मार्केट डिमांडनुसार देशी वाल, इंदूरी धण्याची शेती

शर्मा यांची विक्री व्यवस्था तीन मुख्य संकल्पनांवर आधारलेली आहे. १) क्वालिटी (गुणवत्ता)- ती मिळवणे आपल्या शेतीतील कौशल्यावर आधारीत आहे. २) व्हरायटी- सर्वांनी मिळून विविध प्रकारची पिके लावायची आहेत. म्हणजे ग्राहकांना मालाची विविधता वा अनेक पर्याय हवेत. ३) क्वांटीटी- आपण समूहाने एकत्र येऊ त्या वेळी आपल्याकडे बल्क क्वांटीटी असेल. व्यापारी त्या वेळी आपल्या बांधापर्यंत येईल. आपल्याला त्याच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही
मार्केट डिमांडनुसार देशी वाल, इंदूरी धण्याची शेती
मार्केट डिमांडनुसार देशी वाल, इंदूरी धण्याची शेती

कोणत्या बाजारात केव्हा, काय का चालतं? कितीला विकलं जातं याबाबत सुभाष शर्मा यांना दररोज इत्यंभूत माहिती असते. एखादे पीक लावण्याची वेळ काय असावी? ते कोणत्या स्वरूपात विकले तर पैसे अधिक होतील या बाबी ओळखण्यात त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. आपल्याकडे अनेक दुर्लक्षित, फारशी चर्चेत नसलेली पण ‘हटके’ पिके आहेत. काही गुंठ्यात हजारो रुपयांचे उत्पन्न देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. शर्मा यांची ती हुकमी पिके आहेत. शर्मा यांचे विक्रीचे तीन महामंत्र

  • चांगले पिकते तेच लावा.
  • चांगले खपते तेच लावा
  • कमी खर्च लागते तेच लावा
  • वालाच्या शेंगांची शेती शर्मा यांची वालाच्या शेंगांची शेती त्यादृष्टीने अभ्यासण्याजोगी आहे. जूनमध्ये त्याची लागवड होते. ऑक्टोबरच्या शेवटी तोडे सुरू होतात. पंधरा गुंठ्यातील अलीकडील अनुभव सांगायचा तर नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी असे तीन महिने दररोज एक क्विंटल शेंग बाजारात जायची. तीन महिने म्हणजे ९० दिवस. दर सोमवारी मार्केट बंद राहते. म्हणजे तीन महिन्यातील हे १२ दिवस वगळूया. म्हणजे ७८ दिवस पकडले तरी दररोज एक क्विंटल म्हणजे ७८ क्विंटल शेंगा विकल्या. किलोला २०, ३० रुपयांपासून काही वेळेस कमाल ४० रुपये दर मिळत होता. दर २० रुपये धरला तरी रोजचे २००० रुपये मिळायचे. म्हणजे ७८ दिवसांत एक लाख ५६ हजार रु. उत्पन्न हाती आले. यात ४० टक्के उत्पादन खर्च होतो. फेब्रुवारीत थंडी पडली की झाडांना अजून बहार येतो. तो साधारण मार्चपर्यंत टिकतो. मग ३० ते ४० दिवसांच्या काळात १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्याला दहा रुपये दर धरला तरी दहा हजार रुपये मिळतात. बी घरचे. कोणती फवारणी नाही की रासायनिक खते नाहीत. म्हणजे १५ गुंठ्यात एक लाख ६६ हजार रुपये मिळाले. क्षेत्र केवळ १५ गुंठेच शर्मा सांगतात की १५ गुंठ्यात सुमारे एक लाख ६० हजार रुपये मिळतात याचा अर्थ हे पीक वाढवून अजून नफा कमवायचा असे नाही. कारण बाजारपेठेतील मागणी व पुरवठा हे गणित मांडून १५ गुंठ्यापुरताच हा नफा मर्यादीदित आहे. अजून माल बाजारात आणाल तर दरांची हमी मिळणार नाही. म्हणजे एखाद्या पिकासाठी किती क्षेत्र द्यायचे याचाही विचार हवा. या वालाची वैशिष्ट्ये, फायदे

