काही पिके उत्पन्नासाठी, तर काही आईसाठी ! ‘ट्रेंचिंग’द्वारे आंबाबाग पुनरूज्जीवन

समर्पणाची भावना हवी शर्मा म्हणतात, की पीक फेरपालट पध्दतीतून काळ्या आईने अपेक्षेपेक्षा अधिक रास माझ्या झोळीत टाकली. आता आईसाठी केले पाहिजे. म्हणून एकरी पाच ट्रॉली म्हणजे १० ते १५ हजार रुपयांचे शेणखत आणून दरवर्षी वापरतो. मागील वर्षी ते वापरले आहे, यंदा कशाला वापरायचे? असा विचार नाही करायचा. केवळ जमिनीचे शोषण करीत राहणे योग्य नव्हे. त्यानंतर अलौकीक खत वापरतो. आईला बळकट करतो. या पीक पध्दतीत कर्ज घेऊन काही करण्याची गरजच भासत नाही. समर्पणाची भावना हवी. मग आर्थिक स्थैर्य नक्कीच मिळेल.
काही पिके उत्पन्नासाठी, तर काही आईसाठी !  ‘ट्रेंचिंग’द्वारे आंबाबाग पुनरूज्जीवन
काही पिके उत्पन्नासाठी, तर काही आईसाठी ! ‘ट्रेंचिंग’द्वारे आंबाबाग पुनरूज्जीवन

पीक फेरपालट हा सुभाष शर्मा यांच्या शेतीतील महत्त्वाचा भाग आहे. काही पिके उत्पन्नासाठी तर काही काळ्या आईसाठी घ्यायची असा शर्मा यांचा नियम आहे. कारण, सगळा नफा स्वतःसाठी नाही वापरायचा. आईलाही द्यायचा. आई म्हणते पोरा, आधी तू घे, मी म्हणतो आई, तू आधी घे! शर्मा म्हणतात अशी आमच्या मायलेकांत कायम स्पर्धा सुरू असते. प्रातिनिधीक उदाहरण अभ्यासूया.

  • १) कोहळा -लागवड- १० ते १५ एप्रिल (१०० दिवसांचे पीक)
  • २) त्यानंतर पालक- सप्टेंबरमध्ये (४५ ते ५० दिवसांचे पीक)
  • ३) त्यानंतर हरभरा किंवा कोथिंबीर
  • १) कोहळा खरिपात कोहळ्याचं पीक घेण्यात येते. त्याचे एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. दरवर्षी प्रतिकिलो १० ते २० रुपयांपर्यंत दर मिळतात. मागील वर्षी तो सहा रुपयेच मिळाला. ३२ हजार रुपये खर्च वजा जाता एकरी ४० हजार रुपये नफा मिळाला. बी घरचे होते. रासायनिक खते, कीडनाशके असा कोणता खर्च नव्हता. या पिकापासून अपेक्षा ३० हजार रुपयांची होती. पण, आईने ४० हजार रुपये दिले. २) पालक त्यानंतर घेतलेला पालक एकरी ४० क्विंटल झाला. किलोला २० रुपये दराने खपला. त्यापासून ८० हजार रुपये मिळाले. तीस हजार रुपये खर्च तर ५० हजार रुपये नफा झाला. कोहळ्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. ३) कोथिंबीर किंवा हरभरा त्यानंतर घेतलेल्या धन्याचे एकरी ४ क्विंटल बियाणे विकले. त्याचे प्रतिकिलो १०० रुपये दराने ४० हजार रुपये मिळाले. हरभऱ्याचे उत्पादन शर्मा सांगतात, की एक फूट बाय दोन इंच अंतरावर कंटूर पध्दतीने हरभरा घेतो. जमिनीची सुपीकता वा सेंद्रिय कर्बाचा सतत विचार असतो. झाडाला ३०० पर्यंत घाटे असतात. सगळ्या घाट्यांतून अळीचे प्रमाण अत्यंत कमी दिसते. मित्रकीटक, पक्षी यांच्याद्वारे अधिक नियंत्रण होते. आजपर्यंत येथे फवारणी तसेच कोणतेही रासायनिक खत दिलेले नाही. या जमिनीत भरपूर ‘बायोमास’, शेणखत, अलौकीक खत, गोसंजीवक खत यांचाच वापर केला आहे. ड्रीप नाही, स्प्रिंकलरचा वापर नाही. संपूर्ण शेतात खालील बाजूस चार टक्क्यांचा उतार आहे. तरीही संपूर्ण प्लॉट या टोकापासून त्या टोकापर्यंत एकसमान फुललेला दिसतो. एकरी १२ क्विंटल तर काही प्रसंगी १५ क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळते. सत्तर रुपये प्रतिकिलो असा दर आधीच निश्‍चित झालेला असतो. हे पीक २५ हजार रुपयांचा खर्च वगळता ५९ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देते. समर्पणाची भावना हवी शर्मा म्हणतात, की या फेरपालट पध्दतीतून काळ्या आईने अपेक्षेपेक्षा अधिक रास माझ्या झोळीत टाकली. आता आईसाठी केले पाहिजे. म्हणून एकरी पाच ट्रॉली म्हणजे १० ते १५ हजार रुपयांचे शेणखत आणून दरवर्षी वापरतो. मागील वर्षी ते वापरले आहे, यंदा कशाला वापरायचे? असा विचार नाही करायचा. केवळ जमिनीचे शोषण करीत राहणे योग्य नव्हे. त्यानंतर अलौकीक खत वापरतो. आईला बळकट करतो. या पीक पध्दतीत कर्ज घेऊन काही करण्याची गरजच भासत नाही. समर्पणाची भावना हवी. मग आर्थिक स्थैर्य नक्कीच मिळेल. शास्त्र समजून व्यवस्थापन हवे शास्त्र समजून न घेतल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वेगाने कमी होतो. आता या तीन पिकांच्या पध्दतीत वांगे लावले तर हा कर्ब त्वरीत कमी होऊन जाईल. प्रत्येकवेळी पैशांचा विचार नको. आईचाही विचार हवा. या जमिनीतच मग पुढील हंगामात तूर घेतली. हिरवळीचे खत घेतले. आईला अधिक बलशाली केले. मग त्या जमिनीत भुईमूग लावा, कांदा लावा. ते भरघोस उत्पादन देणारच. पीक नियोजन हे मोठे शास्त्र आहे. कापूस एके कापूस, सोयाबीन एके सोयाबीन अशा दृष्टिकोनाने आर्थिक स्थैर्य मिळणार नाही. परिवर्तनाची कास धरावी लागेल. आईसाठीची पिके

