Agriculture story in marathi soyabean processing | Agrowon

सोयापदार्थांची निर्मिती फायदेशीर

डॉ. अरविंद सावते, मन्मथ सोनटक्के
शुक्रवार, 13 मार्च 2020

सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतात. सोयाबीन प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यामुळे घरगुती स्तरावर करण्यासाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग फायदेशीर आहे.
 
प्रक्रियायुक्त पदार्थ
१) सोयाबीन दूध

सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतात. सोयाबीन प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यामुळे घरगुती स्तरावर करण्यासाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग फायदेशीर आहे.
 
प्रक्रियायुक्त पदार्थ
१) सोयाबीन दूध

सोयाबीन किंवा सोयाबीनची डाळ स्वच्छ करून पाण्यात ७ ते ८ तास भिजवावी. भिजल्यानंतर मिक्सर किंवा ग्राइंडरमध्ये एक भाग सोयाबीन आणि ४ भाग पाणी मिसळून बारीक करून घ्यावे. तयार मिश्रण १० मिनिटे उकळावे. सुती कापडाने गाळून त्यामध्ये चवीनुसार साखर मिसळावी. थंड झाल्यावर आवडीनुसार सुगंध मिसळावा. अशाप्रकारे, १ किलो सोयाबीनपासून सुमारे ४ लिटर दूध तयार करता येते.

२) सोया पनीर
सोया पनीर हे पचनास हलके असून घरच्याघरी बनवता येते. उकळत्या पाण्यात स्वच्छ सोयाबीन घालून गरम करावे. त्यानंतर त्यास थंड पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवावे. गरम पाण्यासोबत १:९ या प्रमाणात मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. तयार मिश्रण सुती कापडाने गाळावे. मिळालेले दुधासारखे द्रव उकळवून घ्यावे. ५ मिनिटांनंतर त्यामध्ये कॅल्शिअम क्लोराईडच्या द्रावणाने फाडून न ढवळता तसेच काही वेळ ठेवावे. तयार मिश्रण कापडामध्ये दाबून धरावे. १० मिनिटानंतर तयार झालेले सोया पनीरचे तुकडे करावेत. या प्रक्रियेद्वारे एक किलो सोयाबीनपासून सुमारे १.५ ते २ किलो पनीर बनवता येते.

३) सोया लोणी (बटर)
सोयाबीन स्वच्छ करून धुवून घ्याव्यात. स्वच्छ केलेल्या बिया गरम पाण्यात १२ तास भिजत ठेवाव्यात. जास्तीचे पाणी काढून टाकावे. भिजलेल्या बिया पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. भिजलेल्या बिया हाताने चोळून त्याचे टरफल वेगळे करावे. बिया भट्टीमध्ये १०० अंश सेल्सिअस तापमानावर २ ते ३ तास वाळवून नंतर त्यास थंड होऊ द्यावे. गिरण किंवा मिक्सरमधून वाळलेल्या बियांचे बारीक पीठ करून घ्यावे. तयार पीठ चाळणीतून एकसमान चाळून घ्यावे. हे सोया पीठ नंतर सोया बटर तयार करण्यासाठी वापरावे.
कृती (सोया बटर) ः
६५ ग्रॅम सोयाबीन पीठ, २८ ग्रॅम वनस्पती तूप, ५ ग्रॅम साखर, १.५ ग्रॅम मीठ, ०.२ ग्रॅम गवार गम (डिंक) आणि दोन थेंब वेलचीचे सुगंधी तेल चांगले एकत्रित करून घ्यावे. तयार मिश्रणास मिक्सरमधून चांगले एकजीव करून घ्यावे. तेल लावलेल्या थाळीमध्ये किंवा ट्रे मध्ये हे मिश्रण काढून सारख्या जाडीच्‍या थरामध्ये पसरवून घ्यावे. तयार मिश्रण सुकल्यानंतर डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यावे. त्यानंतर एकसारख्या आकाराच्या लहान वड्या कापून त्यांना बटर पेपरमध्ये गुंडाळून घ्यावे. तयार सोया बटर कमी तापमानामध्ये दीर्घकाळ साठवता येते.

सोयाबीन वापरताना घ्यावयाची काळजी
सोयाबीनमधे पौष्टिक घटकांसोबत अपौष्टिक घटकही समाविष्ट आहेत. त्यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. म्हणून प्रक्रिया करून सोयाबीनचा आहारात समावेश करावा. त्यासाठी सोयाबीनचे पदार्थ बनवण्यापूर्वी कमीतकमी १५ मिनिटे १० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावेत. कच्चे सोयाबीन खाणे टाळावे.
 
संपर्क ः डॉ. अरविंद सावते, ९५११२९४०७४
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय, परभणी) 


इतर कृषी प्रक्रिया
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...