  • झाडांना इतकी वाढ की अगदी उंच शेंगा लगडतात. हात पुरतो तिथपर्यंत माल घ्यायचा. त्याच्या वरच्या शेंगा पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून राखून ठेवायच्या.
  • हे देशी वाण आहे. शेंगांचा रंग पांढरा. चव खूप चांगली. त्यामुळेच बाजारात सर्वात महाग खपते.
  • संकरित शेंगांना जिथे किलोला १० रुपये दर असतो तेथे या देशी शेंगांना ३० रुपये दर असतो.
  • या पिकाला पाणी कमी लागते. ऑक्टोबरनंतर प्रत्येक आठवड्याने प्रत्येकी नऊ फुटांजवळ दंडाने पाणी सोडायचे. मामुली ओलावा द्यायचा. उत्पादन भरपूर मिळते.
  • खर्च कमी, खपते चांगले.
  • पैसे देतेच, शिवाय काळ्या आईची सेवाही करते.
  • जून ते मार्च असे वालाचे १० ते साडे १० महिन्याचे पीक आहे. एकदा लावले की दीर्घकाळ उत्पन्न घेत राहायचे.
  • इंदुरी धण्याची शेती शर्मा सांगतात की कोथिंबीर (इंदुरी धणे) हे आमचे व्यावसायिक, शिवाय पर्यावरणीय पीक आहे. हजारोंच्या संख्येने त्यावर मधमाश्‍या येतात. परागीभवन करतात. मग उत्पादन आणि गुणवत्ताही वाढते. आधी हिरव्याचा (ताजी कोथिंबीर) पैसा करायचा. नंतर बियाण्याचा. असे असते अर्थकारण

  • पर्याय १- दोन हिरव्या कापण्या
  • पहिल्या कापणीत हिरव्याचे एकरी ७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. साठ क्विंटल उत्पादन
  • व दर १० रुपये प्रति किलो मिळाला तर ६० हजार रुपये मिळतात.
  • दर १५ रुपयांच्या वर राहिल्यास दुसरी हिरवी कापणी करायची.
  • त्याचे एकरी ३५ क्विंटल उत्पादन. दर १५ ते २० रुपये.
  • म्हणजे एकूण एकरी ९५ क्विंटल विक्री. (हिरव्याची)
  • -दोन्ही कापण्यांचे मिळून १० रुपये दराने एकरी ९५ हजार रुपये
  • तर दुसऱ्या कापणीस १५ रुपये दराने एकरी एक लाख १२ हजार रु.
  • खर्च ४० टक्के.
  • पर्याय २- आधी हिरवे, मग धणे

  • हिरव्यास दर १० रुपये असल्यास दुसऱ्या फेरीत बियाणे उत्पादन.
  • शर्मा यांनी १९८३ पासून इंदुरी धण्याचे जतन केले आहे. त्याला अत्यंत सुगंध आहे. म्हणूनच मार्केटमध्ये डिमांडही चांगली आहे.
  • एकरी ४ ते ५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
  • किलोला १०० ते १२० रुपयांप्रमाणे विक्री होते. ग्राहकांबरोबरच बिजोत्पादक कंपन्यांकडूनही चांगली मागणी असते. म्हणजे बियाण्यांपासून पुन्हा ४० ते ५० हजार रुपये मिळवण्याची संधी असते.
  • फायदा

  • साधारण १२० ते १३० दिवसांत ९५ हजार ते एक लाख १० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न हे पीक देते, कोणतीही फवारणी न करता. त्यावरील खर्च कमी होण्याबरोबर मधमाश्‍यांनाही अभय मिळते.
  • सेंद्रिय धणे विका १३० रुपयांनी शर्मा शेतकऱ्यांना आवाहन करतात की, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटशेती केली असेल तर इंदुरी धण्याचा सेंद्रिय ब्रॅंड तयार करा. किलोला १३० रुपये दराने त्याची विक्री करणे शक्य होऊ शकते. शर्मा यांनी आता धणे पावडर निर्मितीही सुरू केली आहे. त्याची होलसेलसाठी १३० रुपये तर रिटेलसाठी १५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. प्रतिक्रिया गुणवत्तापूर्ण बियाणे तयार होण्यात मधमाश्‍यांचा वाटा मोठा आहे. पूर्वी हजारोंच्या संख्येने आमच्या शेतात मधमाश्‍या असायच्या. नैसर्गिक शेती असूनही दरवर्षागणिक त्यांचे प्रमाण कमी होत चालले ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आईनस्टाइनने म्हटल्याप्रमाणे मधमाश्‍या संपल्यानंतर मानवाचे आयुष्य तीन वर्षांपर्यंतच आहे. म्हणजे पुढील तीन वर्षांत आपल्याला राम नाम सत्य है ची तयारी करावी लागेल काय, असा प्रश्‍न उभा राहतो. आपण रासायनिक फवारण्या बंद करू तेव्हाच मधमाश्‍या जगतील. -सुभाष शर्मा संपर्क- ८८३०१७४६६१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com