या मिश्रणासाठी ब्लेंडर व ने पॅकिंगसाठी आधुनिक उपकरणे व यांत्रिकीकरण उपलब्ध केले आहे.
 • काही पदार्थ बाहेरून तयार करून घेतले जातात.
 • व्यावसायिक विस्तार करण्यासाठी कोरोना संकटकाळात २५ फ्रांचायचीधारक नेमले. त्यातून पिंपरी- चिंचवड, पुणे, ठाणे, नांदेड, हिंगोली, सोलापूर, मुंबई आदी शहरांमध्ये आउटलेट्‌स उभे राहिले.
 • स्वच्छ, सुंदर विक्री दालने, कुशल मनुष्यबळ हे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण आहे.
 • कामकाजाच्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले.
 • अशा प्रकारे ‘कॉर्पोरेट कल्चर’ उभे केले.

‘ब्रँडिंग’ अन् ‘प्रमोशन’वर भर

 • गुळाचे महत्त्व व उत्पादनांसंबंधी ग्राहकांपुढे प्रचार- प्रसार केला.
 • वैशिष्ट्य म्हणजे मुंगळा हा त्यांच्या व्यवसायाचा ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ आहे. प्रत्येक विक्री दालनापुढे (आउटलेट) त्याचे शिल्प साकारले आहे. तो आलेल्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.
 • 'फेसबुक’च्या माध्यमातून JaggeryTales हे पेज तयार करून उत्पादनांची जाहिरात केली.
 • jaggerytales.com हे संकेतस्थळ बनविले.
 • बाजारपेठ सर्वेक्षण, अभ्यास व मेहनतीतून राज्यभर ४० आउटलेट्‌स उभारली आहेत. पुणे, मुंबई, नगर, हिंगोली, नांदेड, ठाणे येथे ती आहेत. कर्नाटक राज्यात काम सुरू आहे. नाशिकमध्ये अलीकडेच तर बेलापूर (नवी मुंबई) व पुणे येथे कार्यालय सुरू केले आहेत.

आकडेवारी (वार्षिक)

 • कच्चा माल (गूळ) मागणी- ६० टन
 • उत्पादन खर्च- ८० लाख
 • उलाढाल- सुमारे १ कोटी
 • उत्पादनांच्या किमती...१० रुपयांपासून ते ३९९ रुपयांपर्यंत

व्यवसायातील ठळक बाबी :

 • अन्न सुरक्षा मानकांना प्राधान्य
 • उत्पादनांची गुणवत्ता, स्वच्छता, चव याकडे विशेष लक्ष
 • उत्पादनांविषयी प्राप्त ‘फीडबॅक’नुसार तातडीने उपाययोजना
 • उत्पादनांची मागणी वाढत असल्याने काही महिला बचत गटांना काम
 • नऊ जणांचे कुशल मनुष्यबळ

गुऱ्हाळधारकांकडून खरेदी
कच्चा माल म्हणजे गूळ उच्च प्रतीचा असावा यासाठी शिनगारे सुरुवातीपासून आग्रही आहेत.
सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील गुऱ्हाळमालकांकडून ते गूळ घेतात. तो रसायनविरहित असावा यास प्राधान्य दिले आहे. त्यातून गूळ उत्पादकांचाही फायदा होऊ लागला आहे.

आव्हाने, चढ-उतार
पूर्वीचा सुरक्षित व्यवसाय सोडून नव्या व्यवसायाकडे पूर्णवेळ लक्ष दिल्याने जोखीम होतीच.
मात्र न डगमगता १५ लाख रुपयांची गुंतवणूक व नियोजनाची सांगड घातली. निराश न होता सकारात्मक अन सांघिक वृत्ती जोपासली. येणाऱ्या काळामध्ये ब्रॅंड देशासह जगभरात नेण्याचा संकल्प आहे. त्यासाठी पूर्ण मेहनत करून नवीन संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.

संपर्क- सोमनाथ शिनगारे, ९०९७२२०१०१

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...
डाळी, बेसनपीठ निर्मितीतून ७०...हिंगोली येथील रमेश पंडित यांनी डाळनिर्मितीसह बेसन...
गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली...अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या...
कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेहीनाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी...
बारमाही उत्पन्न देणारी व्यावसायिक शेतीवनोली (जि..जळगाव) येथील युवराज चौधरी यांनी...
डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरणआटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख...
राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...