  • सगळीच पिके केवळ पैसे मिळविण्यासाठी लावायची नसतात. काही आईसाठी घ्यायची असतात.
  • दरवर्षी आमची उत्पादकता टिकून तरी आहे किंवा वाढते तरी आहे.
  • आधी कोहळा, मग हरभरा घेतो. त्याने जमीन सुधारते. वाल, चवळी, हरभरा, तूर ही पिके आईसाठी असतात. सोयाबीननंतर इथे केवळ गहू असत नाही. तर पाच ते सहा वेगवेगळी पिके घेण्याचा शिरस्ता आहे.
  • आंबा बागेचे ट्रेंचिंग' द्वारे पुनरूज्जीवन अन्नधान्ये, कडधान्ये, भाजीपाला अशा हंगामी पिकांपुरती शर्मा यांची शेती मर्यादित नाही. त्यांनी फळबागाही विकसित केली आहे. आंबा हे त्याचे मुख्य उदाहरण. पारवा येथे पूर्वी आंबा बाग होती. त्यातील ६० टक्के बाग पाण्याअभावी वाळून गेली. ही बाग पुनरूज्जीवित करून त्यात प्राण फुंकण्याचे आव्हान शर्मा यांनी लिलया पेलले. यशस्वी करून दाखवले. त्यांचा हा ‘ट्रेंचिंग’ (चर पाडणे) प्रयोग अभ्यासण्याजोगाच आहे. तंत्र काय वापरले? आंब्याच्या दोन झाडांमधील अंतर ३० फूट आहे. त्याच्या मध्यभागी अडीच फूट खोल, तीन फूट रूंद व चाळीस फूट लांबीचा चर खोदला. सरीच्या प्रत्येक चाळीस फुटांवर दगडी लॉकींग (बंदिस्ती) केले. हे करण्याचे कारण म्हणजे जमिनीला सुमारे चार टक्के उतार होता. शिवाय जमीन माळरानाची आहे. लॉकींग केले नसते तर पाणी थेट वाहून गेले असते. संपूर्ण बागेत वरच्या भागातील झाडांपासून, मध्यभागापासून ते खालच्या भागातील झाडांपर्यंत एकसमान ओलावा तयार व्हावा असे नियोजन होते. वरच्या भागातील माती तशीच राहू दिली. त्यास दगडाचे पिचिंग केले. पावसाचे पाणी या चरीत समाविष्ट झाले. मग ते आतमध्ये झिरपू लागले. एकही थेंब बागेबाहेर नाही आपल्या भागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, बागेचे क्षेत्र, झाडांची संख्या असे गणित मांडून चरीचे क्षेत्रफळ निश्‍चित केले. ते अचूक ठरले. त्यात पडलेल्या पावसाचे १०० टक्के पाणी जागेवर थांबले. एक थेंबही बागेबाहेर गेला नाही. त्यामुळे ओलावा स्थिती तयार झाली. प्रत्येक चरीत पाण्यावाटे १०० लिटर द्रवरूप संजीवक खत टाकले. त्यात गूळ, गोमूत्र व शेण आदी घटक आहेत. त्यामुळे बुरशीची समस्या दिसली नाही. ओलावा तयार झाल्याने लाभदायक जिवाणूंची संख्या वाढली. इथे हिरवळीचे खत घेतले तर त्याचेही मल्चिंग करून तिथेच वापरता येते. मग ओलावा अजून टिकून राहतो. त्यातून जमिनीची सुपीकता वाढते. आणि बाग मोहोरली बागेतील ६० टक्के झाडे जी वाळून गेली होती तिथे कोयांपासून पुन्हा नवी झाडे लावण्यात येतील. ही झाडे अनंत काळ टिकतील. त्यांचा घेर मोठा होईल. मग उत्तम दर्जाचे आंबे तयार होतील. ट्रेंचिंग प्रयोग यशस्वी झाल्याने जवळपास सर्वच झाडांना मोहोर सुरू झाला. फळे लागत नव्हती ती झाडे देखील मोहोरायला सुरवात झाली. याचाच अर्थ चरीचे काम शंभर टक्के यशस्वी झाले. प्रयोगाने पाणी घडवले इथल्या प्रत्येक झाडाला लागणारे पाणी हा प्लॉट स्वतःच घडवतो आहे. आमच्या इथे पाऊस भरपूर होतो. प्रयोगामुळे काही लाख लिटर पाणी बागेत थांबले असावे. बाष्पीभवन वजा करून बाकीचे भूगर्भात जिरले. आता त्यापैकी मोजक्याच पाण्याने ही बाग जगवायची. म्हणजेच या बागेने पाण्याचे उत्पादनही केले. पाण्यामुळे देखील शेतीत उत्पादकता तयार होते ही गोष्ट शेतकऱ्यांनी अभ्यासायला हवी. संपर्क- सुभाष शर्मा- ८८३०१७४६६१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com