उत्पादन दीडपटीने वाढवणारी कंटूर तंत्रपद्धती

कंटूरवरची मेथी शर्मा जवळपास सर्वच पिके कंटूरवर घेतात. मेथी हे त्यांचे हुकमी पीक. त्याला खूप पाणी लागत नाही. इथेही जमिनीला दोन टक्क्यांचा उतार आहे. तरीही जमिनीला एकसारखे पाणी मिळाल्याने उत्पादनही एकसमानच मिळते. इथेही पावसाळ्यातील पाणी जिरवण्याचा प्रयोग आहेच. त्यातील ४० टक्के पाणी उर्वरित आठ महिन्यांसाठी म्हणजे रब्बी व उन्हाळ्यात उपयोगात येते. हे ४० टक्के पाणी वापरण्याचे कौशल्य म्हणजेच कंटूर.
उत्पादन दीडपटीने वाढवणारी कंटूर तंत्रपद्धती
उत्पादन दीडपटीने वाढवणारी कंटूर तंत्रपद्धती

कालच्या भागात (ता.२ )आपण यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्या एकूण प्रयोगशील शेतीचा आढावा घेतला. यापुढील प्रत्येक भागात एकेक विषयाची माहिती आपण घेणार आहोत. कंटूर हा शेतीचा आत्मा ‘कंटूर फार्मिंग’ हा शर्मा यांच्या शेतीचा आत्मा आहे. या पद्धतीत खरिपात पावसाळ्याचे पाणी जमिनीत साठवायचे आणि जिरवायचे. शिवारात पडलेला पावसाचा एकही थेंब शिवाराबाहेर जाऊ द्यायचा नाही. रब्बी व उन्हाळी हंगामात याच ओलाव्यावर पिकांचे उत्पादन घेत राहायचे. या पद्धतीमुळे उत्पादनात दीडपट ते दुप्पट वाढ होऊ शकते असा शर्मा यांचा अनुभव आहे. ते सांगतात की आमच्या माळरान, खडकाळ जमिनीत पाण्याचा सुमारे दोन टक्के किंवा त्यापेक्षा उतार आहे. तिथं पाण्याचं नियोजन कंटूर पद्धतीने केलं आहे. त्याला खर्चही फार नाही. कंटूरचे महत्त्व

  • ‘झिरो लेव्हल’ करण्यासाठी कंटूरचे उपकरण
  • त्याला दोन ते तीन पध्दतीने मार्किंग केले जाते.
  • या पद्धतीत समांतर सरी वरंबे पाडले जातात. पीक वरंब्यावर लावण्यात येते.
  • प्रत्येक सरीला ‘झिरो लेव्हल’ म्हणजेच समप्रमाणात पाणी. त्यामुळे पावसाचे पाणी जागेवरच थांबते.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतात पाणी थांबविण्यासाठी तुमची शेती नैसर्गिक हवी.
  • याचे कारण म्हणजे नैसर्गिक वा सेंद्रिय जमिनीत गांडुळे, लाभदायक जिवाणू अशा नानाविध सजीवांची संख्या भरपूर असते. हे जीव जमिनीत छिद्रे तयार करतात. त्यामुळे पाण्याचे ‘परकोलेशन’ होण्यास मदत होते. रासायनिक शेतीत या बाबी शक्य होतीलच असे नाही.
  • या पद्धतीत उत्पादन दीडपट ते दुप्पट मिळते.
  • असा होतो कंटूर उपकरणाचा वापर १) कंटूर मार्कर या उपकरणाद्वारे ‘मार्किंग लाइन्स’ तयार केल्या जातात. दीड ते दोन तास सराव करून शेतकरी त्यात ‘मास्टर’ होऊ शकतात. या उपकरणाला आधार (पाया) म्हणून सहा बाय सहा इंच आणि पाऊण इंच जाडीचा ठोकळा असतो. त्यावर एक पट्टी घट्ट लावण्यात येते. पट्टीवर लाकडी दांडा किंवा फळी ‘फिक्स’ केलेली असते. ही पट्टी म्हणजे तुटलेल्या फावड्याचाच दांडा शर्मा यांनी उपयोगात आणला आहे. शेतातील कोणतीही गोष्ट वाया न घालवता सार्थकी लावावी, असे शर्मा म्हणतात. २) फळीच्या वरच्या भागावर फूटपट्टी लावलेली असते. ‘रीडिंग’ आपल्या डोळ्याच्या समांतर घेणे शक्य व्हावे म्हणून ही जागा असते. फळीला समांतर उभी प्लॅस्टिकची नळी इंग्रजी यू आकारात ‘फिक्स’ केलेली असते. तिची लांबी ४५ फूट लांब (एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत) असते. या नळीत पाणी भरण्यात येते. ३) आता जमिनीचा चढ व उतार कोणत्या बाजूस आहे ते लक्षात घ्यायचे. त्यानुसार कंटूर मार्करद्वारे जमिनीच्या उतारापासून ‘लेव्हलिंग’ करायची. एका एकराचे मार्किंग करायला दीड- दोन तास लागतात. पीक उत्पादन दुप्पट हवे असेल तर तेवढे श्रम घ्यावेच लागतील असे शर्मा म्हणतात. उपकरणाद्वारे प्रत्येक ५० फुटांवर कंटूर लाइन्स (रेषा) तयार केल्या जातात. त्याला समांतर सरी वरंबे काढले जातात. रेषा काढताना कमाल (हायस्ट) व किमान (लोएस्ट) असे बिंदू असतात. त्यावरून उपकरणातील प्लॅस्टिकच्या नळीतील पाण्याची पातळी व फूटपट्टीचे आकडे पाहायचे आणि ‘लेव्हल’ मिळवत जावे लागते अशी ही पद्धत आहे. ४) हे उपकरण हाताळण्यासाठी साधारण दोन ते तीन व्यक्तींची गरज असते. एकाने मागे राहायचे तर दुसऱ्याने काही अंतर पुढे उभे राहायचे. मागील व्यक्ती आपल्या जागेवरील पाण्याची लेव्हल व फूटपट्टीवरील आकडे सांगते. त्यानुसार पुढील व्यक्ती तशी ‘लेव्हल’ मिळविण्यासाठी मागे- पुढे किंवा आजूबाजूला सरकत राहते. उदाहरणार्थ, मागील व्यक्तीने सव्वानऊ असे ‘रीडिंग’ सांगितले व त्या वेळी पुढील व्यक्ती ‘साडेसात’च्या रीडिंगवर असेल, तर अद्याप ती ‘झिरो लेव्हल’च्या खाली आहे असे समजले जाते. यात एक नियम वापरला जातो तो म्हणजे तुम्ही खाली असाल तर अजून खाली जायचे. वर असाल तर अजून वर जायचे. तेव्हा अपेक्षित म्हणजे सव्वानऊपर्यंतची लेव्हल लवकर मिळते. एकदा लेव्हल निश्‍चित झाली की तिसऱ्या व्यक्तीने दोन स्टॅंडच्या मधल्या दोरीला समांतर रेषा (लाइन) आखत जायचे. त्यासाठी कोणताही चुना वा दोर वापरण्याची गरज नाही. मग पुन्हा पुढच्या पॉइंटला मागच्याने जायचे व पुढच्याने त्यानुसार पुढे हा क्रम सुरू ठेवायचा. कंटूरवरची मेथी शर्मा जवळपास सर्वच पिके कंटूरवर घेतात. मेथी हे त्यांचे हुकमी पीक. त्याला खूप पाणी लागत नाही. इथेही जमिनीला दोन टक्क्यांचा उतार आहे. तरीही जमिनीला एकसारखे पाणी मिळाल्याने उत्पादनही एकसमानच मिळते. इथेही पावसाळ्यातील पाणी जिरवण्याचा प्रयोग आहेच. त्यातील ४० टक्के पाणी उर्वरित आठ महिन्यांसाठी म्हणजे रब्बी व उन्हाळ्यात उपयोगात येते. हे ४० टक्के पाणी वापरण्याचे कौशल्य म्हणजेच कंटूर. एकआड एक पद्धतीने सिंचन शर्मा सांगतात, की मेथीच्या शेतात सलग सऱ्या पाडतो. लांब सरीतून देण्यासाठी खूप पाणी लागले असते. एका ठिकाणाहून पाणी सोडल्यास इच्छित ठिकाणी येता येता त्याला जवळपास एक तास लागायचा. गती कमी झाली की त्या जागी ते पाणी मुरायचे. मग प्रत्येकी वीस फुटांचे पार्टिशन तयार केले जाते. म्हणजेच एका दाड दुसऱ्या दांडापासून वीस फुटांवर येतो. सऱ्या २० फुटांपर्यंतच ओलावायच्या आहेत. ओलीत करीत जाताना खुली असलेली सरी बंद करायची तर बंद आहे ती खुली करीत जायचे. येताना हीच कृती उलट करीत यायचे. अशा रितीने खुली- बंद म्हणजेच एकाडएक (अल्टरेनट) पद्धतीने सिंचन चालते. याद्वारे पाण्याची ६० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. एक सरी जातीत जास्त जास्त अर्ध्या मिनीटात भरते. म्हणजे मोजून मापून त्याला पाणी मिळते. पाण्याची मोठी बचत या पद्धतीत ठरावीक क्षेत्र एका तासाऐवजी सहा मिनिटांत ओलीत करणे झाले. यातून सुमारे ५४ मिनिटांच्या पाण्याची बचत झाली. जिथे प्रति इरिगेशनमध्ये तीन हजार लिटर असे सहा इरिगेशमध्ये मिळून १८ हजार लिटर पाणी वाया गेले असते. त्याची बचत करणे शक्य झाले. पाण्याची बचत करण्याचे कौशल्य आपल्या अंगी तयार झाले पाहिजे असे शर्मा म्हणतात. चकाकदार मेथी ही मेथी नैसर्गिक पद्धतीची असल्याने तिला वेगळीच चकाकी असते. साहजिकच २५ टक्के महाग दराने ती खपते. दर मागायला जाण्याची गरजच पडत नाही. लागवडीचे प्रत्येकी पाव एकरांचे टप्पे केल्याने एकाचवेळी सगळी मेथी काढणीस येत नाही. दरांचा फायदा त्यातून घेता येतो. कंटूर संकल्पना आम्ही कंटूर पद्धतीने शेती विकसित केली आहे. यातील एका अडीच एकर प्लॉटमध्ये कंटूर केले. यात अर्ध्या भागात कांदा तर अर्ध्या भागात चारा, भुईमूग व कोथिंबीर लागवडीचे नियोजन केले. रब्बीत व उन्हाळ्यात केवळ कंटूर एके कंटूरवरच संपूर्ण लागवड होते. याचे अनेक फायदे होतात हे अनेक वर्षांच्या अनुभवातून दिसते. हरभऱ्याचे पूर्वी मिळणारे सात क्विंटल उत्पादन कंटूर पध्दतीत १२ ते १५ क्विंटलपर्यंत मिळत आहे. संपर्क- सुभाष शर्मा- ८८३०१७४६६१, ९४२२८६९६२०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com